या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...

Submitted by अंड्या on 25 October, 2012 - 01:44

काल दसरा होता. पण आमचे दुकान नेहमीसारखे उघडेच होते. सकाळी एक्स्ट्रा पूजाअर्चा काय झाली तीच. अर्थात, ते खाते वडीलांकडेच. मी गेलो सावकाश घरचे आवरून.. नेहमीसारखाच.. त्यातल्यात्यात सणासुदीचे नवीन कपडे आणि व्यवस्थित भांग पाडून.. थोडावेळ मंगल वातावरण वाटले, पण त्यानंतर नेहमीचे काम होतेच ते चालू झाले. अधूनमधून नवीन शर्ट असल्याने आरश्यात बघणे काय ते होत होते, पण त्याचा कामावर काही फरक नाही की दुपारी दुकान लवकर बंद करून घरी पळायची सोय नव्हती.

अश्यातच साडेअकरा बाराच्या सुमारास वाडीतील मुलामुलींचा ग्रूप मला भेटायला, दसर्‍याच्या शुभेच्छा द्यायला आणि त्यांचा कुठेतरी मंदीरात जायचा कार्यक्रम होता त्या साठी औपचारीकता म्हणून बोलवायला आला. औपचारिकता म्हणालो कारण मला मंदीर फिरायची आवड नाही हे त्या सार्‍यांनाच माहीत असल्याने मी येणार नाही याची त्यांना कल्पना होतीच.

सारे नटूनथटून मिरवत होते. मुलांमध्ये कोणी सलवार-कुर्ता घातलेला तर कोणी जीन्सवरच सदरा चढवलेला. एकाने चक्क लांबून पाहता धोतर वाटावे असे काहीतरी घातले होते. दोनचार डोकी टोप्या-फेट्यांमध्येही अडकली होती.... पण मुली मात्र एकजात सार्‍याच साड्यांमध्ये.. फरक इतकाच की कोणाची अंगभर जरीमरी लावलेली तर कोणाची बॉर्डरच काय ती रुपेरी.. कानातले, गळ्यातले मात्र एकजात टीपिकल.. त्या त्या साडीला मॅचिंग काय ते तेवढेच.. बरे वाटले पण त्यांना असे सजलेले धजलेले बघून..

पण मला पाहताक्षणीच त्या म्हणाल्या, "काय रे तू... आजही असाच शर्ट-पँट घालून.. काहीतरी ट्रेडिशनल घालायचे होते आजच्या दिवशी तरी.. "

झाला.... माझा तर विरसच झाला.. नवीन शर्टाला कॉम्प्लिमेंट देणे दूर की बात, वरती ही असली कॉमेंट.. नाही म्हटले तरी चिडलोच..

म्हणालो, "नवीन शर्ट आहे दिसतेय ना, आणि तुम्ही काय असे मोठे ट्रेडीशनल घातलेय?"

"अय्या हे काय... साडी दिसतेय ना..?"

"बरं मग, त्यात ट्रेडीशनल ते काय? माझी आई घरी रोज घालते. साडी घालून घरातली कामेही करते. कचरा काढते, भांडी घासते.. साडीचे काय कौतुक सांगता मला.. "

"अरे पण आम्ही रोज घालतो का? नेसायला किती त्रास होतो माहित आहे का तुला?"

"तो तुमचा प्रॉब्लेम आहे.." मी म्हणालो, "आपल्याकडे एवढे प्रांतप्रदेश आहेत, प्रत्येकाची साडी नेसायची तर्‍हा वेगवेगळी आहे, दागिनेही कित्येक प्रकारचे त्या त्या नुसार असतात, महाराष्ट्रीयन म्हणाल तर ना तुम्ही नवारी नेसलीय ना तुमच्या नाकात नथ आहे. पदराचा पत्ता नाही, हेअरस्टाईलहीही मॉडर्नच दिसतेय, ब्लाऊजचा फॅन्सी कट तर कुठल्या संस्कृतीत मोडतो तुम्हालाच ठाऊक, हे असे नुसते साडी घालणे म्हणजे ट्रेडीशनल वेअर झाले तर कित्येक बायका रोजच असा दिवस साजरा करतात म्हणावे लागेल ना..."

"म्हण बाबा, तुझ्याशी वाद घालायचे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे आहे.."

"चल निघतो आम्ही, तू बस दुकान सांभाळत.. हॅपी दसरा... सोने घ्या आणि गोडगोड बोला...." जाता जाता मला टोमणा मारून गेल्या पण माझा बदला पुर्ण झाला... मी सुद्धा त्यांचा हिरमोड केला..

हा संवाद इथेच संपला... मला तर फार खुमखुमी होती, पण त्या आपल्या सणाच्या दिवसाची सुरूवात वादाने करण्यास उत्सुक नव्हत्या. त्या निघून गेल्या, पण त्यांना पाठमोरे पाहून डोक्यात एक विचार घोळत राहिलाच... या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार...

