आयकर अर्थात इन्कम टैक्स संबंधित माहिती

Submitted by शुभंकरोती on 7 December, 2012 - 09:49

आयकर हा सामान्य नोकरीपेशा (कर्मचारी) वर्गाचा हमखास चर्चेचा विषय. तर ह्यात अनेक कायदे, नियम, उप नियम असतात. बरेच लोक नियमांबद्दल माहित नसल्याने ज्यास्त आयकर भरतात आणि जेव्हा कोणी सुज्ञ माहितीगार एखादा नियम कायदा नीट उलगडून सागतो, तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात येते. तो म्हणतो "(अरे गाढवा!!!) आधी विचारले का नाहीस. हम किसलिये बैठे हैं." तर अशा सुज्ञ जणांना विनंती करतो की त्यांनी माहीत नसलेल्या नियमांचे (आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या प्रश्नांचे) निरसन ह्या ठिकाणी करावे आणि पेचात पडलेल्यांना योग्य मार्गदर्शन करावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोळे काका

तुम्ही १९९१ ला खरेदी केली = २,००,०००

त्याची आजची इन्डेक्स व्हॅल्यु होते ( २०००००/१९९ * ८५२) = ८,५६,३००

म्हणजेच कॅपिटल गेन आला = २१, ४३, ७००

ह्याचाच अर्थ तुम्हाला ह्या कॅ.गे. वर २०% प्रमाणे ४,२८,७४० टॅक्स भरावा लागेल. हा जर वाचवायचा असेल तर

१.तुम्हाला हे २१ लाख रुपये दुसर्‍या घरा च्या खरेदी साठी वापरावे लागतिल किंवा

२. तुम्ही हे २१ लाख कॅपिटल गेन बाँड मधे ठेवु शकता. त्या साठी ३ वर्षांचे लॉक इन आहे. सध्या नॅशनल हायवे बोर्डाचे कॅ.गे. बाँड चालु आहेत. ह्या वर ६% इन्टरेस्ट मिळतो. मिळणार्‍या रकमे वर व रीडीम (३ वर्षांनी) केलेल्या रकमेवर कोणताही टॅक्स लागत नाही.

खूप खूप धन्यवाद मोहन की मीरा.

१.
अजून एक प्रश्न. समजा मला ४,२८,७४० टॅक्स भरून पैसा वापरास मोकळा करायचा असेल तर तो एकदम एकाच वर्षात भरावा लागतो की अनेक वर्षांत वाटून भरला जाऊ शकतो?

२.
घर खरेदीकरताच वापरावयाचा असल्यास, पुढील तीन वर्षांत घर घेईपर्यंत तो कॅगे खात्यातच ठेवावा लागतो की इतर बँक खात्यांत ठेवलेला चालतो ?

अपेक्षित उत्तरांखातर आधीच अनेक धन्यवाद!

अजून एक प्रश्न. समजा मला ४,२८,७४० टॅक्स भरून पैसा वापरास मोकळा करायचा असेल तर तो एकदम एकाच वर्षात भरावा लागतो की अनेक वर्षांत वाटून भरला जाऊ शकतो?>>>

त्या फायनांशियल वर्षात भरावा लागतो. म्हणजे ३१ मार्च आधी

घर खरेदीकरताच वापरावयाचा असल्यास, पुढील तीन वर्षांत घर घेईपर्यंत तो कॅगे खात्यातच ठेवावा लागतो की इतर बँक खात्यांत ठेवलेला चालतो ?>>>

इतर खात्यात ठेवलेला नाही चालत.

मला माझा पुने येथिल रहाता फ्लट विकुन येनार्या पैशामधे जमिन घेवुन व जरुर पड्ल्यास थोडे होमे लोन घेयुन घर बान्धायचे असेल तर येनार्या फायद्यावर कुठला कर भरवा लागेल का?

