कोण मला बळ पुरवत आहे...

Submitted by वैभव देशमुख on 8 December, 2012 - 05:02

कोण मला बळ पुरवत आहे
मी खडकातुन उगवत आहे

गोंगाटात उभा आहे पण
आत समाधी लागत आहे

तरूतरूवर दिवे फुलांचे
तरूतरू तेजाळत आहे

ऊन बरसले माझ्यावरती
जितकी त्याची ऐपत आहे

कोण अंतरी आहे माझ्या
मी कोणाला पाहत आहे

तुझेच घरटे गळके नाही
ताजमहालहि ठिबकत आहे

- वैभ देशमुख

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल अप्रतिम!

कोण मला बळ पुरवत आहे
मी खडकातुन उगवत आहे....व्वा!

गोंगाटात उभा आहे पण
आत समाधी लागत आहे...क्या बात!

तरूतरूवर दिवे फुलांचे
तरूतरू तेजाळत आहे..आहाहा... अफाट कल्पनाशक्ती

ऊन बरसले माझ्यावरती
जितकी त्याची ऐपत आहे....क्या अ‍ॅटीट्युड है!

कोण अंतरी आहे माझ्या
मी कोणाला पाहत आहे.......हा तुलनेत थोड्डासा कमी पडलाय असे वाटले (वै.म. गै. न.)

तुझेच घरटे गळके नाही
ताजमहालहि ठिबकत आहे...वा वा वा !

आवडली गझल !
खूप दिवसांनी तुमची गझल वाचायला मिळाली
बेफीजींचीही याच जमीनीत गझल बेफीकीरीत वाचलेली ; बहुधा अशी होती ............

काळ मरण-बी पिकवत आहे
वेग न कळण्याइतपत आहे

पुनरागमनाबद्दल धन्स

ऊन बरसले माझ्यावरती
जितकी त्याची ऐपत आहे

कोण अंतरी आहे माझ्या
मी कोणाला पाहत आहे

तुझेच घरटे गळके नाही
ताजमहालहि ठिबकत आहे

खूप सखोल. लेखन शुभेच्छा.

कोण मला बळ पुरवत आहे
मी खडकातुन उगवत आहे

ऊन बरसले माझ्यावरती
जितकी त्याची ऐपत आहे

तुझेच घरटे गळके नाही
ताजमहालहि ठिबकत आहे

>>>> जबरदस्त !!

ऊन बरसले माझ्यावरती
जितकी त्याची ऐपत आहे

कोण अंतरी आहे माझ्या
मी कोणाला पाहत आहे

तुझेच घरटे गळके नाही
ताजमहालहि ठिबकत आहे

<<<

व्वा

झकास Happy

वैभवराव, छान आहे तुमची गझल!
शेर नंबर १, २, ५ व ६ असे लिहून पाहिले........
शेर नंबर १.......
कोण इथे मज रुजवत आहे?
मी खडकातुन उगवत आहे!

शेर नंबर २.......

गोंगाटाने जरी घेरले,
सूर आतला लागत आहे!

शेर नंबर ५........

आरशातली प्रतिमा पुसते.....
मी कोणाला पाहत आहे?

शेर नंबर ६...............

महाल किंवा असो झोपडी......
ओल सारखी ठिबकत आहे!

...............प्रा.सतीश देवपूरकर

Lol

आदरणीय देवपूरकरजी,
आपणास माझी समज/उमज कळालेली आहेच. तेव्हा भविष्यात पर्याय देण्याची तसदी घेऊ नका..... ही विनंती !

देशमुख सर इतक्या दिवसांनी आलेत पुनरागमन करून
लोक अक्षरशः अधाशासारखी वाट पाहतात त्यांच्या गझलची आता त्याना काय पिटाळून लावणार आहात काय देवपूरकर सर!!

कुणालतरी सोडत जा की राव ...........

मी एक शेर तुमच्यावरही केलाय माझ्या रचनेत .........

एक वाक्यच सांगुनी शिकवीन पर्यायी गझल
शेर असुदे कोणताही भादरावे लागते

अधिक तपशीलासाठी लिंक पहा .......
http://www.maayboli.com/node/39438

धन्यवाद

तुमचाच
~नवाच एक कुणीतरी