ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol सॉल्लिड समस.

नंदिनी पटले. मध्यंतरी सलीम खान यांची मुलाखत वाचली होती. ललिता ताम्हणे की अनुराधा औरंगाबादकर यांनी ती घेतली होती. खान कुटुंबाचा गोषवारा त्यात होता. त्यात कुठेही गर्विष्टपणा जाणवला नाही. ( काही म्हणतील मुलाखतकर्तीने ते बदलले असेल, किंवा हवे ते छापले असेल, पण तसे मला वाटले नाही वाचुन.)

टूनटून, मी सलिम खान यांना प्रत्यक्ष भेटलेली आहे. त्यांच्या अर्ध्याहून अधिक कुटुंबालादेखील. मलातरी ते खूप साधे आणि प्रेमळ वाटले.

शाहरूख खानलादेखील प्रत्यक्ष भेटले आहे. (गौरीखानलादेखील) दोघांच्याही बाबतीत नो कमेंट्स

@ निंबुडा....."देव डी' मध्येच कल्कीने 'लेनी' या शाळकरी मुलीची भूमिका केली आहे. त्यानंतर ती 'चंदा' बनून वेश्याव्यवसाय करते असे या चित्रपटाचे कथानक आहे. 'अ गर्ल इन यलो बूट' मध्ये ती मॅच्युअर युवती दाखविली असून आपल्या बापाच्या शोधार्थ ती लंडनहून मुंबईला आलेली असते. इथे ती मसाज केन्द्रात काम करताना दाखविली आहे. [मात्र कथानकातील शेवट फारच भयानक आणि अस्वस्थ करणारा आहे. पचणे जडच. पण असो.]

सध्या दिग्दर्शकांच्या पंक्तीत अग्रस्थानी असलेल्या आणि 'ब्लॅक फ्रायडे', "शैतान', 'गॅन्ग्ज ऑफ वासेपूर' फेमस अनुराग कश्यपबरोबर तिने विवाह केला आहे.

नंदिनीजी ,
माझी पोस्ट टुनटुन यांच्या पोस्ट ला उत्तर म्हणून होती .मला स्वतःला सलमान बद्दल काहीही आकस नाही

सलमान ही काही कमी तापट नाहीये. पण शाहरुखला जर त्याच्यासमोर ठेवले तर लोक ( चित्रपट सोडुन) सलमानचेच पारडे जड ठेवतील. >>

त्याचे सिनेमे फ्लॉप जातायत हे मान्य आहे , त्याची Acting ही टाईपकास्ट होतेय हे ही मान्य . तो overacting करतो असे कुणाला वाटत असेल , कुणाला तो गर्विष्ठ वाटत असेल तरीही ठीक आहे . पण अकारण तुलना वगैरे कशाला ?

त्याचे सिनेमे फ्लॉप जातायत हे मान्य आहे , त्याची Acting ही टाईपकास्ट होतेय हे ही मान्य . तो overacting करतो असे कुणाला वाटत असेल , कुणाला तो गर्विष्ठ वाटत असेल तरीही ठीक आहे . पण अकारण तुलना वगैरे कशाला ?
>> वहीच तो हम कबसे बोल रैले भाय. तुम पढताईच नही. १२५ पोस्ट हो गया अब्बीतक. सल्लूभाय ग्रेट है. उससे कायकू कंपेअर करनेका. उसकेसामने कोइ मुकाबला नही कर सकता. बोले तो अपुनका टायगर भाई है. उमर क्या हो रैली, कितना दारू पिता वो चेहरेपे दिखता क्या? नही ना? शाहरूख को बोलो, थोडा कम फुकनेका. थोबडा देख कैसे सूज गया. नानादादाजैसा दिखता है आजकल. ऊपरसे सबकेसाथ पंगा लेता है. आमिरकेसाथे लिया, सल्लू के साथ लिया. अक्कीके साथ भी पंगा. ऐसे चलेंगा तो कैसे होगा रे उसका?

नंदिनी......आज भलत्याच टेरिफिक फॉर्ममध्ये दिसतात. अगदी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवरील सेहवाग सदृश्य बॅटिंग चाललेली दिसत्ये.

पंगा लेना नै मांगता !

