पाहीलेस का कधी तू, म्हशीस रेकताना? (विडंबन)

Submitted by A M I T on 9 October, 2012 - 23:40

सतीश देवपुरकर गाव सोडताना मला सुचलेलं काही..

प्रिये नकोस गाऊ, बेसुर ऐसे गाणे
पाहीलेस का कधी तू, म्हशीस रेकताना?

शेजारणीसवे मजला, पाहीलेस हसताना
जखमी कपाळ केलेस, पोळ्या तू लाटताना

दि'सेल' ( THE SALE ) तितुक्या केल्या, साड्या तुला खरेदी
थकलो दुकानदारांस, पैसे मी वाटताना

चिक्कार मिठ टाकू की गोळी जुलाबाची?
ऐसा विचार केला, मी डाळ रांधताना

परवा जो बरमुडा, चोरीस होता गेला
दिसला तो शेजारच्या, गच्चीत वाळताना !

देतो सदा धडे जो, हिम्मत नि धाडसाचे
त्या मित्रास पाहीले, लाडू मी बांधताना !

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमट्या शेवटचे दोन शेर आहेत चांगले, पण इथे बसत नाहीत.

शेजारणीसवे मजला, पाहीलेस हसताना
जखमी कपाळ केलेस, पोळ्या तू लाटताना >> हा शेर जबरदस्त Lol Rofl

खरीखुरी विडंबने लिहायची असतील, तर कृपया मीटरमधे लिहिणे शिकून घ्या. म्हणजे एकंदर लिखाण त्यातल्यात्यात कमी सॅड होईल.

ज्ञानेशजींशी पुर्ण सहमत. हे विडंबन मीटरमध्ये लिहलं असतं तर यातल्या नवर्‍याच्या दु:खाची तीव्रता निश्चितच कमी झाली असती. पण मीटरमध्ये लिहून मी भुतलावरील समस्त नवर्‍यांच्या प्रातिनिधिक दु:खाशी प्रतारणा करू इच्छित नाही. (हायला कसला प्राज्ञ मराठी बोलू लागलोय मी हल्ली..! )

प्रतिसादकांचे आभार Happy

<<देतो सदा धडे जो, हिम्मत नि धाडसाचे
त्या मित्रास पाहीले, लाडू मी बांधताना !<< Lol

<प्रिये नकोस गाऊ, बेसुर ऐसे गाणे
पाहीलेस का कधी तू, म्हशीस रेकताना<<

आम्ट्या...तुझ्या लग्नात मी तुझ्या या सगळ्या कवितांच/ लेखांचे प्रिंट काढुन वर स्टेपल मारुन तुझ्या बायकोला भेट देणार आहे.

मग बघते रोज तुम्हा दोघांची खडांगजी! Wink

अमित, Lol
तु कवितेला शिर्षक काहीही दिलंस तरी मी ते 'लाटणं Back' 'लाटणं Returns', 'लाटणं once again', 'लाटणं part II' असंच वाचते. अरे मुलांच्या प्रत्यक्ष आयुष्यात बायको कशीही मिळो, पण ती भेटण्याआधी तरी त्यांच्या मनात रम्य कल्पना असतात. तु आतापासुनच इतकं टेरर कल्पनाचित्र निर्माण केलं आहेस. लगीन करायचं आहे का नाही? Wink