बँक - तक्रारीसाठी ग्राहक सेवा केंद्र

Submitted by सावली on 30 November, 2012 - 22:35

मी जुन मधे एक आयसिआयसिआय प्रु लाइफची पॉलिसी घेतली. फॉर्मवर व्यवस्थित नाव पत्ता लिहुन दिला, नावाचे प्रुफ म्हणुन पासपोर्ट दिला.
काही दिवसांनी पॉलिसी आल्यावर माझे नाव चुकीचे लिहीलेले आढळले. म्हणजे स्पेलिंग चुक नाही.
माझे नाव बदलेलेच नाही. नवा पासपोर्टही माझ्याच मुळ नावावर आहे आणि त्यात नवर्‍याचे नाव स्पाऊस म्हणुन घातलेले आहे.
बँकेच्या महान लोकांनी ते सर्व नजरेआड करुन माझे ' पहिले नाव + नवर्‍याचे पहिले नाव + नवर्‍याचे मधले नाव + नवर्‍याचे आडनाव ' असे बदलुन टाकुन पॉलिसी पाठवली !!
ती बदलुन घेण्यासाठी त्या एजंटने नवा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर इतक्या महिन्यातही मला पॉलिसी मिळालेली नाही. दरम्यान तो एजंट नोकरी बदलुन गेला. तरिही त्याला कॉल केला कि तो फॉलोअप करतोय. पन काहीच होत नाही.
काल कस्टमर सेंटरला तक्रार केली. तर त्यांचे इमेल आलेय कि त्यांनी २६ जुनला मला म्हणे एक पत्र पाठवले. त्या पत्रात काय होते ते त्यांनी लिहीलेले नाहीच. आणि म्हणे आता तुम्हाला ब्रँच मधे यावे लागेल. ते ठिक आहे पण त्यावर कहर म्हणजे २०० रुपयाच्या बाँड पेपरवर एक अ‍ॅप्लिकेशन द्या कि तुम्हाला डुप्लिकेट डॉक पाहिजे.
मी हे का करायचे? मला कधी ओरिजिनल डॉक्युमेंटच मिळाले नाहीये. आणि पत्ता बरोबर आहेच कारण पहिले पत्र आले होते.

आता याची तक्रार मला कुठे करता येईल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) आयसीआयसीआय प्रु लाइफ ही बँक नाही. खाजगी क्षेत्रातील इन्शुरन्स कंपनी आहे.
http://www.iciciprulife.com/ipru/GrievanceRedressal.jsp
इथे ऑनलाइन कंप्लेंट नोंदवून पहा.
तुमच्या जवळच्या(खरे तर ज्या ब्रांचमध्ये तुमचा पहिला फॉर्म/परत केलेली पॉलिसी जमा झाली होती, त्या ) ब्रँचमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटून समजावून सांगता आले तर पहा.
http://www.iciciprulife.com/public/default.htm इथे तळाला ब्रांच लोकेटर आहे.
२) तुम्ही ओरिजिनल पॉलिसी एजंटकरवी परत केली होती का? एजंटने पॉलिसी जमा करताना पावती घेतली होती का? तुम्हाला दिली का?
३) पहिल्यांदा पॉलिसी डॉक्युमेंट कशा प्रकारे पाठवली होती? रजिस्टर्ड पोस्ट/कुरियर? दुसर्‍यांदाही त्याच प्रकारे पाठवणे अपेक्षित आहे. पॉलिसी डॉक्युमेंट करेक्शन करून तुम्हाला परत पाठवले असे आयप्रुचे म्हणणे असेल तर त्याचा दाखला त्यांच्याकडे मागा. डिलिव्हरीचे प्रूफ मागा.

http://www.iciciprulife.com/public/About-us/Rights_and_Duties_of_the_Pol... यातील पहिल्या आणि सहाव्या क्रमांकावरची महिती तुमच्यासाठी विशेष उपयोगाची आहे.

हे थोडेसे अवांतर आहे.
३) पॉलिसी घेताना भरलेल्या मूळ फॉर्मची फोटोप्रत ठेवली आहे का? फॉर्म तुम्ही स्वतः भरलात की एजंटने भरून तुम्ही फक्त सही केलीत?( बहुसंख्य लोक असेच करतात.) तुम्ही स्वतः फॉर्म भरला असेल तर पॉलिसीहोल्डरचे नाव कसे लिहिले आहे हे तुम्हाला माहीत असेलच. एजंटने फॉर्म भरला असेल तर तुम्ही ते तपासून पाहिले असेल. (कृ.गैं. न.)