रसप - मस्त परिक्षण. तसेही हा सिनेमा बघायची इच्छा नव्हती आणि हे वाचून ती योग्य होती हे जाणवले.
P Proud :फिदी
समस्त माबोकर - परिक्षणाइअतक्याच comments ही मस्त. P Proud :फिदी

I hate salaman ani mhanun mi tyacha ekhi movie pahat nai
srk heters ni same marg avalamba ki
tyache cinemas pahun shivya ghalat basalyane tyachich publicity hotey

ह्या सगळ्यात एक गोष्ट दुर्लक्षित होतेय ती म्हणजे, सध्या बॉलीवूडमध्ये जे हिरो चालतायत ते सगळे १९८५ ते १९९० दरम्यान आलेले आहेत. अमिर-सलमान-शारुख, अक्की, अजय, सैफ .. सगळे चाळीशी पार केलेले... नंतरच्या दशकात हृतिक आणि हल्लीचा रणबिर- अभय सोडले तर नांवावर चित्रपट खेचेल असा एकही हिरो या पिढीत नाही. याचे कारण कांय असू शकेल???

नंतरच्या दशकात हृतिक आणि हल्लीचा रणबिर- अभय सोडले तर नांवावर चित्रपट खेचेल असा एकही हिरो या पिढीत नाही. याचे कारण कांय असू शकेल???
>>>
हा ह्या बीबी चा विषय आहे का? बीबी कुणीकडे प्रतिसाद कुणीकडे असा सगळा सावळो गोंधळ चाल्लाय Biggrin

या फिल्मचे अशाप्रकारे पोस्टमार्टम करून माझा पैसा आणि वेळ, दोन्हीही वाचवल्याबद्दल धन्यवाद Happy

हा ह्या बीबी चा विषय आहे का? बीबी कुणीकडे प्रतिसाद कुणीकडे असा सगळा सावळो गोंधळ चाल्लाय>>गोंधळ कसला आलाय? हे तर माबो च्या इतर धाग्यांच्या पॉलीसी प्रमाणेच चाललय. १३३ व्या प्रतिसादात देखिल लोक सिनेमा विषयीच बोलतायेत हेच खुप नवल.

शाहरूख ला युनिस्को चा अवॉर्ड मिळाला आहे...कॅन्सरग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी...माहीत आहे....दरवर्षी डोनेशन जाते... माहीत आहे?
.
.
नाही ना.....;)
.
.
कारण तो...दूसर्यांचा पैसा आपल्या नावाच्या चैरटी वर खपवत नाही...दूसर्यांच्या पैश्यावर चैरटी करून ..इवेंट साजरे करणे सोपे असते... 5-6 पत्रकार बोलवून...फॅशन शो सारखे धडगूजरी कार्यक्रम करून लोकांकडून पैसा उकळायचा..... नंतर तोच "बियींग" च्या नावावर म्हणजे स्वत: च्या नावावर खपवायचा.....
.
समाजात नाव...:हाहा:
.
.असला फालतूपणा करण्यापेक्शा..... शाहरूख करतो ते बरे.....
.
.
4 चित्रपट काय चालले... हवेत उडायला लागला... :खोखो:..

Most of them are Comparing Ek Tha Tiger
and Jab Tak Hai Jaan in our page from last
3 days. So here is the actual performance
of two films.
ETT first 3 days collections : ( Released in
3300 Screens. Solo release with 15%
Hiked prices )
BOI - 57.83 crs - Average per Screen - 1.75
lakhs
Taran Adarsh - 60crs - Average per screen -
1.81 Lakhs
JTHJ first 3 days Collections : ( Released in
2500 screens. Competition from SOS )
BOI - 45 crs - Average per Screen - 1.80
Lakhs
Taran Adarsh - 49.25 crs - Average per
Screen - 1.97 Lakhs.
If we see average per screen, JTHJ is big
opener than ETT. If film would have got a
Solo Release than Records of ETT would
be broken for sure.
This is only a real comparision for those
who are upset with JTHJ collections,
actually film did wonderfully great being a
romantic film.
So please stop comparing both films, ETT
had lot of advantages, JTHJ had more
disadvantages...

