आयकर अर्थात इन्कम टैक्स संबंधित माहिती

Submitted by शुभंकरोती on 7 December, 2012 - 09:49

आयकर हा सामान्य नोकरीपेशा (कर्मचारी) वर्गाचा हमखास चर्चेचा विषय. तर ह्यात अनेक कायदे, नियम, उप नियम असतात. बरेच लोक नियमांबद्दल माहित नसल्याने ज्यास्त आयकर भरतात आणि जेव्हा कोणी सुज्ञ माहितीगार एखादा नियम कायदा नीट उलगडून सागतो, तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात येते. तो म्हणतो "(अरे गाढवा!!!) आधी विचारले का नाहीस. हम किसलिये बैठे हैं." तर अशा सुज्ञ जणांना विनंती करतो की त्यांनी माहीत नसलेल्या नियमांचे (आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या प्रश्नांचे) निरसन ह्या ठिकाणी करावे आणि पेचात पडलेल्यांना योग्य मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत जिव्हाळ्याचा ट्याक्स = इन्कमट्याक्स.
माझ्या उत्पन्नाचा २०-३०% भाग, म्हणजे, मी एक रुपया कमावला तर ३० पैसे हे सर्कार चोरते, अन त्यात राजकारणी चरतात हा संताप आपणा सर्वांच्याच मनात असतो.

पण राजाचा भाग राजाला द्यावाच लागतो. अन नाही दिला तर तुरुंगापासून अनेक लफडी मागे लागतात. तेंव्हा पुढचे वाचा:

प्रत्येक सर्कारी/बिनसर्कारी हापिसात जनरली एक बाबू /भाऊसाहेब/क्लर्क/कारकून असतो, जो सगळ्यांचे इन्कमट्याक्सचे फॉर्म भरून देत असतो. आपणही डोळे झाकून ते भरत असतो, किंबहुना त्याने भरले त्यावर सह्या करीत असतो. अन आपण अशा हापिसात नोकरीत नसलो तर शक्यतो कसलाच ट्याक्स भरण्यापासून मुक्त असतो- असे आपण समजत असतो. जसे छोटी मोठी दुकाने, इतर बिगर-ऑफिस नोकर्‍या इ. पण हे करू नये. म्हणजे बाबूंच्यावर अवलंबिणे. किंवा काहीच ट्याक्स न भरणे. झीरो टॅक्सचा का होईना रिटर्न फाईल केलाच पाहिजे.

जगात एक 'चार्टर्ड अकाउंटंट' नामक व्यावसायिक असतो. तुमची वार्षिक आवक २ लाखाच्या वर गेली, तर कृपया या प्राण्याला थोडी दक्षिणा द्या. फार पैसे ते घेत नाहीत, तुमची आवक पाहूनच घेतात, पण योग्य प्रकारे तुमचा ट्याक्स भरणे, किंबहुना ट्याक्स वाचविणे व 'कागद' तयार करण्याचे काम ते करतात.

दर वर्षी नियम थोडे थोडे बदलत असतात. इन्कमट्याक्सव्यतिरिक्तही इतर ट्याक्स आपल्या बोकांडी असतात. यांचा अभ्यास करून हे सीए लोक आपल्यासाठी काम करतात, त्यांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. (नोकरीत असलात, अन तुमचा बाबू कितिही हुश्शार असला तरीही.) कारण नुसता टॅक्स भरण्याव्यतिरिक्त, टॅक्स वाचवण्यासाठी काय करायचे, कोणत्या वजावटींचा आधार घ्यायचा. कोणता विमा चांगला. कर्ज घेण्यासाठी योग्य ब्यांक कोणती, किती कर्ज घेण्यासाठी कोणते कागद कसे, किती स्ट्राँग/वीक करायचे, गुंतवणूक कशी, कुठे किती करायची हेही सल्ले सीए देतात. त्यांनी स्वतःहून दिले नाहीत तर हक्काने मागून घ्या.

डॉक्टरपासून जसा शरीराचा भाग आपण लपवत नाही, तसेच या सीए पासून तुमच्या आर्थिक परिस्थितीचा कोणताच भाग लपवू नका. कितीही मोह झाला तरी. यात तुमचाच फायदा आहे.