- आनंद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना साडीत नटलेल्या मुली आवडतात तसे मुलींना धोतर चढवलेली मुले आवडतील का>>>> आता काही वेळापुर्वी झी अ‍ॅवॉर्डसला 'महादेव रानडे' धोतर, कोट, पगडी, उपरणं अशा ड्रेसमधे होते. तिथे असलेल्या सगळ्या गर्दीत तोच माणुस एवढा हॅन्डसम दिसला. थोडक्यात काय, शोभत असेल तर धोतर नेसलेली मुलं सुद्धा आवडतील की मुलींना.

>>>>>>>>>>>>>>>
पाहिले हो.. पण मला वाटते त्यांचे सौंदर्य त्यांच्या वेशभूषेत नाही तर केशभूषेत आहे..
>>>>>

तुम्ही मुलगी आहात का?
मनीने मुलींबद्दल मत मांडलं
त्याची वेशभुषा आवडली की केशभुषा हे मुलींचं मुलींना ठरवू द्यात की... तुम्ही का उगाचच मत मांडताय..
त.टी : प्रतिक्रिया प्रतिसादावर आहे लेखावर नाही
लगेच काऊंटर वाढवू नका
तशी आधीची प्रतिक्रियाही प्रतिसादावरच होती

.. या आजच्या पोरींना साड्यांचे कौतुक बाकी फार..>>>> थ्री फोर्थ घालुन वर्षभर पोटर्या दाखवायच्या,आखुड टीशर्ट घालुन पाठ पोट दाखवायचे आणि एक दिवसच साडी घालायची यात कसली ट्रॅडीशन आहे? असा प्रश्न त्या ललनांना विचारायला हवा होता.>>> फारच तोकडे नॉलेज आहे बाबा तुमचे. साडी मधे यापेक्षा खूप जास्त अंग प्रदर्शन करता येऊ शकते. आठवा बरे तो कालच्या काळातला - सत्यं शिवम सुन्दरम Proud

'स्वतःच्या मनात उमटलेले सहज विचार' इतपतच लेखाचं स्वरुप होतं तोपर्यंत लेख 'चांगला' वाटत होता. पुढे प्रतिसादांना उत्तरं देताना त्या विचारांचं जे काही कडक कडबोळं घातलं गेलंय त्यामुळे सगळाच बट्ट्याबोळ झालाय.

असल्या लेखांचा प्रॉब्लेम हा होतो की मुळात लेख अजिबातच आवडत नाही, पण त्यावर काही टिपीकल बायकॉलॉजीतील पारंपारीकरीत्या मद्दड प्रतिसाद येतात ते डोक्यात गेल्यामुळे उगाचच लेख बरा वाटायला लागतो Proud

@ मंजूडी
हे बरेय, स्वताच मला जाब विचारल्यागत विचारांच कडबोळं घालायला लावायचे, आणि मग मी ते नेसलं की स्वताच फेडायला यायचं.. Sad

अवांतर - मी इथेच घोषित करू का की यापुढे ही माझ्या हस्ते मायबोलीवर काही लिखाण झालेच तर ते "'स्वतःच्या मनात उमटलेले सहज विचार" असेच घ्यावे.

-------------------------------------------------

@ रियाजी,
गंमत म्हणून प्रतिसाद मोजले तुमचे, आता नाही मोजणार, बोटे एकदा संपली की पुढे मोजायला मला अवघड पडते. Happy

अवांतर - माधवराव माधवराव एवढे अचानक का चालू झाले पण इथे? मालिकेपुरते बघाल तर ते आवडेलच, पण रोज रोज माधवराव बनून आसपास आवरणारा नवरा चालेल का खरेच?

-------------------------------------------------

@ बेफिकिर
आमचा दुकानदारीचा व्यवसाय आहे, माल कसाही असला तरी योग्य ती मार्केटींग करून तो खपवायचे कसब तेवढे उपजत आहे. Happy

'स्वतःच्या मनात उमटलेले सहज विचार" <<<
ते लोकांना स्पष्ट झाले नाहीत म्हणून त्यांनी प्रश्न विचारले तरी लोकच वाईट का?

लोकांना पटले नाहीत कारण मी जगापेक्षा वेगळ्या दृष्टीचा आहे.
लोकांना आवडले नाहीत कारण फार कमी जणांकडे ती क्षमता असते.
लोकांनी प्रश्न विचारले कारण त्यांना कडबोळी घालायची असतात..

वा काय (ओव्हर)कॉन्फिडन्स आहे!

