हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

रैना | 25 November, 2012 - 20:09 नवीन
इब्लिस...
जे इंटरनेट अ‍ॅक्सेस करतात आणि जे मायबोलीवर पडिक असतात त्यांना पीडीएफ ने नक्की काय फायदा होईल? अंक अ‍ॅक्सेस करायला जास्त वेळ/ बँडविड्थ लागतो का?
खरंच विचारते आहे.

पीडीएफ ने का ही ही फरक पडत नाही. पीडीएफ उपलब्ध करुन दिली तरी प्रतिक्रिया येतीलच असे अजिबात नाही. उलट संपादक मंडळाचे काम मात्र वाढते..
<<

उलट पीडीएफ डालो करायला जास्त ब्याण्डविड्थ लागू शकते, पण मी तरी प्रवासात वगैरे वाचणे पसंत करतो. त्यासाठी मोबाईलवर नेट नसली तरी ऑफलाईन वाचता येण्यासाठी पीडीएफचा पर्याय चांगला वाटतो.
याचा प्रतिसाद येण्याशी संबंध नाही.
प्रतिसाद यावेत व जास्त लोकांनी वाचावे यासाठी अंकाची लिंक उजव्या बाजूला सतत असायला हवी असे वाटते.

हो नंदिनी, मी बासच केलं होतं, रैनानेच मग विषय काढला, म्हणून उत्तर दिलं. एवढंच.
आता मला कुणी प्रति-उत्तर देईल असे वाटत नाही ! Happy

प्रतिसाद यावे असे लेखन (अती चांगले किंवा अती वाईट) असले तर येतिल की प्रतिसाद. गुळ्गुळीत अंकाला तशाच गुळगुळीत प्रतिक्रियाच मिळणार.

हितगुज दिवाळी अंक आज उघडला. एकेक विभाग धीम्या गतीने वाचणार आहे. लोकप्रिय साहित्य अग्रक्रमाने वाचावे म्हणून अभिप्राय वाचायला आले तर अंकातील प्रत्येक लेखासाठी स्वतंत्र प्रतिक्रियांची सोय केलेली Sad याआधी बरेच मायबोलीकर दिवाळी अंकावर अभिप्राय देताना प्रत्येक विभागाचा, त्यातील लेखांचा उल्लेख करून प्रतिक्रिया द्यायचे तो खूपच छान पायंडा होता. असो!

प्रतिक्रिया वाचताना मायबोलीचे उपक्रम, गणेशोत्सव, दिवाळी अंक इत्यादी चर्चा वाचली. मायबोलीवर कुठले उपक्रम करावेत, कधी करावेत हा पूर्णपणे अ‍ॅडमिन आणि वेबमास्तरांचा प्रश्न आहे असे नाही का वाटत?

बाकी, भरत मयेकरांचा आयडी हॅक झालाय की काय असे वाटून गेले. ब्राऊजरविषयी काही समस्या असावी आणि ती दूर झाली असावी अशी आशा आहे.

अंक हळूहळू वाचतेच आहे, सवडीने प्रतिक्रिया देईन.

संपादक ,
माझ्या इथे हितगुज वाचताना प्रत्येक शब्दानंतर उ़भा आयताकृती चौकोन येतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

दरवर्षी मायबोली अनेक उत्तम उपक्रम राबवते. मराठी भाषा दिन, गणेशोत्सव, दिवाळी अंक, प्रायोजिक स्पर्धा ,मातृदिन इ. प्रत्येकात जर वैविध्य असेल आणि त्यांचे आयोजन करण्यासाठी वेगवेगळे संयोजक मिळत असतील तर एका उपक्रमाचा दुसर्‍यावर काही परीणाम होण्याची शक्यता नाही.

