यमक मिळे की सुरू पहा... (हझल)

Submitted by अ. अ. जोशी on 8 November, 2012 - 00:44

रसिकांनाही पुरू पहा
यमक मिळे की सुरू पहा

भोजन झाले चकल्यांचे
आता मग? टुरटुरू पहा

कुणी नवेसे दिसल्यावर
झाले सगळे गुरू पहा

रावण नावाचा मच्छर
चिमटीमध्ये चुरू पहा

शंभर नावे बदलू; पण...
इकडे तिकडे उरू पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

>>> ह ह जोशी

(हलके घ्यावेत) <<<

तसा मी फार जड आहार घेतच नाही. तुम्हाला माहित आहेच...:)
तुम्ही 'फुलके घ्यावेत' असे म्हटला असतात तरी सध्या चालले असते... Lol