सिधी उंगलीसे अगर घी नही निकलता तो उंगली टेढी करणी चाहिये...या फिर उस घी को इतना गरम करना चाहीये की वो आसानी से निकले...
.
.बघा काय जमते या पैकी.... प्रेमाची भाषा कमी करा जरा खमका दाखवा... बरोबर लायनी वर येतील..

३) पॉलिसी घेताना भरलेल्या मूळ फॉर्मची फोटोप्रत ठेवली आहे का? फॉर्म तुम्ही स्वतः भरलात की एजंटने भरून तुम्ही फक्त सही केलीत?( बहुसंख्य लोक असेच करतात.) तुम्ही स्वतः फॉर्म भरला असेल तर पॉलिसीहोल्डरचे नाव कसे लिहिले आहे हे तुम्हाला माहीत असेलच. एजंटने फॉर्म भरला असेल तर तुम्ही ते तपासून पाहिले असेल. (कृ.गैं. न.)
>> आयसीआयसीआय इन्शुरन्स कंपनी पॉलिसीचे कागद पाठ्वताना फॉर्मची फोटोकॉपीपण पाठवत असतीलं.. तसा नियम असावा.. मला म्युचल फंड्चे असे सर्टिफिकेट आणि फॉर्मची फोटोकॉपी मिळाली आहे... आयसिआयसिआय इन्शुरन्स कंपनीचा अनुभव नाही.. शक्यतो इन्शुरन्स कंपनी सरकारी बघावी... ४५ दिवस (नेमकं किती दिवस ते माहिती नाही) झाले नसतील तर परत करावी..

मयेकर, राजू७६, उदयन , उत्तराबद्दल धन्यवाद. Happy

ऑनलाइन कंप्लेंट नोंदवून पहा.>> हो तिथेच नोंदवल्यावर ते ड्युप्लिकेट मागुन घेण्याबद्दलचे उत्तर मिळाले आहे.

२) तुम्ही ओरिजिनल पॉलिसी एजंटकरवी परत केली होती का? एजंटने पॉलिसी जमा करताना पावती घेतली होती का? तुम्हाला दिली का? >> हो प्रुलाईफचा एजंट. पावती दिली नव्हती. मागितल्यावर तो म्हणाला होता कि काही गरज नाही.

पहिल्यांदा पॉलिसी डॉक्युमेंट >> कुरियरने. हो आता पुन्हा पाठवण्याचे प्रुफ मागते.

पॉलिसी घेताना भरलेल्या मूळ फॉर्मची फोटोप्रत ठेवली आहे का? फॉर्म तुम्ही स्वतः भरलात की एजंटने भरून तुम्ही फक्त सही केलीत?( बहुसंख्य लोक असेच करतात.) तुम्ही स्वतः फॉर्म भरला असेल तर पॉलिसीहोल्डरचे नाव कसे लिहिले आहे हे तुम्हाला माहीत असेलच. एजंटने फॉर्म भरला असेल तर तुम्ही ते तपासून पाहिले असेल. (कृ.गैं. न.) >>>
मी फोटोप्रत ठेवली नाही ही माझी चुकी आहे. पण अर्धा फॉर्म मी भरला होता. नाव कोणी लिहीले ते आठवत नाहीये. पण जे लिहीले होते ते बरोबर होते. ( राजू७६ म्हणतात त्याप्रमाणे पॉलिसीबरोबर फॉर्मची कॉपी जोडलेली होती. त्यातही मी चेक केले होते. ) गै.स नक्कीच नाही. चुकीची पॉलिसी पाहिल्यावर मी ही हेच आधी पाहिले होते.

आयसिआयसिआय इन्शुरन्स कंपनीचा अनुभव नाही.. शक्यतो इन्शुरन्स कंपनी सरकारी बघावी... >> हे इन्श्युरन्सपेक्षा कमीवेळाची इन्व्हेस्टमेंट म्हणुन केलेली छोटी पॉलिसी आहे. कव्हरेज जास्त नाही.
४५ दिवस (नेमकं किती दिवस ते माहिती नाही) >> कंपनीप्रमाणे बदलते.

तो उंगली टेढी करणी चाहिये...या फिर उस घी को इतना गरम करना चाहीये की वो आसानी से निकले...>> हेच कसे करयाचे ते विचारायचे आहे. कुठे तक्रार करावी? किमान कुठे तक्रार करणार अशी धमकी द्यावी?

तुम्ही बरोबर असाल, तुमची काही चूक नसेल तर, ग्राहक न्यायलयात जावा.. मागे पुढे पाहू नका..
खर्च म्हणाल तर फार फार ३००-४०० रु.

