रुखवत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2012 - 03:33

नणंदेच्या लग्नात आम्ही ठेवलेली रुखवत. काही प्रकार घरी केले तर काही विकत आणले.

(वरील मण्यांचे तोरण माबोकर योगिता हिच्याकडून मागवले होते.)

बैलगाडी

ह्यात खोबर्‍याचे कासव, लाईफबॉयच्या साबणात कोरलेले कपाट व हत्ती, अकोर्ड व सुपारीचे तबला व सनईवाले आहेत. हे ऑर्डर ने करुन मागवले होते.

मी लोणची व कोरड्या चटण्यांचे पाच पाच प्रकारही बरणीत भरुन दिले होते.

रुखवतीसाठी केलेली लोकरीची टोपली.

साहित्य : दोन ते ३ रंगाचे लोकरीचे धागे.
खराट्याच्या ३ मोठ्या काड्या.

ही उलटी टोपली अशी दिसते.

रुखवतीचे इतर प्रकार.
अक्रोडची समई - http://www.maayboli.com/node/40449

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मितु धन्यवाद.

दिनेशदा ही आयडीया मला अर्धे झाल्यावर लक्षात आली होती.

दिपाली मी ती पण करायचा विचार करत आहे.

दिपाली अग मी मुंबईत राहत नाही. पण दादरला आयडीयल बुक डेपो च्या लाईनला दुकाने आहेत तिथे असे सामान मिळते.

सोनेरी तारा, सोनेरी छोटी पाने आणि मणि यांचा मस्त गोल्डन ट्री करता येतो. आणि पटकन पण होतो. अगदी एका दिवसात.
http://www.webindia123.com/craft/asp/craft.asp?c_id=111

व्वा! जागू, छान झालेय टोपली. तुला वेळ असेल तेव्हा, नक्की कशी केलीस ते पण सांग.(इमेल करून') Happy

अजुन काही रुखवतीचे सोपे कलाकुसरीचे प्रकार असल्यास नक्की सांगा.>>>>>>>>जागू, मी जी लोकरीची फुले करते, त्यांचा रूमालही करता येतो. Happy

कांचन अग ही साईट मला ३-४ दिवस आधी मिळाली असती तर बर झाल असत. ह्याची ऑरडर मी बाहेर दिली. धन्स अजुन काही असेल तर प्लिज सांग.

शोभा नक्की सांगेन तुला.

अग ती लोकरीची फुले मलाही येतात करता. वर टोपलीच्या टोकांना मी तिच चिकटवली आहेत. रुमाल कसा करायचा ते सांग लवकर.

जागु, तुला आईस्क्रिमच्या काड्यांचे घर कसे करायचे माहीत आहे का? एकमेकावर काड्या ठेउन बेस करावा. त्याला ४ काड्या उभ्या लाऊन त्यावर छत करावे. तुला पाहीजे तर मी १-२ दिवसाने दाखवीन.
तर असे घर करुन घ्यावे. थर्मोकोलचा एका चौकोनी मोठा बोर्ड घेऊन त्याला हिरवा रंग लावावा. म्हणजे ते झाले लॉन. त्यावर ते घर ठेवावे. काही काड्या कापुन त्या थर्मोकोलच्या बाजुला लावुन कुंपण कर. लॉन मधे काड्यांचा झोपाळा, बाक कर. क्लेचा वापर करुन छोट्या कुंड्या कर.... असे जसे पाहिजे तसे सजव.... मी माझ्या बहिणीच्या रुखवतासाठी केले होते. खुप छान झालेले.
आमच्यात रुखवतात बेसनचा थाळा करतात. लाडावाचे बेसन थाळ्यात पसरुन त्यावर वेगवेगळी सजावट करायची.....वधु-वराचा हात गुंफलेले दाखवायचे... किंवा ... कलश दाखवायचा... किंवा इतर फुलांपानाची सजावट करायची.... हे सर्व खायचे रंग, गोळ्या वापरुन करायचे. खायचे रंग वापरुन पेंटीगही करता येईल.
बिस्कीटाची माळ, कानातले... मारी बिस्कीटाचा लामणदिवा... सप्तपदी....असे बरेच प्रकार करता येतील.

