पूण्याचे बदलते हवामान ..... ग्लोबलवार्मिंग ...आपण काय करु शकतो?

Submitted by brpawar on 26 February, 2009 - 11:19
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्लोबल वार्नींग नव्हे, ग्लोबल वॉर्मिंग.

ग्लोबल वॉर्मिंग ची ग्लोबल वार्निंग..............

१. झाडे लावा, झाडे जगवा!!!
२. गरज असेल तरच गाडी वापरा [अर्थात सार्वजानिक वाहतुक इतकी वाईट आहे की....]
३. १५ से. पेक्षा जास्त वेळ असेल तर सिग्नल ला इंजिन बंद करा
४. ज्या रुम मध्ये गरज नाहिये अशा रुम मधले दिवे बंद करा
५. office मधुन घरी जाताना संगणक बंद करा [atleast monitar तरी]

पुण्याचे सर्वाधिक तापमान 43.3°C नोंदवले गेले 30 April 1987 आणि 7 May1889 रोजी.. तेव्हा ग्लोबल वार्मींग होते का?

वैश्विक उष्णता वाढतच आहे गेले काही वर्षे. फक्त एव्हढ्या सार्वत्रिक प्रमाणावर लोकांना त्याची माहिती नुकतीच कळू लागली आहे.

भारतातल्या गायी मेथेन वायू सोडून प्रदूषणात भर घालतात असे अमेरिकेतले लोक वारंवार सांगतात.
अत्यंत वाईट्ट अमेरिकन लोक. जगात जास्तीत जास्त प्रदूषण करणारे हेच. सबंध जगातले २५ टक्के प्रदूषण या एकट्या देशात होते. पण भारतात ५ टक्क्याचे सहा झाले की हे भारताच्या नावे ओरडायला तयार. वास्तविक चीनमधेच प्रदूषण अधिक वाढले आहे, भारतापेक्षा. पण चीनला बोलायची सध्या तरी त्यांची हिंमत नाही!

अर्थात, भारतानेहि या उष्णता वाढीला, प्रदूषणाला आळा घातला पाहिजे, नि ते त्यांना जमेलहि, कारण तिथले लोक हुषार आहेत. अमेरिकेत एक नं चे बुद्दू भरले आहेत. काही करण्यापेक्षा इतरांकडे बोटे दाखवणार.

मागे एकदा असेच म्हंटले होते बुशने की भारतात लोकांकडे पैसे वाढले, ते जास्त खातात म्हणून अन्न धान्याचे भाव जगभरात वाढतात!! नालायक, मूर्ख माणूस. अमेरिकेतले लोक सर्वसाधारणपणे इतर प्रगत देशांपेक्षा सहापट अन्न धान्य 'वापरतात' (खातात नि फेकतात). एक अमेरिकन एक महिना जेवला नाही तर अख्खा सेनेगाल देश महिनाभर पोटभर जेवू शकेल!

हे करुन बघा . .
अतिशय सोप्या पण गरजेच्या
१.सिगनल ला असताना गाडी बन्द करा.(कम्पंल्सरी)
२.एकाच ठिकाणी जायचे अस्ल्यास शेअरिंग करुन जा.
३.नविन कार पेक्षा रीसेल मधुन सुस्थितील कार घ्यावी.
४.एकतर स्पीड किंवा साधे पेट्रोल, आलअटुन-पालटुन नको.
५.गाडीची वेळो-वेळी योग्य सर्विसिंग.

शामली, ४ था मुद्दा थोडा स्पष्ट करून सांगाल का?

प्लॅस्टिक आणि कॅरी बॅग्ज चा वापर कमी.

मी जिथे रहातो तो भाग पन्चवीस वर्षान्पूर्वी जसा होता तसा आता नाही!
जिकडे तिकडे सिमेण्टची नुस्तीच जन्गले उभी राहिली नाहीत, तर त्यान्नी जमिनीचा सर्व पृष्ठभाग फरशी/कोबा/रस्ते व प्रत्यक्ष इमारत यान्नी व्यापुन टाकला
यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरणे बन्द झाले
अर्थातच, आधीपासून असलेल्या वा नव्याने लावलेल्या झाडान्ना पाणी वरुन घालावे लागते!
जमिनीत पाणी मुरल्यास तपमानावर काही एक परिणाम होत असणारच! साधे पाषाण लेक जवळून जाताना थन्डावा जाणवतो, तसेच हे, जमिनच पुरेशी भिजली नाही तर रखरखाटच अस्णार ना? जमिनीचा पृष्ठभाग झाकला गेल्याने वातावरणात आलेला भकासपणा आता प्रकर्षाने जाणवतो
याकरता, बान्धकामान्ना मन्जुरी देणार्‍या कायद्यात सुधारणा घडवुन आणणे गरजेचे आहे ज्यामुळे अमुक इतके टक्के जमिनीचा पृष्ठभाग उघडा राहिला पाहिजे
एक विचार करा, की अमुक इतके किलोमीटर क्षेत्रफळाचे शहर, अजुन वाढले, व वाढताना, आहे तितकी जमिन झाकली गेली! तर काय होणार? पावसाचे सगळे पाणी गटारामार्फत थेम्बनथेम्ब वाहून जाणार! गटारे व्यवस्थित नसल्यास पाणि तुम्बणे वगैरे प्रकार तर वेगळेच! पण हेच जर, प्रत्येक घरटी/इमारतीमधे पावसाचे पाणी साठवणे नाही तर जिरविण्याचा विचार झाला तर?
(माझ्या या सुचनेचे हक्क स्वाधिन! Proud )

म् ला जर झाडे लावायची असेल तर कुठे लावायची जागा कुटे आहे कोणि काम कर् त असेल तर मला सा!गा बर कहो प्लीज.