मेळघाटातील पक्षी

Submitted by हर्पेन on 27 November, 2012 - 11:50

मेळघाटातल्या चिलाटी गावात, १०० दिवसांच्या शाळेच्या निमित्त्ताने, मागच्या वर्षी घालवलेल्या, त्या ८-१० दिवसांच्या आठवणी माझ्या मनात आजही अगदी ताज्या आहेत.

माझ्या तिथल्या सोन्यासारख्या वास्तव्याला सुगंध देण्याचे काम, तिथल्या अंगण-वावरात दिसलेल्या, अगदी सहज व विनासायास दिसलेल्या पक्षांनी केले.

त्यांची काही प्रकाशचित्रे आज इथे टाकत आहे.

शुभशकूनी भारद्वाज

Bharadwaj.jpg

बुलबुल एकटा

bulbul.JPG

अन् जोडीने
Bulbul Jodi.jpg

होय ह्या तारा विजेच्याच आहेत पण त्यातून वीज अजीबात खेळत नाही. चला काही नाही तर पक्षांना तरी बसायची सोय...:)

Bulbul Jodi (2).jpg

जवळच एक तलाव होता, पाणी तसे अजिबातच नव्हते म्हणाना... पण अर्थातच त्यामुळे काही पक्षांसाठी उत्तम अधिवास

शराटी ह्याला कांडेसर असेही म्हणतात.
Kandesar.JPG

करडा धोबी
Grey Wagtail.jpg

वंचक

Vanchak.JPG

काय राव? पाणपक्ष्यांचा उल्लेख खंड्याशिवाय पुर्ण तरी होऊ शकेल काय?

khandya.jpg

जायच्या-यायच्या वाटेवर ऐकू येणार्‍या गोड आवाजाचा धनी चंडोल

chandol.jpg

ह्या इटुकल्या-पिटुकल्या पक्ष्याचे नाव आहे, चश्मेवाला...

chashmewala.jpg

मी म्हणालो तसे अगदीच अंगणात दिसणारा दयाळ ह्याचा पण आवाज गोड असतो बरका...

dayal.jpg

अंगणातले शेवग्याचे झाड म्हणजे पक्ष्यांचे मेजवानीघरच...

जांभळा शिंजीर
jambhala shinjir.jpg

ह्या पक्ष्याला थिरथिर्‍या असे नाव उगाच नाहीये, जरा म्हणून एका जागी बसेल तर शप्पथ...

Thirathirya.jpg

बसलेला असताना आपल्या नीळ्-झळाळीला दडवून ठेवणारा नीलपंख
Nilkanth.JPG

कधी जोडीदारासोबत
nilkanth jodi.JPG

तर कधी पोपटासोबत
Neelkanth va popat.JPG

इतक्या देखण्या पक्षाचे नाव खाटीक आहे...

khatik1.jpgKhatik.jpg

काही पक्षी मात्र मला ओळखता आलेले नाहीत.
प्रचि १
Ha kon.jpg

प्रचि २
Id kay .jpg

प्रचि ३
ha kon (2).jpg

आणि आमच्या इकडे अत्यंत दुर्मिळ झालेल्या अशा एका पक्षाने देखिल मला मनसोक्त दर्शन दिले, ओळखा बरे कोण Happy

chimani.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आलेत सर्व फोटो. कोणता कॅमेरा आहे? तुमच्या तिकडच्या आठवणी आणि मुलांच्या शाळेचे फोटो येऊ देत.

भारीच
मस्त आलेत फोटो. खुपच कष्ट आहेत. यातले काही पक्षी एका जागी स्वस्थ बसत नाहीत त्यामुळे फोटोत पकडणं कठीण असतं.

उपरोक्त समस्त प्रोत्साहनपर प्रतिसादांकरता धन्यवाद. Happy

विद्याक, खालील दुव्यावर आपल्याला शाळेचे फोटो पहावयास मिळतील.

http://www.maayboli.com/node/39298

छान!!!

सुन्दर !!

ओळखु न आलेल्या पक्षांमधले पहिले प्रचि हि दयाळ पक्षाची मादी आहे. तर प्रचि २ आणि ३ ही Red throated flycatcher पक्षाची मादी असावी असे वाटते आहे.

मला वाटते नीळ्कंठ हा वेगळा पक्षी असतो. आपण काढलेला फोटो नीलपंख (Indian roller / Blue Jay) या पक्षाचा आहे.

शाळेचे फोटोही पाहीले. खूप inspiring काम आहे हे...

मला वाटते नीळ्कंठ हा वेगळा पक्षी असतो. आपण काढलेला फोटो नीलपंख (Indian roller / Blue Jay) या पक्षाचा आहे., आदिती धन्यवाद, आपले म्हणणे अगदी बरोबर, (माझी) चूक सुधारत आहे.
तसेच,
ओळखु न आलेल्या पक्षांमधले पहिले प्रचि हि दयाळ पक्षाची मादी आहे. तर प्रचि २ आणि ३ ही Red throated flycatcher पक्षाची मादी असावी असे वाटते आहे. ह्या बद्दल धन्यवाद, त्यादृष्टीने पुस्तकांमधे तपासून पाहतो....:)

बाकी सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद....

फार छान सफर घडवलीत. Happy
पण कांडेसर (Woolly Necked Stork) या पक्षाचे मराठी नाव शराटी नाहीये.
Ibis म्हणजे शराटी.

छान आहेत फोटो..............आवडले अणि नावहि कळालि .........धन्यवाद

वा ! सुरेख फोटो !
इंडियन रोलर मस्त ! त्याचा उडतानाचा फोटो मिळायला हवा. फार सुरेख दिसतो तो . धन्यवाद इथे शेअर केल्या बद्दल Happy

मेळघाटात असे पक्षी बघायला फोटो काढायला जायचे आहे?

मग एक सुवर्णसंधी आहे....:

http://www.maayboli.com/node/44146

वरील दुव्यातल्या हा लेख इमेलद्वारा, आपल्या शिफारशीसकट मित्रमंडळात पाठवलात तर होणारी मदत मोलाची ठरेल.