प्यार का पहला ख़त - भावानुवाद

Submitted by मुरारी on 6 November, 2012 - 00:31


प्यार का पहला ख़त लिखने में वक्त तो लगता हे |
नए परिंदो को उड़नेमे वक्त तो लगता हे ||

परमेश्वरा , अरे अनादी अनंत बसला आहेस तिथे .. हजारो , कोटी कोटी रूपे तुझी
प्रेमात पडलोय तुझ्या .. किती रुपात पाहू ? कसाही तुला जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तरी तू अपूर्णच भासतोस रे
तुझ्या प्रेमात पडायची हिम्मत केलीये ... जिथे तुकाराम, ज्ञानेश्वर , मीरा , शबरी यांचा कस लागला .. तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा
तुझी भक्ती करायची.. कशी.. काय .. काहीच ठावूक नाही रे .. मी अगदी नवखा आहे ..
तू नक्की आहेस तरी का , माझी प्रार्थना ऐकतोस का हे हि ठावूक नाही

अज्ञाताची ओढ म्हण , आकर्षण म्हण ... शब्द नाहीत .. तुझ्या प्रेमात पडलोय हे मात्र नक्की, किंवा कदाचित तूच क्षणात मला भेटून जाशील
तस झालं तर मला तुला ओळखता येईल का रे ?

जिस्म की बात नहीं थी , उनके दिल तक जाना था
लंबी दुरी तय करने में , वक्त तो लगता हे

तू सोन्याच्या सिंहासनावर पण आहेस , आणि गावाच्या वेशीबाहेरील झाडीतल्या शेंदरी दगडातही .
किडा - मुंगीत आहेस आणि माणसाच्या हृदयातही .तुझी कोटी कोटी रूपे , आम्हीच निर्माण केली , आमच्याच वेड्या कल्पना असतील सगळ्या
तुझ्या शरीराचा, ह्या बाह्य रूपाचा मोह नाही रे आता, जे संताना गवसलं , ते तुझे अंतरंग
तुझ खर रूप मला सापडेल का? या क्षणभंगुर जगाच्या रंग रंगोटिला भुललेल्या मला तू भेटशील का?
नक्की तू आहेस तरी कोण ?मला वेळ लागेल कदाचित तुझ्या पर्यंत पोचायला, एक काय अनेक जन्म हि लागतील ,कितीही वेळ लागला तरी माझी थांबायची तयारी आहे

गांठे अगर लग जाये तो फिर , रिश्ते हो या डोरी ,
लाख करे कोशिश खुलने में , वक्त तो लगता हे

तुझ्याशी एक नात झालंय रे , अनामिक
निसर्गातही तुझ अस्तित्व जाणवत , हि पंच तत्व तुझ्याच सत्तेने बांधली गेली आहेत
माझा कोणाच्याही नकळत अव्याहत सुरु असलेला श्वास .. तूच पुरवतो आहेस मला , काही ओळख नसताना
मग निसर्गातला तू खरा , पंचतत्वां मधला तू खरा , कि माझ्या श्वासातला .....
एवढ्या जवळ असूनही , मग लांब का वाटतोस ..
या मायेने , या विकारांनी एवढ जखडून ठेवलंय, कि या गाठी सोडवून तुझ्या पर्यंत पोचायला वेळ लागणारच

तू असाच तिथे असशील अनादी अनंत..
आणि मी ... कधी न कधी तुझ्यापाशी येईनच , वचन देतो
____________________________________________________
गझल : http://www.youtube.com/watch?v=u1aRx8Yu__8
गायक : जगजीत सिंग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सुफी' बाजूकडे

हम्म. तसंच काहीस..

म्हणजे आपणच कल्पना केलेल्या परमेश्वराच्या रुपात न अडकता , जे core आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न
म्हणजे अस पहा सोन्याचे विविध अलंकार होतात अलंकार वापरून झिजतात , खराब होतात , पण मूळ जे सोन असत अस्सल तेच टिकतं,वर्षानुवर्ष
मग सगुण रुपात त्याला पाहण्यापेक्षा , जे निर्गुण आहे तेच मिळाल तर किती बर.. असा काहीसा विचार होता .
सदर गझल कुबड्या म्हणू .. पण सोबत हवी होती काहीतरी मांडायला

खूप छान केला आहे भावानुवाद Happy हे लिहिणं, अनुभवल्याशिवाय जमणार नाही. आधीही तुम्ही जे रामदास स्वामींवर लिहिलं होतं ते देखील असंच गुरु शिष्यांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याला अगदी जवळून पाहिल्याशिवाय हृदयस्पर्शी होऊ शकत नाही.

आणि तुम्ही गुरु शिष्य नातं अनुभवत नसाल आणि तरीही इतकं आतला उमाळा वाहात चालल्यासारखं लिहू शकत असाल तर मात्र तुमच्या प्रतिभेची कमाल आहे Happy

मस्त रे!
वेगळा दृष्टिकोन आहे गझलेकडे पाहण्याचा.

तू असाच तिथे असशील अनादी अनंत..
आणि मी ... कधी न कधी तुझ्यापाशी येईनच , वचन देतो>>>
वेळ लागेल, पण मी येईनच...हा सकारात्म भाव आवडला.
लिहीत रहा असाच!