मी कोटक, एअरटेल व व्होडाफोन यांना खेचला आहे व यशस्वी पणे केस जिंकलो देखील आहे.

चुकीच्या नावाने आलेली पॉलिसी तुमच्याकडेच आहे का..
खरे तर त्या एजंटने तात्काळ बदल करुन दिला पाहिजे होता.. त्यासाठी पुन्हा फॉर्म कशाला भरुन घेतला.. आम्ही कर्जविभागवाले जेव्हा ग्राहकांच्या घराची पॉलिसी काढतो.. तेव्हा तिथे असाच नावाच्या फेरबदलाचे वा टायपो मिस्टेकचे प्रकार घडतात.. अशी चुक आढळल्यास तात्काळ फोनवरुनच सांगून दुसरी फेरबदल केलेली पॉलिसी मागवून घेतो.. माझ्यामते थोडा फॉलोअप ठेवावा.. ब्रांचमध्ये जाउन आपण कुठल्याही परिस्थितीत भुर्दंड भरायचा नाही हे लक्षात ठेवून वरच्या आवाजात संवाद करा... दखल घेतली जाईल बहुदा... अन्यथा तिथूनच थेट मॅनेजरच्या केबिनची वाट धरा..

बेंक मॅनेजर कडे तक्रार कराच पण त्यांच्या संकेतस्थळावरुन पण तक्रार करा.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या साईट वरुन मी तक्रार केली त्यावेळी उच्चपदस्थ अधिका र्‍यांनी त्वरीत दखल घेउन तक्रार निवारणसाठी मदत केली.

सावली.. ग्राहक न्यायालय सर्वात सोपा पर्याय. त्या संदर्भात माहिती हवी असेल तर ठाण्यात राजीव फलटणकर म्हणून माझे ओळखीचे स्नेही आहेत. ते तुला कायदेशीर प्रक्रिया नीट समजावून सांगू शकतील. त्यांना नंबर तुला मेल करतो. Happy

<<मला म्युचल फंड्चे असे सर्टिफिकेट आणि फॉर्मची फोटोकॉपी मिळाली आहे..>>

राजू७६, कोणत्या म्युचल फंड हाउसकडून सर्टिफिकेट आणि फॉर्मची कॉपी मिळाली?

सावली, तुमच्या उत्तरावरून असे वाटते की प्रुलाइफ तुमची परत पाठविल्याचे म्हणत आहेत. १) ती करेक्शन करून पाठविली की न करता पाठविली हेही विचारा.
२) कुरियरने पाठविली असेल तर डिलिव्हरीची माहिती+प्रूफ मागा. ही माहिती फोनवरून/ब्रांचमध्ये जाऊन मागता आली तर पहा.

http://www.iciciprulife.com/ipru/GrievanceRedressal.jsp या लिंकवर दिलेली पहिली स्टेप तुम्ही पार केली आहे. तेव्हा गायत्री नाथन यांना इमेल पाठवून दहा दिवस वाट पहा.त्या इमेलमध्ये वर दिलेले दोन्ही मुद्दे लिहा. या लिंकमध्ये दिलेल्या माहितीवरून प्रुलाइफला त्यांच्या ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टमबद्दल चांगलाच कॉन्फिडन्स आहे असे दिसते.

<<<२) तुम्ही ओरिजिनल पॉलिसी एजंटकरवी परत केली होती का? एजंटने पॉलिसी जमा करताना पावती घेतली होती का? तुम्हाला दिली का? >> हो प्रुलाईफचा एजंट. पावती दिली नव्हती. मागितल्यावर तो म्हणाला होता कि काही गरज नाही.>>> आँ? तुम्ही स्वतः जर ते डॉक्युमेंट जमा करायला गेला असता, तर पावती घेतली असती की नाही? ग्राहक न्यायालयात गेलात तर तुमच्याकडे काय प्रूफ आहे पॉलिसी परत केल्याचे?

<हे इन्श्युरन्सपेक्षा कमीवेळाची इन्व्हेस्टमेंट म्हणुन केलेली छोटी पॉलिसी आहे. कव्हरेज जास्त नाही> याबद्दल तुम्ही विचारलेले नाही, पण एक आगाऊ सल्ला. Keep your insurnace and investments separate. Have you ascertained how much costs have been recovered from your policy? Of it, how much was the agent commission?

