कोण मला बळ पुरवत आहे

कोण मला बळ पुरवत आहे...

Submitted by वैभव देशमुख on 8 December, 2012 - 05:02

कोण मला बळ पुरवत आहे
मी खडकातुन उगवत आहे

गोंगाटात उभा आहे पण
आत समाधी लागत आहे

तरूतरूवर दिवे फुलांचे
तरूतरू तेजाळत आहे

ऊन बरसले माझ्यावरती
जितकी त्याची ऐपत आहे

कोण अंतरी आहे माझ्या
मी कोणाला पाहत आहे

तुझेच घरटे गळके नाही
ताजमहालहि ठिबकत आहे

- वैभ देशमुख

Subscribe to RSS - कोण मला बळ पुरवत आहे