@ नीधप
अईला, वाईट कोणाला समजलो मी, प्रश्नांचा तरास असता तर उत्तरे हौसेने दिलीच नसती.
स्वताला वेगळे समजणे यात ही काही वाईट नाही, कोणी आपल्याला समजूनच घेत नाही याचे वाईट वाटत नाही आणि मनाचे समाधान होते आपल्या. Happy

कारण फार कमी जणांकडे ती क्षमता असते>>>>>>> असे मी कुठे म्हणालो, हे तर आता तुम्ही स्वताच्या तोंडाचे वाक्य टाकत आहात, पुढचे ओवर कॉम्फिडन्सवाली लाईन सिद्ध करायला.. Sad

मी इथेच घोषित करू का की यापुढे ही माझ्या हस्ते मायबोलीवर काही लिखाण झालेच तर ते "'स्वतःच्या मनात उमटलेले सहज विचार" असेच घ्यावे.
>> ते विचार स्पष्ट, सहज, लॉजिकल, स्वतःशी प्रामाणिक असावेत ही लिहिताना आणि वाचताना साधीसरळ अपेक्षा असते.. तुमच्या लेखामधे आणि प्रतिसादांमधे विरोधाभास सरळ सरळ जाणवतोय. तुमच्याच दुसर्‍या एका लेखाचा न्याय इथे लावला तर इथे या लेखामधे "मॉरल ऑफ द स्टोरी" काय आहे?

अवांतर - मी इथेच घोषित करू का की यापुढे ही माझ्या हस्ते मायबोलीवर काही लिखाण झालेच तर ते "'स्वतःच्या मनात उमटलेले सहज विचार" असेच घ्यावे.<<<

काय हवे ते घोषित करा. पण प्रतिसाददात्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे हेही ध्यानात घ्या. प्रतिसाददात्यांच्या मनात काय वाट्टेल ते उमटू शकते आणि ते जर त्यांनी लिहिले तर फार तारांबळ उडेल.

@ नंदीनी
तुमच्याच दुसर्‍या एका लेखाचा न्याय इथे लावला तर इथे या लेखामधे "मॉरल ऑफ द स्टोरी" काय आहे?
>>>>>>>>
माझा तो मॉरल ऑफ द स्टोरी लेख परत वाचा
माझ्या त्या लेखाचा अर्थ आहे की मॉरल ऑफ द स्टोरी प्रत्येक लेखात शोधू नये, तुम्ही त्या लेखाचा नेमका उलटा अर्थ काढलात. Happy

----------------------------------------

@ बेफिकीर
प्रतिसाददात्यांचे स्वातंत्र्य नाकारत नाहीच आहे. उलट माझे आतापर्यंतचे सारे प्रतिसाद पाहिले असता मी जे मला पटले ते पटले असेही म्हणालो आहे,
पण जर कोणाला (खास करून महिलावर्गाला) मी साड्यांवरून त्यांना काही म्हणालो असे समजून त्यांच्या भावना दुखावल्या असतील आणि त्यातून त्यांचे प्रतिसाद उमटत असतील, जे साहजिकही आहे, तर मी त्यांना कसेही टॅकल केले तरी वाद हा अटळ आहेच. Happy

अवांतर - मराठी टायपिंगचा स्पीड इतकाही वाईट नाही की दोन-चार प्रतिसादांना उत्तर देता देता तारांबळ उडावी. Happy

दिनेशजी आणी दादचे विचार आवडले, तसेच आश्विनीमामीकडुन मस्त माहिती मिळाली. अंड्याचा फंडा काहीही असेल धागा गोल्डन ज्युबिली साजरी करणार असे दिसतयं.:फिदी:

तशाही विवाहीता निदान सणावाराचे औचित्य साधुन साड्या घालतात हे ही काही कमी नाही ना. जे घालतात ते चांगलेच ना?
एरवी , पुरुष काय किंवा स्त्री काय कोणाला गाडी जर जवळपास सोडायचे असेल तर बरमुडा घालुनच तर बाहेर पडतात.
शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न

मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच जास्त भारी आहेत..
अश्विनीमामी आणि इब्लिस दोघांचेही प्रतिसाद उत्तम...

साडी मधे यापेक्षा खूप जास्त अंग प्रदर्शन करता येऊ शकते. आठवा बरे तो कालच्या काळातला - सत्यं शिवम सुन्दरम>>>>> डेलिया मॅडम, यात जीनतबाई साडीत आहेत काय? याला कोणत्या एन्गलने साडी चोळी म्हणावे बरे.
साडी चोळी असा पारंपरीक वेश असताना एखादे कापड अंगाला गुंडाळले तर त्याला साडी म्हणावे काय?

साडी चोळी असा पारंपरीक वेश >> तुमचे एकंदरीत वेषभुषेचे ज्ञान वृद्धिंगत करण्याची गरज आहे असे दिसतेय. बाकी 'पारंपारीक' म्हणायला पाचवारी साडीला कीती वर्षाच्या परंपरेचा आधार आहे ??

आपल्या बायका नेसतात ती पाचवारी साडी आणि या झीनतचे हे वस्त्र एकच म्हणता येईल का ? असेल तर झीनतला हे पाचवारी वस्त्र इतर सर्वसाधारण स्त्रियांसारखे सभ्यपणेही नेसता आले असते .

आपल्या बायका नेसतात ती पाचवारी साडी आणि या झीनतचे हे वस्त्र एकच म्हणता येईल का ? असेल तर झीनतला हे पाचवारी वस्त्र इतर सर्वसाधारण स्त्रियांसारखे सभ्यपणेही नेसता आले असते .

Pages