>ग्राहक न्यायालय हा सगळ्यात सोपा पर्याय आहे./खर्च म्हणाल तर फार फार ३००-४०० रु.: नीट फॉलोअप केले आणि पॉलिसी डॉक्युमेंट गहाळ झाले नसेल तर एकही पैसा खर्च न करता तुमचे काम व्हायला हवे. पॉलिसी मॅच्युअर व्हायच्या आत ग्राहक न्यायालयातून तुमच्या केसचा निकाल लागेलच का? ग्राहक-न्यायालयात जाण्याची धमकी मिळाली की, कटकट नको म्हणून किंवा घाबरून, बिनबोभाट हवी ती सेवा देऊन टाकायची अशी काही संस्थांची पॉलिसी असल्यास माहीत नाही. कंझ्युमर फोरमप्रमाणेच इंश्युरन्स कंपन्यांनी Insurance Ombudsman ला अणि म्युचल फंड्सनी सेबीला घाबरावे अशी अपेक्षा असते.

राजू७६, कोणत्या म्युचल फंड हाउसकडून सर्टिफिकेट आणि फॉर्मची कॉपी मिळाली? >>
आयसीआसीआय म्युचल फंड हाउस

>ग्राहक न्यायालय हा सगळ्यात सोपा पर्याय आहे./खर्च म्हणाल तर फार फार ३००-४०० रु.: >> माझ्यामते ग्राहक न्यायालयात सरळ जाता येत नाही.. प्रत्येक कंपनीची Complaint/ Grievance Redressal ची process असते... (भरत मयेकरनी लिंक दिली आहे) पहीली साधी Complaint.. नंतर समाधान नाही झाले तर Branch Manager, नंतर Zonal Manager ( Complaint Redressal) आणि अजून पुढे... कंपनीला प्रत्येक तक्रारची दखल घेऊन त्याचे ठरवलेल्या दिवसांनुसार निवारण करावेच लागते... हे जर केले नाहीतर ग्राहक न्यायालयात जाऊन फायदा नाही.. आणि कंपनीची Complaint/ Grievance Redressal process पूर्ण करुनही समाधान/ तक्रारनिवारण समाधानकारक झाले नाही तर मग पुढे ग्राहक न्यायालय...

हेच कसे करयाचे ते विचारायचे आहे. कुठे तक्रार करावी? किमान कुठे तक्रार करणार अशी धमकी द्यावी?>>
१. प्रथम तुम्ही सगळे follow-ups आणि त्याचे प्रूफ गोळा करा
२. कंपनीच्या वेबसाइट/ कॉल सेंटरवरुन Complaint/ Grievance Redressal ची process माहिती काढा
३. तुम्ही Complaint/ Grievance Redressal ची process नुसार तुमचा follow-ups पडताळून बघा... आणि पुढे Complaint/ Grievance Redressal ची process नुसार follow-ups चालू ठेवा
४. टिप्स - ४.१ कॉल सेंटरवरच्या संभाषणाचा Complaint/ Reference/ Incident no घ्या, ४.२ email करताना सगळ्या Stakeholders (पहिल्या तक्रारमध्ये कोणी नाही, दुसर्यामध्ये कॉल सेंटर, तिसर्यामध्ये कॉल सेंटर आणि ब्रॉच मॅनेजर ..) ना include करा .. ४.३ तारखेवार follow-ups ची माहिती द्या ४.४ कंपनीने ठरवलेल्या दिवसांनुसार निवारण झाले नाहीतर follow-up करुन Complaint/ Grievance Redressal ची process पुढची पायरी चढायची..

जरा डिटेल्सम्ध्ये लिहिलं पण हा फॉम्युला आयसीआयसीआय, SBI, LG, Reliance इथे उपयोगी पडला...ग्राहक न्यायालयात जावेच लागले नाही..

राजू७६, काही लोक(ग्राहक) पहिल्या पायरीनंतर सरळ ग्राहक मंचाकडे धाव घेतात. आपल्याला आलेले उत्तर विचारातही घेत नाहीत. काही प्रसंगात अपेक्षित सेवा मिळालेली असते,पण ती विलंबाने मिळाल्याने मानसिक त्रास, आर्थिक नुकसान.इ.इ. झाले हेही कारण चालते. ग्राहक मंचाकडे जाण्यापूर्वी अमक्या अमक्या प्रक्रिया पूर्ण केल्याच पाहिजेत असा काही नियम नाही. तक्रार करूनही समाधानकारक सेवा मिळाली नाही हे कारण पुरेसे ठरते.
म्युचल फंड्स अ‍ॅप्लिकेशन फॉर्मची कॉपी पाठवतात हे माझ्यासाठी नवीन आहे. गेली अनेक वर्षे म्यु.फ. सर्टिफिकेट्सही न पाठवता फक्त स्टेटमेंट ऑफ अकाउंट पाठवतात.
इन्शुरन्स हा पॉलिसीधारक आणि इ.कं. यांच्यातला एक करार असल्याने त्याची एक प्रत पॉलिसीधारकाला पाठवली जात असावी.