फ्लट २००९ मधे १२ लखाला घेतला असुन तो अन्दजे २० ते २२ लाखापर्य्न्त जान्याचि शक्यता आहे.

माझा हा १ च फ्लट असुन माझ्या अणि मिसेस च्या नावावर आहे.

मि NSC DEC 2012 KADHALE TYACHA FAYDA INCOME TAX VACHAVNYA KARTA KASA HOIL ?

टॅक्स रीफंड साधारण किती वेळात मिळायला हवा?
माझ्या सी ए च्या चुकीमुळे मला जास्त टॅक्स भरावा लागला होता. माझा सी ए तो मला पुढच्या महिन्यात मिळेल असे ऑक्टोबर पासुन सांगत आहे तो पुढचा महिना अजुन उगवला नाही. Sad

अमेरिकेत रहात असुन, जर भारतात काही उत्पन्न असेल (उदाहरण - घरभाडे) व त्यावर भारतात tax-returns भरले तर ते अमेरिकेतले tax-returns भरताना दाखवावे लागते असे कळले. ते काम बरेच किचकट आहे असेही ऐकले.
तसे कोणी केले आहे का? करावे लागेलच का?

Provident Fund चे मिळालेले पैसे दाखवन्यासाठी कोणता form (Saral 1/2/3) भरावा? मी salaried employee आहे.

Provident Fund चे मिळालेले पैसे दाखवन्यासाठी कोणता form (Saral 1/2/3) भरावा? मी salaried employee आहे.>>>>>

सरल १ = सॅलरी/ भाडे/ अदर सोर्सेस/ लॉटरी

सरल २ = मुख्यत्वे कॅपिटल गेन

सरल ३ = हा फॉर्म अस्तित्वात नाही

सरल ४ = प्रोफेशनल इन्कम / बिजनेस इन्कम

तुम्हाला सरल १ भरायला लागेल, कारण प्रॉव्हीडंट फंड हा "अदर सोर्सेस" मधे गणला जाइल....

मि NSC DEC 2012 KADHALE TYACHA FAYDA INCOME TAX VACHAVNYA KARTA KASA HOIL ?>>>>

सेक्शन ८०सी. मधे टॅक्स मधे रीबेट मिळेल. पण हा रुल फक्त NSC VIII Issue ला लागु होतो. नीट चेक करा. सॅलरीड असाल तर ताबडतोब तुमच्या ऑफिस मधल्या टॅक्स डीपा. कडुन चेक करुन घ्या.

टॅक्स रीफंड साधारण किती वेळात मिळायला हवा?
माझ्या सी ए च्या चुकीमुळे मला जास्त टॅक्स भरावा लागला होता. माझा सी ए तो मला पुढच्या महिन्यात मिळेल असे ऑक्टोबर पासुन सांगत आहे तो पुढचा महिना अजुन उगवला नाही.>>>>

ह्या लिंक वर आधी रीफंड स्टेटस चेक करा
https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html

तुमची असेसमेंट झाली आहे का ? कारण रुल खालील प्रमाणे आहे

Interest on delayed refunds.
243. 32[(1) If the 33[Assessing] Officer does not grant the refund,—
(a) in any case where the total income of the assessee does not consist solely of income from interest on securities or dividends, within three months from the end of the month in which the total income is determined under this Act, and
(b) in any other case, within three months from the end of the month in which the claim for refund is made under this Chapter,
the Central Government shall pay the assessee simple interest at 34[fifteen] per cent per annum on the amount directed to be refunded from the date immediately following the expiry of the period of three months aforesaid to the date of the order granting the refund.
Explanation.—If the delay in granting the refund within the period of three months aforesaid is attributable to the assessee, whether wholly or in part, the period of the delay attributable to him shall be excluded from the period for which interest is payable.]
(2) Where any question arises as to the period to be excluded for the purposes of calculation of interest under the provisions of this section, such question shall be determined by the 35[Chief Commissioner or Commissioner] whose decision shall be final.
36[(3) The provisions of this section shall not apply in respect of any assessment for the assessment year commencing on the 1st day of April, 1989 or any subsequent assessment years.]