अन आता एक टॅक्सपेयर म्हणून शेवटचा सल्ला,

शक्य तितका ट्याक्स भरा. मॅक्सिमम व्हाईट पैसा जनरेट करा. कारण तोच पैसा तुम्हाला 'इन्व्हेस्ट' करता येतो. त्यावरच तुम्हाला कर्ज मिळते, नफा मिळवता येतो. जितके तुम्ही कागदावर 'स्ट्राँग' तितके उत्तम!

शक्य तितका ट्याक्स भरा. मॅक्सिमम व्हाईट पैसा जनरेट करा. कारण तोच पैसा तुम्हाला 'इन्व्हेस्ट' करता येतो. त्यावरच तुम्हाला कर्ज मिळते, नफा मिळवता येतो. जितके तुम्ही कागदावर 'स्ट्राँग' तितके उत्तम!>>>>

डॉक्टर साहेब !!!!

जियो.... सोला आने की बात. खरच. योग्य सल्ला.

एक सी. ए. म्हणुन मी हाच सल्ला देइन. इन्कम टॅक्स बद्दल अनेक गैर्समज आहेत. कारण हा टॅक्स आपण "डायरेक्ट" भरतो. तो जाताना पगारातुन डोळ्यासमोर दिसतो. पण इतर अनेक कर जे आपण इन्डायरेक्ट्ली भरतो जे "एम.आर.पी" ह्या गोड नावा खाली छुपलेले असतात ते आपल्या पगारातुन डायरेक्ट जात नाहीत म्हणुन आपण त्या बद्दल अनभिज्ञ असतो.

१. योग्य मिळकत दाखवा त्याचा फायदा शेवटी आपल्यालाच होतो.
२. योग्य आणि रास्त कर भरा
३. कायद्याने ज्या वजावटी दिलेल्या आहेत त्यांचा आधार घेवुन योग्य त्या वजावटी घ्या
४. कायद्याचा फायदा घेवुन गुंतवणुक करा
५. कर वाचवणे हा उद्देश असण्या पेक्षा "योग्य व रास्त कर भरणे" हा उद्देश असायला हवा
६. कर वाचवताना आपण जी गुंतवणुक करतो, लक्षात असु दे आपला तो पैसा " गुंतवला" जातो फुकट नाही. हाच पैसा नंतर कामाला येतो.
७. कर वाचवताना आपण जी गुंतवणूक करत आहात ती नीट डोळे उघडुन करा. कारण अनेकदा छोटा कर वाचवायला आपण जन्म भराची कमीट्मेंट घेतो. परत आपण पुढ्ल्या वर्षी अशाच कायमच्या बंधनात अडकतो. त्या मुळे काय गुंतवतोय किती गुंतवतोय ह्या कडे लक्ष द्या.
८. "आम्हाला त्यातलं काही कळत नाही..." असे जोक मारु नका. आहो तुमचा पैसा आहे! तो कसा वाचवायचा हे तुम्हाला माहित पाहिजेच. सी.ए. फक्त वाट दाखवेल किंवा करुन ही देइल, पण तो काय करतोय, कसे करतोय ह्या वर आपला अंकुश पाहिजेच.
९. वर डॉक्टर साहेब म्हणाले तसं, हाच पैसा तुमचं उद्याचं भांडवल आहे. तीच तुमची नेटवर्थ आहे. त्या वरच उद्या लोन मिळणार आहे.

इब्लिस+१, मीरा+१

<कर वाचवताना आपण जी गुंतवणूक करत आहात ती नीट डोळे उघडुन करा. कारण अनेकदा छोटा कर वाचवायला आपण जन्म भराची कमीट्मेंट घेतो. परत आपण पुढ्ल्या वर्षी अशाच कायमच्या बंधनात अडकतो. त्या मुळे काय गुंतवतोय किती गुंतवतोय ह्या कडे लक्ष द्या.> दरवर्षी फेब/मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नव्या नव्या लाइफ इन्शुरन्स पॉलिसीज घेणारी मंडळी आठवली हे वाचून.

करनियोजन हे तुमच्या एकंदर आर्थिक नियोजनाशी सुसंगत हवे.

आपला आयकर जर आधीच कापून घेतला गेला असेल (t.d.s.), आणि आपल्या उत्पन्नाला लागू असणाऱ्या करापेक्षा तो जास्त असेल, तर तो अर्थातच परत मिळायला हवा. सार्वत्रिक अनुभव असा आहे की, अश्या वेळेला सरकारी कर्मचारी चांगले महागडे ‘चहा-पाणी’ झाल्याशिवाय धनादेश देत नाहीत! खर म्हणजे ते आपण कष्टाने मिळवलेले पैसे असतात. परतावा मिळणे हा आपला हक्कच असतो.

