दोरापासुन बनविलेला आकाश कंदिल

Submitted by NANDALE ART on 17 November, 2012 - 07:32

साहित्य -फुगा,दोरा,फेविह्कोल,जिलेटीन पेपर ईत्यादि
क्रुती-आधी फुगा फुगवुन घ्या नंतर त्याला दोरा गुंडाळा दोरा असा गुंडाळा की फुगा दिसणार नाहि नंतर त्यावर
रंगीत जिलेटीन पेपर चिकटवा जिलेटीन पेपर चिकटव्ल्या नंतर पुन्हा दोरा गुंडाळा दोरा असा गुंडाळा की जिलेटीन पेपर दिसणार नाहि. नंतर फुगा वाळु द्या. वाळ्ल्यानंतर आतिल फुगा सुईने फोडा फुगा फोडल्यानंतर
वरच्या बाजुने लाईट लावन्याकरिता कटर ने कापा व आत१०० व्ह्याट्चा बल्प लावा. मग पहा कसा चमकतो
आकाश कंदिल.. तुमच्या प्रतिक्रिया कळवा

aakashkandil1.jpgkandil.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुगा वाळू द्या म्हणजे काय? जिलेटीनला लावलेला डिंक वाळणे अपेक्षित आहे का? की अजून काही लावले/लावायचे आहे?

जिलेटीन पेपर लावल्यावर पुन्हा त्यावर दोरा गुंडाळा व फुगा वाळू द्या म्हणजे जिलेटीनला व दोराला
लावलेला डिंक वाळणे अपेक्षित आहे मग फुगा सुईने फोडा...

१. फुगा फोडायला टाचणी चालेल का?
२. डिंकाऐवजी फेविकॉल वापरले तर?
३. दोरा बराच जाड दिसतो. लोकर चालेल का? बरीच जुनी लोकर घरी पडून आहे.
४. आजकाल जिलेटिन पेपर दुकानात मागितला तर प्लॅस्टीकचा कागद मिळतो, तो तुम्ही म्हणता तसा चिकटवणे अशक्य आहे. रंगीत दोरा/लोकर वापरून असा इफेक्ट आणता येईल का?
५. (अर्र. हा प्रश्न चुकला. जिलबी पाडण्याबद्दल होता. पाकृ मधे विचारतो.)