टोपली खुपच सुंदर झाली आहे.
रुखवतासाठी एक प्रकार - सुपारींचे भटजी छान दिसतात व करायलाही सोपे आहेत. एखादा पुठ्ठ्याचा बेस घ्यावा व त्यावर एक मोठी सुपारी घेउन तिचा सपाट भाग पुठ्ठ्यावर चिकटवावा (हे झाले भटजीचे शरीर). त्याच्यावर छोटी सुपारी चिकटवावी (हे झाले भटजीचे तोंड).त्यावर नाक, डोळे, ओठ इ. ड्रॉ करावेत. मोठ्या सुपारीला दोन बाजुला काजु चिकटवावेत हे झाले हात. भटजींची शेंडी म्हणुन लवंग डोक्याला चिकटवावी. जानवे म्हणुन दोरा वापरावा. असे हवे तेवढे भटजी करुन घ्यावेत. मध्ये होम करावा.(माझ्या लग्नात आम्ही चार भटजी केले होते व त्यांच्या मध्यभागी होम केला होता)

विद्या मला खरच दाखव घर कसे करायचे ते. माझ्याकडे वेळ खुप कमी आहे. आमच्याकडेही मोहनथाळ करतात. बडीशेपच्या बिया लावून नवरा-नवरीचे नाव लिहीतात. मी करेन वेळ मिळाला तर.

नलिनी खुप सुंदर आहे ग गोल्डन ट्री.

शिप्रा धन्स भटजी बघते करुन.

रावी, शिप्रा, शांकली, साधना, तनुदी, धन्यवाद.

१.आईस्क्रिमच्या काड्यांचे फ्लॉवर पॉट करता येईल. त्रिकोणी बेस करुन त्यावर असेच अजुन त्रिकोणी बेस तिरपे लावावेत. एका तासात होतो.
२.मातीचा पॉट विकत आणून त्याला काळा कलर देऊन त्यावर मणी ,कलर चे कोन आणि स्पार्कल ने मस्त डिझाईन काढता येईल.
तुम्ही पण नवी मुंबईतच राहता का??

कांचन तो त्रिकोणी फ्लॉवर पॉट मी करणार आहे. माझ्या लग्नात पण मी केला होता. Happy मातीच्या पॉटची आयडियाही छान आहे. उद्याच शोधते पॉट.

धन्स जयवी.

धन्स धन्स धन्स विद्या. अग तिला हे फ्रुट्स चा वॉलपिस पाहीजेच आहे. प्लिज मला जरा टिटेलमध्ये सांगशील का कसे करायचे ते?

जागू, ह्या धाग्याला रुखवताचे पदार्थ आणि कलाकुसरीच्या वस्तू अस नाव द्याल का?? हा धागा खूप उपयोगी होईल सर्वांना.
ओल्या नारळाच्या वडया पांढर्‍या आणि पिवळ्या करता येतील. दोन्ही चिकटवून खूप छान दिसतात.
वेगवेगळ्या आकाराची चॉकलेट्स करून त्याचा बुके बनवता येईल..
खायचे पदार्थ छोट्या टोपल्यांमध्ये ठेवायचे. ह्या टोपल्या आतून आणि बाहेरून बांधणीच्या कपड्याने, लेसने सजवायच्या आणि वरून जिलेटीन पेपर लावायचा.
डिझायनर कुशन्सपण ठेवता येतील. जमल तर उद्या फोटो टाकेन.
लव्हच्या आकाराचे सॅटिनच्या कपडयाचे कुशन्स बनवता येतील, छान लेस लावून.

खुप सोप्पे आहे जागू..... पाहिजेत ती फळे आण. त्याला देठ असावेत. दिड इंच रुंद, १५-१६ इंच लांबीची लाकडाची पट्टी घे. ती सगळ्या फळांचे वजन पेलु शकेल इतकी जाड हवी. साधारण अर्धा इंच जाड हवी. त्याला हिरवा क्रेपचा कागद गुंडाळ (हे झटपट होते) किंवा हिरवा रंग दे. फळे त्या पट्टीला लावण्यासाठी तुला वायरही लागेल. मग एकेक फळे वायरने पट्टीला घट्ट बसतील अशी लाव. अगदीच कुठे गॅप दिसली तर तिथे फुले ग्लु गन ने लाव. हे भिंतीला लावण्यासाठी त्या वायरचाच एक हुक कर.......... ही माझीच आयडिया त्यामुळे मला हे असे जमले तसे केले. प्रोफेशन लोक कसे करतात ते काही माहीत नाही.
आरती, टोपल्यांची कल्पना मस्त आहे.

वा मस्तच जागू. अगदी सुबक झालीय टोपली. त्यावर लोकरीची वेगवेगळी फुलं/फळं करून टाचलीस तर?
विद्याक, तुझी ती फळं फारच सुंदर जमलीत बरं Happy
नलिनी, आरती तुमच्याही आवडल्या कलाकृती.

विद्या खुप कमी दिवस राहीलेत आता ती फळे आमच्याइथे मिळतात का आज शोध घेते.

आरती अग मी ९ तारखेनंतर रुखवतीचा वेगळा धागा टाकते. त्यात आम्ही मांडलेले सगळे रुखवत टाकेन. ह्या धाग्याची लिंक त्या धाग्यात टाकेन. कुशन्स छान आहेत.

दक्षिणा, अवल धन्स.

Pages