ग्राहक मंचाकडे जाण्यापूर्वी अमक्या अमक्या प्रक्रिया पूर्ण केल्याच पाहिजेत असा काही नियम नाही >> हो बरोबर आहे असा काही नियम नसेलही. पण असे करणे आपल्या फायद्याचे आहे आणि ही स्टँडर्ड प्रोसेजर आहे.

डायरेक्ट ग्राहक न्यायालयात ज्यायचे नसते. (काही विषेश अपवाद वगळता) . आधी समोरच्या व्यापरी व्यक्ती / संस्थेला आपली तक्रार निवारण्यासाठी पुर्ण संधी द्यावी लागते.

कोर्टात जसे हे सिद्ध करावे लागेल की कंपनीने आमचे नुकसान केले आहे किंवा फसवले आहे त्याचबरोबर हे पण कोर्टाच्या निदर्शनास आणुन द्यावे लागेल की आम्ही आमच्या परीने कंपनीला काँटॅक्ट केला होता पण तरीही कंपनीने आम्हाला मदत केली नाही.

ग्राहय न्यायायात जाण्याआधी राजू७६ यांनी दिलेल्या स्टेप्स फॉलो केल्या तर त्या आपल्या जमेच्या बाजु ठरतात आणि तसे करन्याबद्दल ग्राहक न्यायालयानेच सांगीतलेले आहे त्यांच्या प्रोसिजर मधे असे मी कुठे तरी वाचल्याचे आठवते.

धन्यवाद लोकहो.
मयेकर यांनी दिलेल्या लिंकवर आधीच तक्रार केली होती.
मी परवा ब्रँच मधे गेले. तिथे आता असलेल्या एजंटला सगळे सांगितले. तेव्हा त्याने पुन्हा ते २००रु भरायला कुठल्याशा बँकेत जा वगरे सांगायला सुरुवात केली. तेव्हा आवाज चढवला . पॉलिसी डॉक द्या नाहीतर माझे भरलेले पैसे आणि त्यावर ९.५% व्याज परत द्या. नाहीतर मी तक्रार करणार असे सांगितले. मॅनेजरकडे भेटायला जाते म्हणाल्यावर तोच जाऊन आला आणि म्हणाला की तुम्ही एक अर्ज लिहुन द्या. आम्ही दहा दिवसात पॉलिसी रिप्रिंट करुन देतो. आता अर्ज दिला आहे. त्यावर अ‍ॅकनॉलेजमेंटपण घेतलीये. दहा दिवसात नाही मिळाली तर पुन्हा जाईन.
इथे अपडेट्स देईनच.

वेलडन सावली. आत्ता वाचला धागा. बरोबर सल्ले आहेत. आवाज चढवणे (योग्य पट्टीत) आणि धमक्या देणे एव्हढ्यावरच काम होऊन जाईल.

ग्राहकमंच हा उत्तम पर्याय आहे

I am just curious. प्रुलाइफवाल्यांची प्रोसिजर्स आवाज चढवणार्‍या ग्राहकांसाठी वेगळी आणि आवाज न चढवणार्‍या ग्राहकांसाठी वेगळी असतात का? की मॅनेजरला सगळ्या बाबतीत डिस्क्रेशनरी पॉवर्स आहेत? नुसता आवाज चढवून काम भागले याचा अर्थ पॉलिसी डॉक्युमेंट्स पुन्हा पाठवल्याचे प्रूफ त्यांच्याकडे नाही, असा असावा का?

सावली, तुमच्या मूळ पॉलिसीचे काय झाले ते कळले का? रेकॉर्डमधील तुमचे नाव त्यांनी सुधारले आहे का? पॉलिसी बदलून/ न बदलता परत पाठवली होती का?

सावली पॉलिसी कंटिन्यु केलीत का?
आयसीआयसीआय वाले सारखे आयसीआयसीआय प्रु लाइफ पॉलिसी घेण्याबाबत विचारत आहेत म्हणुन विचारतेय तुमचा अनुभव.
इतर कोणी घेतलीय का ही पॉलिसी?

अभि१ धन्यवाद.

HDFC ची पण सारखीच इन्वेस्टमेंन्ट कम इन्शुरन्स पॉलिसी आहे. आजच फोनवर डोके खाल्ले त्यांनी.