मला मुलाचे (मायनर) पी.पी.एफ अकाउंट उघडायचे आहे तर त्याचे नियम काय आहेत?

एका आर्थिक वर्षात मी माझ्या आणि त्याच्या खात्यात प्रत्येकी १ लाख रुपये भरु शकतो? का दोन्ही मिळून एक लाख भरणे अपेक्शित आहे?... जर प्रत्येकी १ लाख दोन्ही खात्यात भरले तर त्यावर व्याज मिळेल का?

जालावरच्या वेगवेगळ्या साईट्स्वर वेगवेगळी माहिती असल्याने संभ्रमात पडलो आहे

मला मुलाचे (मायनर) पी.पी.एफ अकाउंट उघडायचे आहे तर त्याचे नियम काय आहेत?>>>>

जरी तुमच्या मुलाच्या (मायनर) च्या नावाने उघडले तरी ते गार्डियन च्या नावावरचेच धरले जाते. एका वेळी एका पी.पी.एफ. चे डिडक्शन मिळते. दोन अकाउंट्स चे नाही. त्या मुळे टॅक्स साठी बघत असाल तर काहीही उपयोग नाही.

बाकी नियम ज्या बँकेत खाते उघडायचे आहे तिकडे जाउन विचारा. प्रत्येक बँकेचे वेगळे नियम असतात....

धन्यवाद मीरा

टॅक्स डिडक्शन १लाखापर्यंत मिळेल हे समजले पण निदान प्रत्येक वर्षी मी एक लाख माझ्या आणि एक लाख मुलाच्या खात्यात भरू शकतो का? कारण टॅक्स डिडक्शन व्यतिरिक्त पी.पी.एफ हा सेविंग साठी पण मला सुरक्शित आणि चांगला पर्याय वाटतो...

बहुतेक वेळा बँकेतील लोकांना पण ह्याची निटशी माहिती नसते. महाराष्ट्र बंकेत तरी हाच अनुभव आला.. दोन जणांनी दोन वेगवेगळी उत्तरे दिली

प्रत्येक वर्षी मी एक लाख माझ्या आणि एक लाख मुलाच्या खात्यात भरू शकतो का? <<<< हो, भरता येतात. मी स्वतः भरते.

टॅक्स डिडक्शन १लाखापर्यंत मिळेल हे समजले पण निदान प्रत्येक वर्षी मी एक लाख माझ्या आणि एक लाख मुलाच्या खात्यात भरू शकतो का? कारण टॅक्स डिडक्शन व्यतिरिक्त पी.पी.एफ हा सेविंग साठी पण मला सुरक्शित आणि चांगला पर्याय वाटतो...>>>

हो त्याला काहीच आडकाठी नाही.... आणि बंधनही नाही... म्हणजे दोन मुले असतिल आणि दोघांचा अकाउंट + स्वतः चा अकाउंट अशी कशीही बचत तुम्ही करु शकता....

अमेरिकेतल्या लोकांसाठी हा प्रश्न आहे.
जेव्हा इथल्या मित्र-मैत्रिणींचे आई-वडील/सासू-सासरे भेटीसाठी अमेरिकेत येतात आणि ६ महिने राहतात तेव्हा काही मित्र त्यांना आपल्यावर डिपेंडन्ट दाखवून भरपूर टॅक्स क्रेडिट मिळवतात. इन फॅक्ट त्यांचा प्रवास, मुक्काम ताणून ताणून असा काही प्लॅन करतात की त्या कोणत्याशा टॅक्स लूपहोलचा जास्तीत जास्त फायदा मिळावा. आणि मग तिकीटे वगैरे त्यानुसार बुक केली जातात. आम्ही हे कधीही केलं नाही. नवर्‍याच्या मते हे क्रेडिट घेणं चूक आहे कारण ते आपल्या घरी राहात असले तरी अवलंबून नसतात. मला स्वतःला हे पटतं. पण फायदा करून घेणारे मित्र हे सर्रास करतात आणि जे करत नाहीत त्यांना मूर्ख ठरवतात. कुणाला यातील अधिक माहिती आहे का?

