रुखवत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2012 - 03:33

नणंदेच्या लग्नात आम्ही ठेवलेली रुखवत. काही प्रकार घरी केले तर काही विकत आणले.

(वरील मण्यांचे तोरण माबोकर योगिता हिच्याकडून मागवले होते.)

बैलगाडी

ह्यात खोबर्‍याचे कासव, लाईफबॉयच्या साबणात कोरलेले कपाट व हत्ती, अकोर्ड व सुपारीचे तबला व सनईवाले आहेत. हे ऑर्डर ने करुन मागवले होते.

मी लोणची व कोरड्या चटण्यांचे पाच पाच प्रकारही बरणीत भरुन दिले होते.

रुखवतीसाठी केलेली लोकरीची टोपली.

साहित्य : दोन ते ३ रंगाचे लोकरीचे धागे.
खराट्याच्या ३ मोठ्या काड्या.

ही उलटी टोपली अशी दिसते.

रुखवतीचे इतर प्रकार.
अक्रोडची समई - http://www.maayboli.com/node/40449

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, धन्स.
अजून एक प्रकार पण सध्या माझ्याकडे नाही आहे.
माश्याच्या आकाराच कर्टेन हँनगिंग. ते पण खूप छान दिसत.
सॅटिनच्या कपड्यावर माशाचे दोन आकार काढून त्यावर मोती, टिकल्या, कुंदनच ऩक्षी काम करायच आणि दोन्ही भाग शिवून थोडी जागा ठेवायची फायबर कॉटन भरण्यासाठी. कॉटन भरून असे मासे तयार करायचे. आणि साधारण ३ फुट धाग्यामध्ये घुंगरु, एक मासा, नंतर एक छोटी मण्यांची माळ अस ओवायच, परत एक घुंगरु, एक मासा, नंतर एक छोटी मण्यांची माळ.
अशा तीन -चार हँनगिंज बनवायच्या.

आरती अस वाटत हा धागा महिनाभर आधी टाकला असता तर मला बर्‍याच वस्तू करता आल्या असत्या. माश्यांची आयडीया पण मस्त. आता खरेच घेऊन टांगते Lol

मनिषा धन्स.

जागु टोपलिचे कलर खुपच छान आहेत्,पण टोपलिपेक्शा तिला एक दांडा लावा,म्हणजे छत्रि अगदि छान दिसेल....

अमृता अग मी तेच करणार होते पण नणंद म्हणाली टोपलीच ठेवलीस तर मला हलक्या वस्तू ठेवण्यासाठी उपयोगी होईल म्हणून मग मी दांडी नाही लावली.

धन्स आरती, अवल, जागू. आरती त्या कुशन्स खुप छान झाल्यात. कशा केल्यास? मी पण हार्ट शेप ची कुशन केलेली.
जागू, तुला फळे जरी नाही मिळाली तरी रंगीबेरंगी मिरच्यांचेही असे करता येतील. ह्याला जास्त वेळ लागत नाही. सामान सगळे असले तर १/२- पाउण तासात होउन जाते. कदाचीत तुला ही फळे ९९रु. shop (shop,Wall मराठीत कसे लिहायचे?) मधे मिळतील.
जागू, तु मस्यकन्या.. हे रुखवतात ठेवण्यासाठी नाही पण नंतर तुला तुझ्या लेकींसाठी माशाची कुशन्स करता येतील. वर आरती ने सांगीतल्याप्रमाणेच पण जरा मोठया आकारात मासा करुन घे. पण मणी वापरु नकोस. डोळ्यासाठी, खवल्यासाठी फ्लीसच्या कापडाचे तुकडे घे. आणि धावदोर्‍याने शिव. खुप छान दिसते अशी उशी. मुलांना खुप आवडते. पुर्वी मी अशा वेगवेगळ्या करुन मुलांना गिफ्ट म्हणून दिल्यात.
अमृताची, तुझी दांडी लावण्याची कल्पनाही छान आहे. पण दांडी कशाची लावणार? अशा दांडी लावलेल्या रंगीबेरंगी छत्र्यांनी मुलांची खोली सजवता येईल.

विद्या अग मला त्या कुशन्स कशा करायच्या ते डिटेल सांग आणि तुझ्याकडे असेल तर फोटो पण टाक. मी त्या नंतर सावकाश करेन.

अग त्या छत्रीला बांबुची जी पातळ काठी असते ती लावता येईल किंवा केरसुणीत असणारी जाडी काठीही लावता येईल. नाहीतर खराट्याच्याच पाच सहा काड्या एकत्र लोकरीने गुंडाळुन त्याचीही दांडी करता येईल.

मी आज आईस्क्रीम स्टीकचे फ्लॉवर पॉट बनवले. उद्या फोटो टाकते. अजुन एम्बॉर्स पेंटींगचाही डोलीचा कीट आणला आहे. घरही आईस्क्रीम स्टीकचे बनवायचे आहे. शिवाय खाऊचे पदार्थ. लोणची झाली आता कोरड्या चटण्या बनवते. ९ तारखेला लग्न आहे म्हणजे खोबर्‍याच्या वड्या कधी करु? गुरुवारी केल्या तर राहतील ना चांगल्या?

