गोडवा..

Submitted by के अंजली on 6 August, 2012 - 09:12

बरसला हा पाऊस

माझा भिजला गं ओस

तिथे गोडवा रुजला

तुझ्या डोळ्यात टिपूस

मी साखर घोळली

तुझ्या गुर्‍हाळाचा कस

असा भिजलो तुझ्यात

जणू देह ही तुळस...!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जणू देह ही तुळस - यातील तुळशीचे कनेक्शन समजले नाही.

बाकी ओळी व कविता उत्कृष्टच

(मी साखर घोळली - तेथे साखर घोळली केल्यास आठ अक्षरे व्हावीत, अर्थात, त्याला काही सिग्निफिकन्स असला तरच, नाहीतर अवांतर समजावेत)

<<<तिथे गोडवा रुजला

तुझ्या डोळ्यात टिपूस

मी साखर घोळली

तुझ्या गुर्‍हाळाचा कस

असा भिजलो तुझ्यात>>>

व्वा

असा भिजलो तुझ्यात

जणू देह ही तुळस...! >> व्वा

तुळ्स = रूक्मीनीच्या प्रती पारड्यातील एका पानाचे जडत्व. या अर्थाने बरोबर ?? Happy

तू पाऊस अन मी तुझ्यात भिजणारी तुळस >> वा खूप सुन्दर !!

कवितेतल्या गोडव्याबद्दल सर्वान्शी सहमत

बेफीजी म्हणतात तसे ......अर्थ लावताना पर्फेक्ट्ली इन्टरलॉक न करू शकणारे सन्दर्भान्चे दुवे काही ओळीत आहेत !!
काही जुजबी बदल करून व ओळीन्चा क्रम बदलून हीच कविता नव्याने माण्डता यईल असे वाटले

मी साखर घोळली...तुझ्या गुर्‍हाळाचा कस >>इतका भाग हटवला तरी कविता एकसन्ध होईल (गोडवाही टिकून राहीलच!!)

मुळात त्या दोन ओळीबद्दलच अधिक विचार व्हायला हवा होता त्यान्चे प्रयोजन, त्या उपमा / रूपके समर्पकतेने वापरताना करावे लागणारे चिन्तन इत्यादी बाबी व्यक्तिशः तपासून पाहाव्यातच अशी पर्सनल विनन्ती !!

एक मात्र खरे ; आता अहे त्या स्वरूपातही एकेक ओळ एकेक कविता वाचल्याचा आनन्द देते आहे

धन्यवाद