यंदाचे इ-फाईल करून झाले एकदाचे !!!

यंदा आधार क्रमांक हा पॅनकार्डाशी लिंक करून आधाराच्या रेजिस्टर्ड फोन नं वर ओटीपी आला. त्यामुळे अ‍ॅक्नॉलेजमेंटची प्रिंट काढून स्पीडपोस्टाने बेंगुळुरुला पाठवण्याचे कष्ट वाचले.

H&R Block वाले २९९ रुपये + कर मध्ये IT Return भरुन देतात.<<< याची आता काहीच गरज नाहीये
आता खुप सोप्पे केले आहे रिटर्न भरणे.

फॉर्म १६ चा डाटा तिथेच उपलब्ध करुन दिला आहे, उत्पन्नाचा पगारा व्यतिरिक्त अन्य काही स्त्रोत नसेल तर काही क्लिक्स वर रिटर्न फाइल करता येते

एम्प्लॉयर पेरोल टीमने पाठवलेले इन्व्हेस्टमेंट प्रूफ सबमिट करायच्या मेल्स कडे दुर्लक्ष केल्याने मोठ्ठा टॅक्स कापला गेला आहे jan२२ सॅलरी मध्ये. आता काय करू?

TDS अजून जमा केला नसेल तर प्रूफ पाहून रिफंड करणं त्यांना शक्य व्हावं. पण हे पूर्णपणे त्यांच्याच हातात आहे.

नाहीतर मग रिटर्न फाइल करून रिफंड क्लेम करणं. आजकाल रिफंड लवकर मिळतो.

भरत ह्यावर्षी अजून निघाले नाहीत बहुदा रिफन्ड. सप्टेंबर मध्ये भरलाय रिटर्न आता फेब उजडलाय. बरीच वर्षे वेळेत म्हणजे 2 एक महिन्यात येत होता.

तो डिसेंबरमध्येच कंपनीने भरला असेल. पुढच्या वर्षी (२०२२ सप्टेंबर उजाडेल.) कारण टिडीएस सर्टिफिकेटे,२६as करेपर्यंत वेळ जातो.
------
ह्यावर्षी अजून निघाले नाहीत बहुदा रिफन्ड
. .
इमेल्स पाहा. इ वेरिफिकेशन पाठवले का?

आधारच्या फोनला आलेला ओटिपी पाठवणे झाल्यावर रिटन assessed successfully हा मेसेज येऊन गेला का?हे important. आला असेल तर त्यांच्या आकडेवारीने रिफंड नसेल.

मग बँक अकाउंटला रिफंड इसीएस झाल्याचा मेसेज. ?

F.Y. 23-24 (A.Y. 24-25)
तुम्हाला Old / New जी scheme beneficial आहे ती opt करू शकता. दोन्ही schemes मध्ये annually switch करू शकता.
New regime मध्ये (1 एप्रिल 2023 पासून) Basic exemption limit Rs 2,50,000 वरून Rs 3,00,000 अशी वाढवली आहे.
• Up to Rs.3 lakh: Nil
• Rs.3 lakh-Rs.6 lakh: 5%
• Rs.6 lakh-Rs.9 lakh: 10%
• Rs.9 lakh-Rs.12 lakh: 15%
• Rs.12 lakh-Rs.15 lakh: 20%
• Above Rs.15 lakh: 30%
Rebate ची लिमिट 5,00,000 ऐवजी 7,00,000 आहे.
आधीच्या New regime (मार्च 2023 पर्यंत) सारखंच आताच्या New regime मध्ये बरेच deductions allow केलेले नाहीत.
(पण Salary वालं 50,000 चा Standard deduction allow केलंय)

Pages