विनोदी परिक्षण आणि तुफान विनोदी असंबध्द प्रतिक्रिया Proud
एव्हर ग्रीन सलमान आणि अति थकलेल्या शारुख तुलना, मधेच त्या दंताळ्या मुलीची आणि काल्कि ची तुलना , आणि मधेच त्या 'बी ग्रेड ' थर्ड क्लास अय्या चा विषय .. का ही ही Biggrin

लई मजा येत आहे वाचायला. Lol
दंताळी कोण हे मात्र अजुन समजले नाही. तेव्ढ सांगा की.
बाकी शारुकला अजुनही संधी आहे चक दे सारखे सिनेमे करुन स्वतःचे नाव जागे ठेवायला.
सलमान टीव्ही शो मधे मजा आणतो.
इतक्या आठ्वणी काढताहेत लोक, तिकडे दोघांना धडाधड ठेचा लागत असतील. Proud

सुनिधी, दंताळी म्हणजे गंध मधली ती अमृता सुभाष च्या ऑफिसमधली मुलगी आणि आत्ता अय्या मधे पण आहे ना.

परिक्षण भन्नाट Rofl
टुनटुन सहमत.

चला शेवटी आमीरखान(च) ग्रेट आहे यावर एकमत झालं म्हणायचं !>> Lol अहो चाचा, आमीर तर अजुन चर्चेतच नाहिये.

ते इश्क शवा गाणे पाहिले/ऐकले. रहमान ने 'जय हो' ला रीहॅश करून संगीत वापरलेले दिसते. तो डान्सही "एक जय हो टाईप गाणे पायजेल" या हट्टातून बसवलेला दिसतो. स्टेप्स मधे काहीही नावीन्य नाही. गाण्याचा टोन अफगाणी आणि गाणे आहे त्या लंडन (टॉवर) ब्रिज च्या पार्श्वभूमीवर. याला इम्प्रोव्हायझेशन म्हणत असावेत. किंवा संगीतातील प्रयोग वगैरे.

मात्र या गाण्याने नवीन वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहे हिन्दी गाण्यांमधे - मुखड्यातील ओळींमधले कमीत कमी शब्द लोकांना कळणारे असल्याचे Proud पूर्वी हे बहुधा 'ओ मेरे शाह-ए-खुबा, ओ मेरी जान-ए-जनाना' कडे होते Happy

लोकं इथे आपल्याला आवडलेला नटच कसा बरोबर आहे व किती छान आहेत असे करून दुसर्‍याची मतं वा आवड खोडून अगदी चर्चा करताहेत..... भारीच विनोदी. Proud

अगदी लहानपणापासून 'ह्या नटाबरोबर' एकत्रच वाढलो व कोण कसे आहेत ह्याचे दावे वाचून हसायलाच आले. Wink

आणि कोणाला काय आवडते ह्याविषयी आपली मतं थोपवू नये म्हणता म्हणता काही जणं तेच करताहेत. छान. चालू द्या.

Ek Tha Tiger vs Jab Tak Hai jaan - Who is
the Real Winner ?
Ek Tha Tiger :- 3300 screen
Running time - 2hr 10 min
No of shows in 1 screen - minimum 7
Total no of shows in 1 day in India:- 3300 x
7 = 23100
Jab Tak Hai Jaan :- 2500 screen
Running time - 3hr
No of shows in 1 screen is 5
Total no of shows in 1 day in India :- 2500
x 5 = 12500
Difference :- 23100 - 12500 = 10600
So ETT had 10600 more shows than JTHJ in
India
In Overseas ETT released in 600 screens &
JTHJ in 650 screens
ETT 600 x 7 = 4200
JTHJ 650 x 5 = 3250
Here also ETT got 950 shows more
than JTHJ
Worldwide 3 days collections
ETT = 74 crores
JTHJ = 72.5 crores...
So ETT got 10600 950 shows more
thn JTHJ and collection is just 1.5
crore more than JTHJ
.
.
खास लल्लुखान च्या पंख्यांसाठी....:खोखो:

जिहाले ..
>> मॅक्स, ते सुनाइ देती है जिसकी धडकन का? ते असेल तर अगदी अगदी..

फा Rofl
रेहमानची गाणी खरच आतिसामान्य आहेत ह्या सिनेमातली.

Pages