हितगुज दिवाळी अंक २०१२ - अभिप्राय

Submitted by संपादक on 12 November, 2012 - 18:57

मायबोलीच्या 'हितगुज दिवाळी अंक २०१२' बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे, तर ते वाचण्याची आम्हांला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले एकत्रित अभिप्राय आम्हांला इथे जरूर कळवा. प्रत्येक लेखासाठी वेगळा अभिप्राय नोंदवायची सोय यंदा केली आहे. तसेच फेसबुक/गुगल+ वर "like" करण्याची सोयही दिलेली आहे.

-संपादक मंडळ

http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2012/index.html

Best viewed in Mozilla Firefox 3.0 and above with 1024x768 resolution

विषय: 

मुखपृष्ठ मस्तच झालय... आणि टेम्प्लेट्स अप्रतिम आहेत.... प्रत्येक विभागाचे पहिले पान फारच सुरेख झालय... लेख वाचून पुढचा अभिप्राय....

इथे सगळ्यांनी जे कौतुक केलेलं आहे तेच मी वेगळ्या शब्दात कसं लिहू तेच कळत नाही. यावर्षीची संपादकीय टीम कोण ते कळल्यावर अंक देखणा आणि वाचनीय होणार अशी खात्रीच होती. अपेक्षा खूप उंचावलेल्या असल्या की त्या पूर्ण न होण्याची भिती असते. ती भिती साफ खोटी ठरली याचा फार आनंद झाला. संपादकीय टीमचं अपार कौतुक वाटतं आहे आणि मायबोली परिवाराचा सदस्य असल्याचा सूक्ष्म अभिमान पण Happy
परत एकदा संपादक मंडळासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट Happy

गुगल इनपुट मराठी वापरून प्रतिसाद मराठीत (देवनागरी) लिहता येतोय.

सुंदर अंक ... खूप खूप आभार संपादक मंडळ!

प्रचंड देखणा अंक आहे. नेत्रसुखद, आल्हाददायक, इ. इ. विशेषणे कमी पडतील इतका आवडला याचा फर्स्ट लूक!! आता सवडीने वाचेन आणि त्या त्या ठिकाणी प्रतिसाद देईन.
धन्यवाद संपादक मंडळ, खूप काम केलय हे जाणवतंय. Happy
शुभ दीपावली!!!

अत्यंत देखणी आणि नेत्रसुखद सजावट, मुखपृष्ठ Happy
अंकाशी संबंधित सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. वाचत जाईन तसतसं प्रतिक्रिया देईनच. लेखाखाली प्रतिक्रिया देण्याची सोय आहे हे फार आवडले.

मायबोली दिवाळी अंक म्हणजे खरा ऑनलाईन दिवाळी अंक.. याची अनुभती पुन्हा आली.. संपादक मंडळाचे विशेष कौतुक.. ! एकूण साचाच एकदम सुरेख ! थोडाथोडा चाळलादेखील.. नि थेट प्रतिसाद देण्याची सोय केलीत हे खास वैशिष्टय !

अप्रतिम अंक! नीटस, देखणा, वाचनीय, दर्जेदार, संग्राह्य अंक आहे अगदी. या अंकासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक मायबोलीकराला मानाचा मुजरा!

गुगल ट्रांसलिटरेशन वापरून देवनागरीत व्यवस्थित प्रतिसाद देता येतोय.

अंक छान झालाय.. . एकदम देखणा... सजावट समितीने खूपच मेहनत घेतली आहे. त्या मेहनतीचं सार्थक पण झालं आहे Happy

संपादक, अंकातून अभिप्रायाला येता येतं.. तसं अभिप्रायातून अंकाकडे जायचा दुवा वरती हेडर मध्ये द्याल का ?

वाचल्यावाचल्या त्या त्या लेखाच्या खाली प्रतिक्रिया द्यायला खूप मजा येतेय. लेख वाचून जे वाटलेलं असतं ते तसंच्यातसं पोचवता येतं. नंतर एकत्रित प्रतिसाद लिहिताना बरेचदा ते विचार निसटून गेलेले असतात ( माझे तरी ). ही सोय दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद Happy

आई गं... किती देखणा झालाय अंक... मुखपॄष्ठावर कितीवेळ निरखित बसूनच राहिले... बैठक जमवून वाचेन सावकाश... आज एव्हढ्यासाठी रजा घ्यायला हवी होती... असं वाटण्याइतका... हुरहुर लावणारा झालाय अंक.
संपादक, कार्यकर्ते, मायबोलीचे तंतरज्ञानी... तुम्हाला परतून द्यावं असं काही नाहीचै...
खूप खूप धन्यवाद अन आशिर्वाद(कुणी धाकुटे अस्तिल त्यांना) देते झालं. डोंगराएव्हढ्या कामाची मोट बांधलीत... तुमच्या ऋणात रहाणं अगदी अगदी कबूल आहे मला.

आता पाहीला मी अंक म्हणजे खरच नुसतच पाहत राहीले... खुपच सुरेख मुखपॄष्ठ आहे अजून वाचला नाही, या विकांताला फक्त एकच काम आहे ते म्हणजे हा अकं वाचून काढणे.

मायबोलीला खरच खुप खुप धन्यवाद, सपांदक मंडळाचे अभिनंदन. Happy

अंक देखणा. सगळा वाचून व्हायला वेळ लागेल. संपादक मंडळातली नावे वाचून ज्या अपेक्षा उंचावल्या होत्या त्यांना न्याय देणारा अंक.
त्या त्या लिखाणाला प्रतिसाद देण्याची सोय दिल्याबद्दल आभार.
संपादक मंडळी, टू थम्ब्ज अप... Happy

अंकाचं मुख्यपृष्ठ अतिशय आवडलं.
अजून पुर्ण वाचला नाही, थोडा थोडा वाचलाय.
लगेच प्रतिसाद देण्याची सोय केल्याबद्दल आभार.
पुर्वी तिकडे लेख्/कविता वाचली की इथे येऊन प्रतिसाद लिहायचा कंटाळा व्हायचा.

मुखप्रुष्ट अप्रतिम आहे , त्यामुळे तो वाचनिय असणारच. अजुन वाचला नाही पण मांड्णी सुरेख आहे

अंकाविषयी वर लिहलेच आहे पण प्रत्येक विभागाची ओळख करून देणार्‍या काव्यमय ओळींनी अंकाची उंची वाढवलीये... या संकल्पनेचे आणि लेखनाचे ... कौतुक!

मुखपृष्ठ पाहूनच जीव सुखावला - आता हळुहळु वाचेनच.

या अतीवसुंदर अंकाकरता ज्या ज्या मंडळींनी जीवापाड मेहनत घेतली त्या सर्वांचेच मनापासून आभार.

वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेनविण - या उक्तिनुसार सर्व वाचकांचेही आभार.

अत्यंत सुबक, कलात्मक व दर्जेदार लिखाणाचा भरीव अंक ! सं मंतील प्रत्येकाने नोकरी /व्यवसाय सांभाळूनही नेटाने व नेटकं काम केलंय हें स्पष्टच आहे . असा अंक सादर करण्यांत सहभाग असलेल्या सं मंतील सर्वांचं अभिनंदन. त्याना मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा !

Pages