कुणी जरासे दु:ख द्या उसने मला...

Submitted by हर्षल_चव्हाण on 10 December, 2012 - 08:30

कुणी जरासे दु:ख द्या उसने मला,
जगण्यावर माझा जीव नाही राहिला...

दगडाचा देव फक्त नावापुरता,
शेंदरासही जुना भाव नाही राहिला...

तोंडावरती रंग फासूनी निघालो,
ओळखीचा कुणाच्या लोभ नाही राहिला...

जगबूडी होणार, का ते मी सांगतो,
नियंत्यासही त्याचा मोह नाही राहिला...

इतके सगळे पाहुन झाले आता,
डोळ्यांवर स्वप्नांचा ताण नाही राहिला...

विसावलो मी काट्यांच्या शय्येवरती,
घडलेल्या श्रमांचा शीण नाही राहिला...

कुणास ठावे कसे जगावे-मरावे?
सुखातही अन् माझ्या राम नाही राहिला...
===============================
हर्षल (१०/१२/१२ - सायं ६.५०)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दगडाचा देव फक्त नावापुरता,
शेंदरासही जुना भाव नाही राहिला...

तोंडावरती रंग फासूनी निघालो,
ओळखीचा कुणाच्या लोभ नाही राहिला...

या दोन द्वीपदी आणि शेवटची फार आवडली.

गझल होता होता राहिली... Happy