जागू माझ्या रुखवतावर आम्ही संपूर्ण मंडप तयार केला होता. तुला वेळ कमी आहे पण बघ जमले तर खुप छान दिसतो.
थर्माकोलचा बेस घेवुन त्यावर भटजी, होम्,पाट ,दोन खुर्च्या त्यावर नवरा ,नवरी (छोट्या बाहुल्या) बाजुला फॅन (खेळणीतला),पाहुणे, मागे डेकोरेशन अजुन खुप अ‍ॅड करता येते.
लाकडी बेलगाडी (लिहीता येत नाही)मिळते त्यात छोटी छोटी धान्याची पोती करून ठेव समोर सुपारीचा गाडीवाला कर.
सूपारीचे बँडवाले पण खुप छान दिसतात.

जागू,

m-seal असते ना जे मिळते भारतात ते एखाद्या फुलदाणी वर वेगवेगळी फुले बनवून चिकट्वयाचे मग रंगवायचे स्प्रे करून. ज्यास्त वेळ नाही लागत. नाहीतर प्लॉवरपॉट देता येइलच.

बघा करून.
मी केलेत असे प्लॉवरपॉट.

जागू, बघते मी माशाच्या उशीचा फोटो मिळाला तर. खुप वर्षापुर्वी करुन दिल्या आहेत अशा उशा.
बापरे काय तुझा उरक आहे! दोघींचे करुन एवढे सर्व करणार? लग्न झाल्यावर जरा विश्रांती घे ,मग आरामात सर्व रुखवताचे फोटो टाक. जास्त दमु नकोस.

जागू, जर खायचे रुखवतचे पदार्थ करणार असशील तर त्यांचे एखादे कोलाज या टोपलीवर छान दिसतील. वेगवेगळे लाडू, करंजा, शेव, चकली, शंकरपाळ्या यांना बुके सारखे अ‍ॅरेंज केलेस तर? चिकटवण्यासाठी खाली साखरेचा पाकाचा ठिपका ठेव.

वेगवेगळ्या धान्याच्या दाण्यांनी सप्तपदीही काढता येईल. पावलाचे आकार करून त्यावर साखरेचा पाक / खळ्/भात यांचा थर देऊन धान्य चिटकवायचे. त्याच्या शेजारी वेगवेगळे शुभाशिर्वाद लिहायचे. या दोन्ही प्रकारात वाया काही जाणार नाही. नंतर वापरता येतील सर्व.

अग कासव मी नाही केले. ते एकीकडून मागवले होते. तरी मी विचारून घेईन. आणि अग घाईत निट कसले फोटो नाही ग काढता आले. तरी ज्या वस्तु मी बनवल्या आहेत त्याचे काही फोटो मी काढलेत पण ते शोधून टाकेन.

अग शेअर करण्यासाठीच तर हा धागा आहे धारा. वरती बर्‍याच जणींनी टाकले आहेत फोटो.

शोभा तु पाहीलसच नाहीस (प्रचंड रागाची बाहुली ) आणि मी रोज तेंव्हा अपडेट करुन बघायचे तू देतेस का ते. त्यात मला फोन करायला बिल्कुल वेळ नसायचा. जाऊदे चल आता इथे टाक असाच घरात करुन ठेवेन.

वॉव सगळच मस्त !
ते वाजंत्री वाले भारी गोड आहेत Happy
चकल्या कसल्या सुबक आहेत गं.
डोलीचे चित्र सुरेख.
ते कलिंगडासारखं काय आहे? बर्फी ?

सही !!

अग तो खोबर्‍याचा कलिंगड केला मिच. त्याची कृती नंतर देते. आता फोटो सापडत नाहित ग.

आकांक्षा, जयवी धन्यवाद.

हा माझ्या लग्नातला रुखवत. नीट दिसेल की नाही शंकाच आहे, पण तरी...
rukhavat.JPG
सगळ्या फ्रेम्स, पणत्या, फ्लॉवरपॉट्स, वेगवेगळे लाडू ठेवायला टोपल्या, लोकरीचे तोरण या गोष्टी मी केल्या होत्या. आईने आणि मी मिळून सगळा रंगीबेरंगी फराळ बनवला होता. फक्त भांडी, बेडशीट्स्+उशा, बैलगाडी आणि ते बांगड्यांचे रेडिमेड पोस्टर विकतचे होते. काही बाहुल्या मला गिफ्ट म्हणून आलेल्या ठेवल्यात.

जागु,
रुखवत छान आहे..अगदी जीव ओतुन केल्यासारखं वाटतं

बैलगाडी तर लाजवाब..

विद्याक,नलिनी, आरती
छान प्रकार,नविन माहितीही मिळाली..

Pages