अश्या प्रसंगी ‘अण्णा शस्त्र’ वापरावे! बेधडक माहिती अधिकारात अर्ज करावा. महिन्याच्या आत धनादेश मिळतोच, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. एक रुपयासुद्धा वरखर्च करावा लागला नाही, ह्याने फार मोठे समाधान मिळाले.

विषयांतराबद्दल क्षमस्व.

ऑनलाईन रिटन फाईल केल्यावर अधिकचा कापलेला TDS येणे असेल तर तो महिन्या भरातच आपल्या बॅंकेत जमा केला जातो असा माझा दोन वर्षां पासूनचा अनुभव आहे.

इब्लिस, मीरा + १

इंद्रा + १

कितीही किचकट विषय असला तरी ह्यासंदर्भात उदासीनता दाखवू नका. स्वतःच्या मिळकतीविषयी आणि त्यावर भराव्या लागणार्‍या कराविषयी जागरूक रहा.

@अनया : आताशा असे होत नाही. पैसे बँकेत जमा होतात. एक पै सुद्धा द्यावी लागत नाही.. इंद्रधनुष्य म्हणत आहे त्याप्र्माणे एक दिड महिन्यात पैसे जमा होतात.. तपासणीचे काम बहुदा डिपार्टमेंटने आउट्सोर्स केले आहे..

@अनया : आताशा असे होत नाही. पैसे बँकेत जमा होतात. एक पै सुद्धा द्यावी लागत नाही.. इंद्रधनुष्य म्हणत आहे त्याप्र्माणे एक दिड महिन्यात पैसे जमा होतात.. तपासणीचे काम बहुदा डिपार्टमेंटने आउट्सोर्स केले आहे..

अनया,
आता ई फाईल करता येते, त्याने कोणाच्याही पाया पडाव्या लागत नाहीत.>>>>>

अनया म्हणते त्या प्रमाणे परिस्थीती पुर्वी खुप होती. आताशा ती बदलायला लागली आहे. तरीही ज्यांचे रिटर्न मुख्यत्वे सॅलरी + अदर सोर्सेस असे आहे, त्यांना फारसा त्रास होत नाही. पण प्रोफेशनल किंवा बिझनेस इन्कम दाखवले/ असेल तर मात्र अजुनही कधी कधी हा त्रास होतो. ( अनया प्रोफेशनल आहे त्या मुळे मी हे म्हंटले)

इ फायलिंग मुळे रिटर्न भरणे व टी. डी.एस लोकेट करणे सोप्पे आहे. पण अजुनही रीटर्न ची अस्सेस्मेंट मात्र ऑफिसर च्याच हातात आहे. त्या मुळे एखाद्या टिडिएस चा ट्रॅक न लागुन तो डिसअलाउ होणे वगैरे प्रकार होतात. पण तेही सॅलरी रीटर्न मधे होण्याची शक्यता अगदी आर्धा टक्का. बाकी प्रोफेशनल इन्कम मधे पुर्ण बॅलन्स शीट द्यावी लागत असल्याने असेसमेंट डिटेल मधे होते. मग सहाजिकच "चहा पाणी" उद्योग चालतात.

अशी सुधारणा झाली असेल तर चांगलेच आहे. मी हे साधारण तीनेक वर्षांपूर्वीचे सांगतेय. पण अगदी खिंडीत अडकलेल्या लोकांना हा सुद्धा मार्ग आहे, हे सांगावे म्हणून लिहीले.

त्या मुळे एखाद्या टिडिएस चा ट्रॅक न लागुन तो डिसअलाउ होणे वगैरे प्रकार होतात. पण तेही सॅलरी रीटर्न मधे होण्याची शक्यता अगदी आर्धा टक्का. > मला गेल्या वर्षीच्या रिटर्नवर qurey येणे अपेक्षीत होते, कारण वर्षाच्या सुरवातीला कंपनीला Declaration देताना मी Education Feeचा रकाना रिकामा ठेवला होता. मात्र qurey न येताच TDS थेट बॅंकेत जमा झाला हे त्या अर्ध्या टक्क्यांमुळेच का?

