प्रतीक्रीया

प्रतीक्रीयेच्या उर्मीस आवरावे लागते

Submitted by योग on 28 November, 2012 - 03:50

(अर्थातच मूळ गझलेची माफी मागून..)

रोज एक कविता वाचावी लागते
प्रतीक्रीयेच्या उर्मीस आवरावे लागते

आशयाचे थेंब शब्दातूनी शोधायला
व्याकरण तुझ्या बटांसारखे सोडवावे लागते

यामुळे अभिप्रायात नाही फारसा दटावत तुला
की तुला स्वप्नातसुद्धा घाबरावे लागते

रोज सकाळचा मी घाबरत ऊघडतो "विपू" जिथे
चालवतो रीक्षा त्याला कटवावे लागते

होइतो प्रत्यक्ष भेट मी तरी हे मानतो
डू आयडीच्या धोक्याचे पहावे लागते

ऊपक्रमासाठी नको पाठवूस तू तराणे
गातानाही गळ्याला आवळावे लागते

टाकली खरीखुरी प्रतिक्रीया की भीतीमुळे
किती गटगांना चुकवावे लागते

यापुढे अ‍ॅडमिन बहुधा याचसाठी राहिले

Subscribe to RSS - प्रतीक्रीया