प्रवास.....

Submitted by Anvay on 5 December, 2012 - 01:30

ती आणि तो रेल्वे स्टेशनवर ..
निशब्द शांततेत दोघे स्टेशनच्या पायऱ्या उतरू लागले. गाडीची वेळ होत आली होती. रेल्वेत बसल्यानंतर तिने एकवार त्यच्याकडे पहिले. तोही तिच्याकडेच बघत होता, पण आज त्याचे मन थाऱ्यावर नव्हते. काही समजत नव्हते. किती वर्षांची मैत्री ती पण असे कधी जाणवले नाही त्याला.
गाडी सुरु झाली. तिला ओझरते बघितले आणि त्याने वळून चालायला सुरुवात केली. पण न जाणो ती पावले आज एवढी का जड वाटत होती ? काहीतरी मागे राहिले होते वा हातातून निसटून जात होत होते .काहीतरी चुकत होते . पुन्हा एकदा मागे वळून पहिले तर गाडीने स्टेशन सोडले होते. तरीही त्या धूसर होणाऱ्या गाडीकडे पाहताना त्याला काहीतरी जाणवत होते ......

गाडीत बसल्यावर ....
गाडीत बसेपर्यंतची लगबग संपल्यानंतर तिने एकदा खिडकीतून बाहेर पहिले.तो गाडी निघाली तरी तिच्याकडेच पाहत होता. पण आज ते डोळे काही वेगळेच सांगत होते. तो एक फक्त मैत्रीचा ओलावा नव्हता. मग काय होते ? आता महत्वाकांक्षेची पूर्ती होताना आनंदी वाटण्या ऐवजी असे विचित्र का वाट आहे ह्याचे तिलाच आश्चर्य वाटत होते. गाडीने स्टेशन सोडले होते. वेळ जात होता पण मनाची अस्वस्थता कमी होण्या ऐवजी क्षणोक्षणी वाढतच होती .
वेळ का कोणासाठी थांबणार होता ? घड्याळाच्या फिरणाऱ्या काट्यान सोबत वेळही सरत होता आणि मनही धावत होते. सरत्या काळाचा मागोवा घेत होते आणि भूत काळातल्या घटनाची यादी डोळ्यां समोर येत होती. आणि ह्या सगळ्यांत तिचे स्टेशन कधी आले ते तिला कळलेच नाही ...

उत्तरार्ध ....
गाडी कधी स्टेशनवर लागली हे तिलाही कळले नाही . सामान घेऊन स्टेशनावर उतरल्यावरही तिची नजर कोणाला तरी शोधत होती. त्या स्टेशनवरच्या गर्दीतही तिला एकाकी वाटू लागले . जवळच असलेलेल्या बाकावर खिन्न मनाने तिने बसून घेतले. " आता विचार करून काय फायदा आपल्यालाच काळे नाही काय होते ते आणि त्यानेही कधी विचारले नाही पण त्याला तरी प्रेम आहे का की फक्त माझ्याच मनाचे हे खेळ आहे .पण आता काय उपयोग, का आपणच परत फिरावे आणि सांगावे त्याला?" विचारांच्या ह्या चक्रात असतानाच ट्रेन आल्याच्या सुचनेने तिची मान त्या दिशेला वळली . ट्रेन थांबली होती आणि त्या ट्रेन मधून तो उतरत होता, मग न जाणो काय ते पण ती त्याच्याकडे बघत धावत सुटली ... आणि एक नवा प्रवास सुरु झाला !!!

- अन्वय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेफ्री आर्चर ची "love at first sight" अश्या नावाची गोष्ट आहे. छोटुशी कथा. तीच आठवली.