<<दिवाळी अंक, गणेशोत्सव हे सर्व प्रकाशीत होतात तेव्हा मायबोलीवरील इतर नेहेमीचेच साहित्यिक विभाग चक्क काहि कालावधीसाठी बंद ठेवले तर?>> इथे मुळात "सक्ती" हा शब्द नको आहे... पण दुसरा उपाय दिसत नाही. जोवर वाचक स्वतः पुढाकर घेवून दिवाळी (वा तत्सम ऊपक्रम) वाचनास प्राधान्य देत नाहीत तोवर तसे धोरण एकतर्फी व सक्तीचेच वाटेल. थोडक्यात मायबोलीकरांनीच ठरवायचे.>> ह्या मताशी पूर्ण सहमत.

मायबोली चे इतर विभाग बंद ठेवले आणि दिवाळी अंक वाचून झाला किवा त्यात व्यक्तीपरत्वे आवडीचे वाचून संपले तर आंतरजालावर इतरत्र बरेच काही उपलब्ध आहे. अशाने उलट मायबोलीची लोकप्रियताच कमी होईल. मायबोली चे सदस्य नसलेले पण मायबोली चे नियमीत वाचक असलेले बरेच जण आहेत.

गणेशोत्सवात सां का वर भर दिला आणि त्यात लेख कथा यांचा समावेश न करता दृक-श्राव्य कार्यक्रम, झब्बू वा तत्सम खेळ, स्पर्धा असे कार्यक्रम राबवले तर तोच तोच पणा येणार नाही. यावर्षीच्या मैफल सारख्या काही कल्पना जर दृक/श्राव्य कार्यक्रम म्हणून एखादे चित्र किवा हस्तकला तयार करणे यास्वरूपात (यापूर्वीच्या दिवाळी अंकात मेंदी चे डीझाइन, ग्लास पेंटिंग, मातीकाम, ओरीगामी, नख चित्रकला, कसूती नमुने असे उपक्रम झालेले आहेत ) असे काही गणेशोत्सव सांका मध्ये पाठवता येतील. एखादे गाणे अथवा नाटुकले पाठवता येईल.
गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन्ही सण दोन वेगवेगळ्या पद्धतीने सादर केले गेले तर दोन्हीला प्रतिसाद नक्कीच छान मिळेल. याबाबतीत मामी आणि नीधप शी सहमत

मातृदिन आणि मराठी भाषा दिन ही जरी जवळ्जवळ येत असले तरी मातृदिनास स्पर्धा वैगरे न ठेवता वैचारीक स्वरूपाचे लेख असावेत आणि मराठी भाषा हा लहान मुले आणि मोठ्यांसाठी मराठी भाषेच्या आवड आणि समृद्धी साठी स्पर्धा आदि उपक्रम करावेत. गाथा चित्रशती यांसारखे उपक्रम हे दिवाळी अंक किवा मराठी भाषा दिन याचा भाग म्हणून करता येऊ शकतात.

प्रत्येक उपक्रम राबवताना संपादक मंडळाची/सल्लागारांची मेहेनत, त्यातील सहभागी लेखक, कवी सांका त सहभागी असलेले कलाकार यांना मिळालेली पसंतीची पावती ही प्रतिसादाच्या संख्येवरून न ठरवता तो उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यन्त कसा पोहोचेल हे यावर आहे. बरेचदा उपक्रमातील काही गोष्टी लोकांपर्यन्त पोहोचतच नाही. गणेशोत्सवात संयोजक म्हणून काम केलेले असल्याने मला इथे नमुद करावेसे वाटते की गणेशोत्सवात शेवटी सादर झालेले उद्यापन, मनोगत, कल्पकता इ. भाग लोकांपर्यन्त कमी पोचले. कारण एकतर गणेशोत्सव संपल्यानंतर प्रकाशित झाले आणि त्याची लिंक गणेशोत्सव कार्यक्रमाच्या पेज वर दिली गेली नाही.

