जे सुचले ते टाक इथे (तरही)

Submitted by शायर पैलवान on 19 October, 2012 - 04:34

शिजवलेले जरा मस्तच झाले
पाककृती तू टाक इथे

अमुक आज तू तेल लावले
घसरून सगळ्यांना पाड इथे

उपवासाला काय पौष्टिक
सल्ला फुकट तू फेक इथे

कमळ, चरखा, घड्याळ, हत्ती
बस उरावर, ठोक इथे

स्वेटर, मोजे, ब्रह्मकमळ ते
काढ फोटो टाक इथे

दर दहाव्या प्रतिसादानंतर
धन्यवाद तू फेक इथे

समस्त बाप्ये घाबरती का
ते बळेच दादा होती इथे

चढला डोंगर, सुचला वृत्तांत
दुसर्‍याच दिवशी टंक इथे

विपु, समस, अन विपत्र खाते
फिरवी रिक्षा रोज इथे

दोन डझनांची कर्तबगारी
क्रमशः पिडूनी टंच इथे

आखाड्यातल्या पैलवानाला
'जमीनी'वर शब्द सुचे
मतला, काफिया, तरही देऊन
सुचली गझल टाक इथे

सरकार दरबारी तक्रारीला
नाही तुझिया अंत इथे

गर्दी जमवून गप्पा छाटी
दिवसभर तू पडिक इथे

दात घासले, आंघोळ केली
जे सुचले ते टाक इथे

अस्तित्व आपुले दाखवण्या तू
जे सुचले ते टाक इथे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्तित्व आपुले दाखवण्या तू
जे सुचले ते टाक इथे

>>. वा मस्तच !

आखाड्यातल्या पैलवानाला
'जमीनी'वर शब्द सुचे
मतला, काफिया, तरही देऊन
सुचली गझल टाक इथे?>>

तरीच ! तरीच गझलांचा विभाग आखाडा झाला आहे. Lol

आंबारावांनी मात्रा मोजल्या नाहीत का?

सही...

आंबा१, प्रसन्न, मनिमाऊ, चक्रमचाचा तुमचे प्रतिसाद उत्साह वाढवणारे असतात Happy
सामोपचार, रियाताई, दोन्ही केदारदादा, विनायकदादा तुमचेही आभार Happy

Rofl

व्वा..........तुमच्या काम्पिटीशन ला "सुहास रत्नाकर धारप" आहेत Happy

मस्तच Rofl

उदयन.. भाऊ, सस्मित ताई, इब्लिस भाऊ, मुक्तेश्वर दादा तुम्हाला अनेक धन्यवाद Happy

Biggrin Lol Biggrin
<<कमळ, चरखा, घड्याळ, हत्ती
बस उरावर, ठोक इथे >>
आणि
<<समस्त बाप्ये घाबरती का
ते बळेच दादा होती इथे >>
तुफान आवडले............... Wink

Pages