मी नाही रडणार उद्या

Submitted by वैवकु on 23 November, 2012 - 15:13

हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या

तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या

एक तूच ईश्वर वेड्या
ही सृष्टी सडणार उद्या

तुझे विठ्ठला हे कोडे
तुलाच उलगडणार उद्या

आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या

तुझा दिलासा आजच दे
नको तेच घडणार उद्या

तुझे विठ्ठला हे कोडे
तुलाच उलगडणार उद्या

आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या

तुझ्यात लपून गेलो की
मलाच सापडणार उद्या<<<

अतिशय सुंदर गझल.

वा व्वा!

बढिया !

हा वाडा पडणार उद्या
मी नाही रडणार उद्या

आज वैभवा जगून घे
नाही परवडणार उद्या

हे शेर आवडले.
नंतर आठवलेल्या कवाफींचे मोह टाळा. गझल चांगली आहेच.

सुप्रियातै , बिनधास्त मन:पूर्वक आभार

ज्ञानेशजी विशेष आभार
अनेक दिवसान्नी तुमचा प्रतिसाद लाभला खूप छान वाट्ते आहे
गझलेनन्तर प्रतिसादात दिलेल्या शेराबाबत आपण सान्गत आहात का ? तो शेर नन्तर सुचलेला नाही तो गझल करतानाच सुचला होता पण तो वेगळा केल्याने गझल मुसल्सल वाटेल असे वाटले (मला मुसल्सल गझल लिहायला जास्त आवडते )म्हणून तो वेगळा लिहिला आहे
आपली सूचना अत्यन्त महत्त्वाची आहेच . नक्कीच आमलात आणीन
पुनश्च धन्यवाद

Sad Sad :

व्वा

ज्ञानेशशी सहमत.

मलाही पहिले दोन शेर आणि शेवटचा शेर फार आवडले.

इश्वर आणि विठ्ठला हे शेर भावले नाहीत.

पुढील लेखनास शुभेच्छा!

मस्त !!

हुश्श!
गझलेला पुर्वीचे दिवस आले काय?
चक्क एकोळी प्रतिसाद Proud

मला काही काही शेर नाही आवडले
(अर्थात त्याने फरक पडतं नाही कारण मला गझल फारशी कळतच नाही Happy )

अर्थात त्याने फरक पडतं नाही(...........>>>>>हुश्श! )कारण मला गझल फारशी कळतच नाही(..........>>>>डब्बल हुश्श !!) Rofl
__________________________________________
मनःपूर्वक धन्स रिया................... Happy

Pages