अर्थातच एखादी गोष्ट आवडली तर नक्कीच प्रतिसादाची स्माईली ही देखील दाद देउन जाते

यंदाचा अंक देखणा होताच. मुखपृष्ठावरील कलाकुसर खासच पण रंगसंगती थोडी डल वाटतेय. दिवाळी म्हणजे थोडा झगमगाट आणि प्रकाश चालला असता. शिवाय मुखपृष्ठाच्या बॅक्ग्राउंड ला सनईच्या शुगोल च्या आयडीयाचा उपयोग नक्कीच करता आला असता. प्रत्येक विभागातील अनुक्रमणिकेच्या पानावरची चित्रे फारच सुंदर.

ललित आणि कथा यामध्ये थोडा तोच तोच पणा वाटला. अंकातील कविता आणि ललित या ठिकाणच्या फोटो मध्येही तसेच वाटले. बहुदा विषय सिमित ठेवल्याने तसे झाले असेल. लेखांसोबत जी रेखाटनं/बोधचित्रं आहेत, ती अजून थोडी मोठ्या आकारातली चालली असती.

लेखाखाली प्रतिसाद देण्याची सोय केली हे मस्त होतच त्यामुळे बर्यापैकी सुटसूटीत प्रतिसाद देता आले.

दिवाळी अंक प्रकाशनाबद्दल संपादक मंडळ, प्रशासन, सर्व सहभागी मायबोलीकर आणि पडद्यामागचे सर्वजण यांचे अभिनंदन आणि आभार Happy

योगने चांगले मुद्दे मांडले आहेत. हे मुद्दे दर वर्षी वेगवेगळ्या स्वरुपामधे येतात (आधी फोनवर होते, मग संपादक मंडळ इमेलवर किंवा अमोल म्हणतो तसे GTG मधे चर्चिले जातात.) त्यांची फलश्रुती :
१. माबो दिवाळी अंक सुरू केला तेंव्हा नाविन्य ह्या एका मुद्द्यावर सुरूवातीची काही वर्षे अधिक प्रतिसाद येत होते.
२. जसे इतरत्र online अंक हा पर्याय मिळू लागल्यावर त्यात तुलना साहजिक आली. ती आणि अधिक पर्याय ह्याचा एकत्रित परिणाम प्रतिसादावर दिसणे साहजिक आहे.
३. परत जर टोकाच्या emotions आणु शकेल असे काही नसेल किंवा 'आपल्या ओळखीची व्यक्ती असेल तर उगाच का दुखवा ?' ह्या भीडेखातर बरेचजण प्रतिसाद टाळतात.
४. Last but not the least : अंकामधल्या प्रत्येक कलाक्रुतीवर पर्तिक्रिया लिहिणे माझ्या मते अशक्य आहे. जे वाचून राहवणार नाही तशा ठिकआणी पटकन प्रतिसाद येतील. ह्याउलट पूर्ण अंकावर एकच प्रतिसाद देणे अधिक सोपे वाटते. पण अर्थात शेवटी काम, आळस वगैरे मूळे सर्वच जण तो देतील असे नाही. ह्याचाच उपभाग असा आहे कि यंदाचा अंक इतका देखणा आहे कि बर्‍याच जणांनी बघितल्याक्षणी त्याला दाद दिली आहे. त्याचा "अंक वाचून त्यावर लिहिणे " ह्या प्रकाराशी फारसा संबंध नसावा.

<<दिवाळी अंक, गणेशोत्सव हे सर्व प्रकाशीत होतात तेव्हा मायबोलीवरील इतर नेहेमीचेच साहित्यिक विभाग चक्क काहि कालावधीसाठी बंद ठेवले तर?>> इथे मुळात "सक्ती" हा शब्द नको आहे... पण दुसरा उपाय दिसत नाही. जोवर वाचक स्वतः पुढाकर घेवून दिवाळी (वा तत्सम ऊपक्रम) वाचनास प्राधान्य देत नाहीत तोवर तसे धोरण एकतर्फी व सक्तीचेच वाटेल. थोडक्यात मायबोलीकरांनीच ठरवायचे >> +१

शेवटी आज अंक उघडायला मुहूर्त लागला. अंकाचं रुपडं देखणं झालंय. मुखपृष्ठावरची कलाकुसर मला फार भरगच्च वाटली, पण तो माझ्या वैयक्तिक आवडीचा भाग. आतली पानं नेत्रसुखद आहेत. अनुक्रमणिका नटवायची कल्पना आवडली.

