पानगळ चक्क वाजवी होती

Submitted by बेफ़िकीर on 8 November, 2012 - 05:35

पानगळ चक्क वाजवी होती
त्याच भावात पालवी होती

पूर्ण रस्ता मुशायरा बनतो
जे तुला पाहती...... कवी होती

आज होती जुनीच दु:खे पण
आजची कारणे नवी होती

रोज कोमेजणे फुलत होते
रोज सुकण्यात टवटवी होती

काल काही निमित्तही नव्हते
काल मी घ्यायला हवी होती

जन्म सुरुवात फक्त मृत्यूची
लावणे सूर...... भैरवी होती

त्यातले आपले नसो कोणी
बालके सर्व लाघवी होती

पाळले तेवढे कटाक्षाने
ज्या सलोख्यात यादवी होती

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे तुला पाहती...... कवी होती सुंदर मिसरा

रोज कोमेजणे फुलत होते
रोज सुकण्यात टवटवी होती.... खूप आवडला

लाघवी, हवी ही मस्तच

सुरेख गझल!
......

जन्म सुरुवात फक्त मृत्यूची
लावणे सूर...... भैरवी होती
<<
<<
व्वा..छान

पानगळ चक्क वाजवी होती
त्याच भावात पालवी होती

काल काही निमित्तही नव्हते
काल मी घ्यायला हवी होती

त्यातले आपले नसो कोणी
बालके सर्व लाघवी होती

पाळले तेवढे कटाक्षाने
ज्या सलोख्यात यादवी होती

व्वा व्वा

मस्त गझल.

हे वृत्त फार भारी आहे, मीर च्या बर्‍याच गझला ह्या वृत्तात आहेत.

छान गझल..........

पूर्ण रस्ता मुशायरा बनतो
जे तुला पाहती...... कवी होती
>> झक्कास...........

>> जन्म सुरुवात फक्त मृत्यूची
लावणे सूर...... भैरवी होती
हा फार आवडला. बाकीचे पण ठीक.
पहिला शेर कळला नाही.
एकूण आत्तापर्यन्त माबोवर वाचलेल्या गझलांत बहुतेकदा पहिला शेर (मतला ) थोडा वीक आहे इतर शेरांच्या तुलनेत असं जाणवतं. गझलेचा फॉर्म तो शेर ठरवतो त्यामुळे अवघड जात असेल जरा असं वाटतंय. कुणी थोडं explain करेल का?

एकूण आत्तापर्यन्त माबोवर वाचलेल्या गझलांत बहुतेकदा पहिला शेर (मतला ) थोडा वीक आहे>>>>>>>तुमचे हे वैयक्तिक मत कुणालाही १००% पटणे मला केवळ अशक्य वाटते

हा शेर असा समजून घेता येईल
~पानगळ व पालवी यातला विरोधाभास हळुवारपणे टिपा
~ही रूपके जिथे जिथे वापरता येतील अश्या आयुष्यातील बाबी आठवा
~मग शेर कळेल

उदा: जन्म-मृत्यू
नवी पिढी-जुनी पिढी

नेमकेपण हे की दोन्हीला एकच किंमत लावली गेली हे शल्य व्यक्त करायचे असावे शायरास

अजून एक : पानगळीला वाजवी होती म्हणताना "चक्क" ची मजा मिस करू नका जरा चक्क्क्क असे ताणून वाचा जाम मजा येतेय त्यामुळे

___________________________

@बेफीजी... कृपया चूक भूल द्यावी घ्यावी
Happy

पूर्ण रस्ता मुशायरा बनतो
जे तुला पाहती...... कवी होती

आज होती जुनीच दु:खे पण
आजची कारणे नवी होती

रोज कोमेजणे फुलत होते
रोज सुकण्यात टवटवी होती>>>>>
अफाट सुंदर आणि तितकीच सहजही!