सॅलरी रिटर्नच्या संदर्भात, कंपनी ( एम्प्लॉयर ) दर महिन्याला टी.डी.एस. रिटर्न भरते त्यात बहुतेक सर्व डिटेल्स येतच असतात. त्यामूळे मुद्दाम अशा रिटर्न्सची असेसमेंट करायला खास कारण लागते, नाहीतर ते आहेत तसे स्वीकारले जातात. असा नियम आताचा नाही तर २५ वर्षांपूर्वीच होता. त्यावेळी आतासारखे ऑनलाईन रिटर्न्स नव्हते.

प्रोफेशनल्स ना बॅलन्स शीटच काय अकाऊंटस लिहिणे पण त्यापूर्वी अनिवार्य नव्हते. इतकेच काय प्रत्येकाचे प्रीव्हीयस ईयर पण वेगवेगळे असू शकत होते. आता त्यामानाने सर्व बरेच सुरळीत ( स्ट्रीमलाईन ) झालेले आहे.

जिव्हाळ्याचा विषय
इब्लिस, मोहन की मीरा, मस्त पोस्ट
ऑनलाईन रिटन फाईल केल्यावर अधिकचा कापलेला TDS येणे असेल तर तो महिन्या भरातच आपल्या बॅंकेत जमा केला जातो>>> +१ मला ३ वर्ष आयकर विभागाने असेच धक्के दिलेत. पहिल्या वर्षी तर विश्वासच बसला नव्हता. सी ए कडे जाउन ३-३ दा खात्री करुन घेतली. Proud

डॉक्टर आणि मीरा......

मला खूप आनंद झाला तुम्हा दोघांचे या विषयातील प्रांजळ मत वाचून. आम्ही सरकारी कर्मचार्‍यांचा इन्कम टॅक्स हा जितका आंतरसालीसारखा जिव्हाळ्याचा विषय तितकाच माझ्यासारख्याला त्यातील काऊंटिंग कॅलक्युलेशनच्या किचकटतेमुळे [तसे ते किचकट नसते, तरीही....] काहीवेळा अगदी नकोसा वाटणारा.

डॉक्टरांच्या निरिक्षणाप्रमाणे आम्ही याबाबतीत बहुतांशी ऑफिसच्या अकौंन्टट महोदयाच्या मेन्दूवर अवलंबून असतो. ते गृहस्थही अगदी प्रामाणिकपणे हे काम पार पाडतात असाच आजवरचा अनुभव असल्याने निदान त्याबाबतीत काही तक्रारीला वाव नाही. टीडीएस असल्याने दरमहा पगारपत्रकातून आयकरची कपात थेट होत असतेच, तरीही डिसेम्बरपासून सी.ए. कडे आपली फाईल देण्याचा प्रघातही [जो योग्यच आहे] असल्याने याबाबतीत कसलाही त्रास होत नाही वा जरी जादाचा टॅक्स गेला असला तरीही योग्य वेळी रीफंडही अगदी बॅन्केत थेट खात्यावर वर्ग होत असतो, हीदेखील एक समाधानाची बाब.

सार्‍या जंजाळातून वर्षाकाठी जितका इन्कमटॅक्स पगारातून सरकार जमा होतो, ती देशाप्रती एकप्रकारे आपली जबाबदारीच आहे असे प्रत्येक कर्मचार्‍याने मानले पाहिजे अशा मताचा मी आहे. तो दृष्टीकोण ठेवला तर मग नागरिकाचे कर्तव्य आपण काही अंशी तरी पार पाडले असे म्हणावे लागेल.

अशोक पाटील

ऑनलाईन रिटन फाईल केल्यावर अधिकचा कापलेला TDS येणे असेल तर तो महिन्या भरातच आपल्या बॅंकेत जमा केला जातो असा माझा दोन वर्षां पासूनचा अनुभव आहे>> +१ Happy

>>सार्‍या जंजाळातून वर्षाकाठी जितका इन्कमटॅक्स पगारातून सरकार जमा होतो, ती देशाप्रती एकप्रकारे आपली >>जबाबदारीच आहे असे प्रत्येक कर्मचार्‍याने मानले पाहिजे अशा मताचा मी आहे. तो दृष्टीकोण ठेवला तर मग >>नागरिकाचे कर्तव्य आपण काही अंशी तरी पार पाडले असे म्हणावे लागेल.

मान्य, पण नेते, अभिनेते, उद्योगपती, शेतकरी, इ. लोक टॅक्स भरतात का हो या अशा भावनेने ??? Angry

महेश.....

