'महफिल-ए-गझल' - पंकज उधास

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 October, 2012 - 03:55

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्‍याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.

pankaj.jpg

'गझल तुमच्या आवडीची' हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ठ्य असेल. म्हणजे अर्थातच पुणेकरांसाठी पंकस उधास सादर करत असलेला 'फर्माईश प्रोग्राम'! नदीकिनारीचं आल्हाददायक आणि नशीलं वातातवरण, मखमली हिरवळ, मंद उजळलेले दिवे, श्री. उधासांचा प्रसन्न वावर, तरल रेशमी सूर आणि गझल गायकीची खानदानी पेशकश या सगळ्यांमिळून एक अनोखा माहौल यावेळी तयार होईल.

मुंबई येथील 'रूद्र असोसिएट्स'चे श्री. मेहूल परब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे, आणि पुण्यातल्या 'एलिगंट शोबिझ प्रा. लि.' च्या राम चिंचलीकर आणि अश्विनी थत्ते यांचा या आयोजनात मोलाचा सहभाग आहे. सादरीकरणातल्या नवीन कल्पना राबवण्याचा ध्यास असलेली ही टीम पुणेकरांना आगळावेगळा आणि चिरस्मरणीय अनुभव देऊन जाईल, यात शंकाच नाही.

'महफिल-ए-गझल' कार्यक्रमाची 'ऑनलाईन मेडिया पार्टनर' आहे अर्थातच आपली सर्वांची लाडकी 'मायबोली'.

pankaj_1.jpg

'महफिल-ए-गझल' साठीचं आपलं तिकिट खालील पत्त्यावर संपर्क साधून मिळवता येईल.
एलिगंट शोबिझ प्रा. लि.
२१४८, विजयानगर कॉलनी,
हॉटेल कावेरीसमोर, सदाशिव पेठ, पुणे

किंवा
८८०५०२७३३० या क्रमांकावरही यासाठी संपर्क साधता येईल.

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users