प्रतीक्रीयेच्या उर्मीस आवरावे लागते

Submitted by योग on 28 November, 2012 - 03:50

(अर्थातच मूळ गझलेची माफी मागून..)

रोज एक कविता वाचावी लागते
प्रतीक्रीयेच्या उर्मीस आवरावे लागते

आशयाचे थेंब शब्दातूनी शोधायला
व्याकरण तुझ्या बटांसारखे सोडवावे लागते

यामुळे अभिप्रायात नाही फारसा दटावत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा घाबरावे लागते

रोज सकाळचा मी घाबरत ऊघडतो "विपू" जिथे
चालवतो रीक्षा त्याला कटवावे लागते

होइतो प्रत्यक्ष भेट मी तरी हे मानतो
डू आयडीच्या धोक्याचे पहावे लागते

ऊपक्रमासाठी नको पाठवूस तू तराणे
गातानाही गळ्याला आवळावे लागते

टाकली खरीखुरी प्रतिक्रीया की भीतीमुळे
किती गटगांना चुकवावे लागते

यापुढे अ‍ॅडमिन बहुधा याचसाठी राहिले
जे इथे लिहीशील ते ऊडवावे लागते

प्रत्येक बाफमध्ये असावा "कोड" एखादा जिथे
अनुल्लेखासाठी न काहीही करावे लागते

जुनेच लेखन कशाला लिहीत आहेस तू
"नवीन" म्हणून मात्र ऊघडावे लागते.

भरगच्च ऊपक्रमांमूळे दगड झालेली मने
एकमेकांना वाहवाईने सांभाळावे लागते

आज झाली दोन वर्षे करून तुला डायेटींग
"गणित"सोड, भूमितीस पहावे लागते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे हे जबरी !! प्रतिक्रियांचं प्रकरण इथवर आलं तर .... Happy

बाकी

आज झाली दोन वर्षे करून तुला डायेटींग
"गणित"सोड, भूमितीस पहावे लागते.............हे तर जामच आवडेश Happy

>>प्रत्येक लायनीच्या शेवटी 'हल्ली' हा शब्द घातल्याशिवाय ते गझलेचं कायसंस असतं ते येत नाहीये रे!
प्रतीसाद छान आहे पण कृ. वैयक्तीक पातळीवर ऊतरू नये.. (शेवटी "रे" घातल्याने) Happy

Lol

रोज सकाळचा मी घाबरत ऊघडतो "विपू" जिथे
चालवतो रीक्षा त्याला कटवावे लागते

हे तर जाम आवडेश !!