तुमच्या प्रश्नाला मी 'होकारार्थी' उत्तर दिले तर त्याला लोक पुरावा काय ? असेही विचारू शकतात, तर 'नकारार्थी' उत्तर दिले तर त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो ? त्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर तरी किमान मनाच्या समाधानासाठी का होईना बसेल तितका टॅक्स सरकारदरबारी देऊन मोकळे व्हावे व आपल्या नित्याच्या कामाला लागावे असा नेमस्त मार्ग मी स्वीकारला आहे असेच म्हणेन.

अशोक पाटील

मान्य, पण नेते, अभिनेते, उद्योगपती, शेतकरी, इ. लोक टॅक्स भरतात का हो या अशा भावनेने ??? राग
<<

जळजळ पोहोचली Wink

मान्य, पण नेते, अभिनेते, उद्योगपती, शेतकरी, इ. लोक टॅक्स भरतात का हो या अशा भावनेने ??? >>>

मला वाटतं हा प्रश्ण इथे अप्रस्तुत आहे. ह्या वर चर्चा करण्यासारखं खुप आहे. पण त्या मुळे ह्या धाग्याचा उद्देश भरकटेल

माल प्रॅक्टिस करणारे अनंत लोक आहेत, आपण ही त्यांच्यातले व्हायचं की नाही हे आपण ठरवायचं. प्रत्येकाला माहित असतं की "देवाच्या आळंदिला" जायचय की "चोराच्या आळंदिला". रस्ता दाखवणारे दोन्ही कडे मिळतात. आपण ठरवायचं आपली मंजिल काय ते. नैतिक अनैतिक हे आपण ठरवायचं आहे.

अशोकजी, मोकीमी,

मी पण इमाने इतबारे कर भरतच आहे. पण राग अशासाठी येतो की आपल्यासारख्या लोकांच्या जीवावर नेते, अभिनेते, अनेक उद्योग, (शेतकरी नव्हे) गबर होत रहातात स्वतः असंख्य प्रकारे कर चुकवून

@इब्लिस : जळजळ वगैरे काही नाही. असलाच तर राग जरूर आहे पण तो गब्बर आणि मुजोर शेतकर्‍यांबद्दल, आणि बाकी कॅटॅगरीबद्दल जास्तच राग आहे याबाबतीत.

"....नैतिक अनैतिक हे आपण ठरवायचं आहे....."

सहमत. नैतिक अनैतिक या संज्ञा तशा फार फसव्या होऊ शकतात. त्यावर खल करीत राहाण्यापेक्षा आपण कोणत्या कोडचा स्वीकार करून आपला जीवन व्यतीत करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे हेच उत्तम.

८० सीसी या कलमाखाली सार्वजनिक संस्थांना दिलेल्या देणगीच्या पावत्यांचा इन्कमटॅक्स रीलिफसाठी उपयोग होतो हे सार्‍या टॅक्स पेयर्सना माहीत आहेच. इथे सांगावे की न सांगावे या विचारात मी होतो, पण आता नैतिकतेचा प्रश्नच समोर आला आल्याने लिहितो की, मी माझ्या क्षमतेनुसार वर्षभर अशा दोनचार संस्थाना फूल ना फुलाची पाकळी म्हणून जी देणगी देतो, त्याबाबत त्यांच्याकडून मिळालेल्या पावत्या कधीही इन्कमटॅक्स रीलिफकरीता माझ्या कार्यालयात दिलेल्या नाहीत. तसे केले असते तर माझ्या दृष्टीने त्या देणगीच्या मूळ हेतूलाच ढाळ लागली असे मी मानतो.

.....अर्थात हे माझा वैयक्तिक मत झाले, ते इतर देणगीदारांचेसुद्धा असले पाहिजे असा आग्रह बिलकुल नाही.