आत्ता फक्त काव्यविभागच वाचला आहे, आणि आवडलं तिथे तशी नोंदही केली आहे. मैफलीतल्या कविताही ऐकण्यापेक्षा वाचायलाच चांगल्या वाटल्या. सादरीकरण रुक्ष वाटलं.

अंकाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल इथे घनघोर चर्चा झालेली दिसते. अंक प्रकाशित झाल्याला अजून पंधरा दिवससुद्धा झाले नाहीत तोच अभिप्राय मोजून त्यावरून निष्कर्षही काढून झाले? जरा वाचकांना उसंत द्या. अंकाच्या सजावटीचं यथायोग्य कौतुक उत्स्फूर्तपणे झालंच की.

आताशा उपक्रम फार होतात हे मात्र खरं आहे. आणि त्यांच्या स्वरूपात संतुलन आणण्याची कल्पना चांगली आहे. आत्ता प्रत्येक उपक्रमाचं संयोजक/संपादक/कार्यकारी मंडळ निराळं असतं. 'त्या वेळी त्या मंडळाला सुचेल ते' - अशा पद्धतीने कार्यक्रम आखले जातात. या सर्वांवर देखरेख ठेवणारी एक (निदान एक पूर्ण वर्ष स्थायी असणारी) समिती असली तर असं संतुलन साधणं सोपं जाईल का?

-----------------------------

@रैना, टिप्पणी करायची इच्छा होते तर उदाहरणं द्यायची इच्छा का होत नाही? उदाहरणं असलीच, तर त्यांची कारणमीमांसा करण्याची / विचारण्याव्ही इच्छा का होत नाही? तक्ते लोकांनी करावेत म्हणजे काय? अत्यंत बेजबाबदार पोस्ट.

या सर्वांवर देखरेख ठेवणारी एक (निदान एक पूर्ण वर्ष स्थायी असणारी) समिती असली तर असं संतुलन साधणं सोपं जाईल का?<<<

मस्त सूचना

(क्षमस्व, दीपावली अंकाबाबत काहीच सहभाग नसूनही हे मत आवडलं इतकं खरं)

या सर्वांवर देखरेख ठेवणारी एक (निदान एक पूर्ण वर्ष स्थायी असणारी) समिती असली तर असं संतुलन साधणं सोपं जाईल का?<<<

या सूचनेचे समर्थन.

गणेशोत्सव,दिवाळी हे सर्वानाच धामधूमीचे दिवस असतात. पारंपारिक दिवाळी अंकांची मेजवानी असतेच.त्यामुळे या सणांचं औचित्य असलं तरीही माबोच्या खास अंकाची त्यावेळी ओढ असावी तेवढी रहात नसावी. मला वाटतं 'वसंत', 'वर्षा' व 'शरद' असे मोजके तीन अंक माबोने स्वतःचा आगळा ऋतुनिष्ठ मुहूर्त ठरवून काढले, तर त्याला सर्वांचाच दर्जेदार सहभाग व भरघोस प्रतिसाद मिळणं सहजसाध्य होईल.

अंकावरचे अभिप्राय सुद्धां थोडक्यात, मुद्देसूद व वर्गीकरण* करून द्यावेत असा पायंडा पाडावा-
*१] सजावट व मांडणी;
२] अंकासाठीची खास विषयांची निवड;
३] प्रत्येक विभागातील साहित्याची गुणवत्ता;
व ४] त्या त्या विभागात अत्यंत आवडलेला व/किंवा खटकलेला घटक.

