हत्तीदादा....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 November, 2012 - 01:40

हत्तीदादा....

हत्तीदादा हत्तीदादा झुलता कित्ती छान
हालतात कसे मोठ्ठे मोठ्ठे सुपाएवढे कान

सोंड वळवळ करते ती कित्ती ती सापासारखी
कुठं बरं ठेऊ हिला शोध्ता का जागा सारखी ?

दात तर तोंडाबाहेर असले बिनकामाचे ?
ब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे ?

पाय ते केवढे मोठ्ठे आहेत नुस्ते खांबासारखे
दिस्ता कसे तुम्ही अगदी काळ्याशार डोंगरासारखे

शेपूट मात्र तुमची ही कित्ती बारीक एवढुशी
भल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी छोटीशी.....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमी सारखीच मस्तच !
सोपे सोपे शब्द अन त्यांची सरळ साधी मांडणी ! फार अवघड गोष्ट फार छान जमते तुला Happy
शाब्बास Happy
एखाद दुसरे बदल सुचवण्याचे धाडस करतेय :

सोंड वळवळ करते, भारी सापासारखी
कुठं बरं ठेऊ हिला, शोध्ता जागा सारखी ?

दात तर तोंडाबाहेर अगदी बिनकामाचे ?
ब्रशिंग-बिशिंग काही नको मग काय मिरवायचे ?

पाय केवढे मोठ्ठे, नुस्ते खांबासारखे
दिस्ता कसे तुम्ही, काळ्याशार डोंगरासारखे

शेपूट मात्र तुमची कित्ती बाई इवलुशी
भल्या मोठ्ठ्या गादीवर लोंब्तीये दोरी जशी.....

मो कि मी - मनापासून धन्यवाद.....

अवल - किती सुयोग्य बदल सुचवलेस..... मी एक टी पी म्हणून खरं तर या बालकविता लिहित असतो - पण तुझ्यासारखी अभ्यासू, जाणकार मंडळी विशेष लक्ष घालून या बालकविता अजून कशा उठावदार, गेय होतील हे पहाता - मला अगदी भारावून जायला होतंय... औपचारिक आभार तरी कसे मानावे तुम्हा मंडळींचे ?

शशांक, अरे कसले अभ्यासू वगैरे. अन आभार बिभार नसतातच मैत्रीत, हो ना Happy
पण खरच फार छान, सोपं अन सहज लिहितोस तू. अन शाम म्हनतो तसं किशोरला पाठव. मुलांना भावतील अशाच आहेत तुझ्या बालकविता Happy

मुक्तेश्वर, चिमुरी, कविन, चनस, श्यामराव, श्याम - सर्वांचे मनापासून आभार....

अन शाम म्हनतो तसं किशोरला पाठव. मुलांना भावतील अशाच आहेत तुझ्या बालकविता >>>> शाम, अवल - जरुर विचार करतो या प्रेमळ सूचनेचा.

मस्तच !!
खरंच तू बालमासिकांना पाठवायला हवंस. बाल कविता लिहिणं सोपं नसतं. पण तू छान लिहितो आहेस Happy

शशांक, ते वर तुला सगळे सांगताहेत त्यांच ऐक... पाठवच मासिकां ना.. किंवा न्यूज पेपर्स च्या बालविभागाला