Submitted by के अंजली on 6 August, 2012 - 09:12
बरसला हा पाऊस
माझा भिजला गं ओस
तिथे गोडवा रुजला
तुझ्या डोळ्यात टिपूस
मी साखर घोळली
तुझ्या गुर्हाळाचा कस
असा भिजलो तुझ्यात
जणू देह ही तुळस...!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जणू देह ही तुळस - यातील
जणू देह ही तुळस - यातील तुळशीचे कनेक्शन समजले नाही.
बाकी ओळी व कविता उत्कृष्टच
(मी साखर घोळली - तेथे साखर घोळली केल्यास आठ अक्षरे व्हावीत, अर्थात, त्याला काही सिग्निफिकन्स असला तरच, नाहीतर अवांतर समजावेत)
<<<तिथे गोडवा रुजला
तुझ्या डोळ्यात टिपूस
मी साखर घोळली
तुझ्या गुर्हाळाचा कस
असा भिजलो तुझ्यात>>>
व्वा
(No subject)
असा भिजलो तुझ्यात जणू देह ही
असा भिजलो तुझ्यात
जणू देह ही तुळस...! >> व्वा
तुळ्स = रूक्मीनीच्या प्रती पारड्यातील एका पानाचे जडत्व. या अर्थाने बरोबर ??
छोट्याशा कवितेत खूप गोडवा
छोट्याशा कवितेत खूप गोडवा आहे.
गोड कविता !
गोड कविता !
आभार!
आभार!
आ हा हा.... कित्ती गोड......
आ हा हा.... कित्ती गोड......
तू पाऊस अन मी तुझ्यात
तू पाऊस अन मी तुझ्यात भिजणारी तुळस >> वा खूप सुन्दर !!
कवितेतल्या गोडव्याबद्दल सर्वान्शी सहमत
बेफीजी म्हणतात तसे ......अर्थ लावताना पर्फेक्ट्ली इन्टरलॉक न करू शकणारे सन्दर्भान्चे दुवे काही ओळीत आहेत !!
काही जुजबी बदल करून व ओळीन्चा क्रम बदलून हीच कविता नव्याने माण्डता यईल असे वाटले
मी साखर घोळली...तुझ्या गुर्हाळाचा कस >>इतका भाग हटवला तरी कविता एकसन्ध होईल (गोडवाही टिकून राहीलच!!)
मुळात त्या दोन ओळीबद्दलच अधिक विचार व्हायला हवा होता त्यान्चे प्रयोजन, त्या उपमा / रूपके समर्पकतेने वापरताना करावे लागणारे चिन्तन इत्यादी बाबी व्यक्तिशः तपासून पाहाव्यातच अशी पर्सनल विनन्ती !!
एक मात्र खरे ; आता अहे त्या स्वरूपातही एकेक ओळ एकेक कविता वाचल्याचा आनन्द देते आहे
धन्यवाद