[ या धाग्यावर हें विषयांतर होतंय तरीही चर्चेचा सूर पकडून हे लिहावंसं वाटलं, हें प्रांजळपणे कबूल करतो ].

<<प्रतिक्रिया वाचताना मायबोलीचे उपक्रम, गणेशोत्सव, दिवाळी अंक इत्यादी चर्चा वाचली. मायबोलीवर कुठले उपक्रम करावेत, कधी करावेत हा पूर्णपणे अ‍ॅडमिन आणि वेबमास्तरांचा प्रश्न आहे असे नाही का वाटत>>

मग "दिवाळी अंक व इतर उपक्रम ही आमचे प्रश्न आहेत इतरांनी त्यात फुकटचे सल्ले देऊ नयेत" अशी पाटी लाऊन टाका, कसें? Happy

या सर्वांवर देखरेख ठेवणारी एक (निदान एक पूर्ण वर्ष स्थायी असणारी) समिती असली तर असं संतुलन साधणं सोपं जाईल का? >> मला नाही वाटत. उगीचच हायरार्ची वाढेल. सल्लागार समिती असतेच की प्रत्येक उपक्रमासाठी.

बाकी अंक सुरेखच झालाय. मांडणी नेत्रसुखद. नॅव्हिगेशन सोपे. सगळे विभाग आवडले.
हल्ली इंट्रनेटमुळे सारखा वाचायला फराळ मिळतच असतो. तरीही दिवाळी स्पेशल अंक वाचला की दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळतो.

दिवाळी अंक खूपच वाचनीय आहे शिवाय देखणाही आहे!
मुखपृष्ठ पाहूनच एकदम प्रसन्न वाटतं.
कामाच्या वगैरे धावपळीत अक्षरशः पुरवून पुरवून अंक वाचणं चालू आहे!
दाद, आगाऊ, अकु ह्यांचे लेख वाचले आणि आवडलेही.
शक्य तिथे / तशा प्रतिक्रिया देत राहीन पण दिवाळी अंकाची मेजवानी पेश करणार्‍या संपादक मंडळाचे विशेष आभार.

सविस्तर अभिप्राय लिहेन म्हणताना दिवाळी जाऊन ख्रिसमस येऊ लागला म्हणून थोडक्यात..
संपादक मंदळाने अफाट कष्ट घेतल्याचे जाणवतेय. त्यांना मनापासून अभिवादन. मांडणी ,मुखपृष्ठ अति सुरेख, सर्वच विभागातले लेख बहुश ; उत्तम दर्जाचे . विषयांची हाताळणी वैविध्यपूर्ण.
कथाविभागातील समकालीन समस्यांचा कथारूपाने आलेला वानोळा आवडला.
कविताविभागात- माझं home pitch असल्याने मायबोलीवरच्या काही चांगल्या कवींची- बेफिकीर, वैवकु, रसप,प्रा. साहेबही अनुपस्थिती जाणवली.

बाकी सर्व छानच .पुनः एकदा टीमला hats off !

अत्यंत देखणा आणि वाचनीय अंक. हळूहळू वाचते आहे. इतकं दर्जेदार साहित्य वाचून होईपर्यंत पुढची दिवाळी येणार बहुधा. ज्यांनी या अंकासाठी कष्ट घेतले त्या सर्वांना धन्यवाद!

ह्या वेळचा दिवाळी अंक वेळेअभावी नुसताच वरवर चाळला होता. सावकाश चवी चवीने वाचून (आणि हो ऐकून!) अभिप्राय द्यायचा असे ठरवले होते. मैफल विभागाने सुरुवात केली आहे. कलाकृती/रचनांवर individual प्रतिसाद देतेच आहे. सगळा अंक वाचून झाला की अभिप्राय इथे देईन. Happy

हम देर आये ....दुरुस्त आये के नही पता नही! Wink

Pages