अशोक पाटील

८० सीसी या कलमाखाली सार्वजनिक संस्थांना दिलेल्या देणगीच्या पावत्यांचा इन्कमटॅक्स रीलिफसाठी उपयोग होतो हे सार्‍या टॅक्स पेयर्सना माहीत आहेच. इथे सांगावे की न सांगावे या विचारात मी होतो, पण आता नैतिकतेचा प्रश्नच समोर आला आल्याने लिहितो की, मी माझ्या क्षमतेनुसार वर्षभर अशा दोनचार संस्थाना फूल ना फुलाची पाकळी म्हणून जी देणगी देतो, त्याबाबत त्यांच्याकडून मिळालेल्या पावत्या कधीही इन्कमटॅक्स रीलिफकरीता माझ्या कार्यालयात दिलेल्या नाहीत. तसे केले असते तर माझ्या दृष्टीने त्या देणगीच्या मूळ हेतूलाच ढाळ लागली असे मी मानतो. >> अशोक मामा हे नाही पटले. देणगी आपण चांगल्या हेतूनेच देतो. अशा संस्थांकडून रितसर पावती घेतली तर त्यांच्या कारभारा मधेपण पारदर्शीपणा राहतो. ह्यासंदर्भात असे नमूद करावेसे वाटते की ज्यावेळी एखादी प्रोव्हिजन कायद्यामधे येते त्यात तीचा स्कोप आणि ऑब्जेक्ट दिला असतो. म्हणजे ती कायदेकारांना का घालावी वाटली ह्यासंदर्भात.. कलम ८० च्या प्रोव्हिजन्सचा उद्देश दुहेरी आहे असे का मानू नये? ह्या कलमांचे स्कोप आणि ऑब्जेक्ट वरचे स्टेटमेन्ट मिळाले की टाकेनच ..

थॅन्क्स लंपन....

पारदर्शीपणाचा मुद्दा योग्यच. मलाही वेळोवेळी त्या त्या संस्थांकडून अगदी ताबडतोबीने [जागेवर तसेच बाय पोस्टानेसुद्धा] पावत्या मिळाल्या आहेत.... मिळतात. माझे मत इतपतच मर्यादित की ज्यावेळी कार्यालयाच्या अकौन्ट विभागाकडून 'इन्कमटॅक्स संदर्भातील गुंतवणूक/देणग्यांची नोंद अमुक एका तारखेच्या आत टेबलला पावत्यांच्या झेरॉक्ससह कळवा...' अशा आशयाचे इंटर्नल सर्क्युलर निघते त्या वेळी अशा देणग्यांच्या पावत्या जमा करणे मला अप्रस्तुत वाटते....म्हणून मी ते करत नाही. प्रतिसादात म्हटलेच आहे की माझे याबाबतीतील मत हे कृपया 'वैयक्तिक' समजावे.

८० सीसी प्रोव्हिजन्सचा उद्देश्य स्तुत्यच असणार हे उघडच आहे. त्यातील तरतुदींचा उपयोग टॅक्स लाभासाठी करून घ्यावा की न घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न....इतकेच.

अशोक पाटील

पण राग अशासाठी येतो की आपल्यासारख्या लोकांच्या जीवावर नेते, अभिनेते, अनेक उद्योग, (शेतकरी नव्हे) गबर होत रहातात स्वतः असंख्य प्रकारे कर चुकवून > कर भरल्याशिवाय हे बोलायचा नैतिक अधिकार आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी तरी कर भरावाच Wink

एक मात्र आहे रिटर्न भरताना सपोर्टिंग कागदपत्रे असतील ती सारी जरूर लावावीत...>> ह्याची काही गरज नाही. online तर लागत नाहित. तसेच आयकर कार्यालयात पण return घेताना सर्व जादाची कागद पत्रे परत देतात. अगदी form 16 पण.

एक मात्र आहे रिटर्न भरताना सपोर्टिंग कागदपत्रे असतील ती सारी जरूर लावावीत...>> ह्याची काही गरज नाही. online तर लागत नाहित. तसेच आयकर कार्यालयात पण return घेताना सर्व जादाची कागद पत्रे परत देतात. अगदी form 16 पण.>>>>>>>> हो परत देतात पण तुम्ही ज्या वेळी एखाद्या सी ए कडे पेपर्स देता त्यावेळेस सगळ्या डीटेल्स देणे गरजेचे असते त्यात तुमच्या बॅक अकाउंट्चा नंबर योग्य हवा जर तो चुकला तर रीफंड चा चेक परत जातो , तो परत मिळ्वताना खुप कट्कटी होतात , हा चेक ३ महिने च्या आत डिपोझिट करावा लागतो ,

अतिशय उपयुक्त असा विषय आहे.

माझे १९९१ साली रु.२,००,०००/- ला विकत घेतलेले घर आज रु.३०,००,०००/- ला विकले गेले.
तर मला आयकरात काय सूट मिळू शकेल. ती कशी मिळवता येईल. याबद्दलचे नियम कुणी उलगडून सांगेल का? त्याकरता आगाऊ (आधीच) धन्यवाद.

Pages