Submitted by A M I T on 9 October, 2012 - 23:40
सतीश देवपुरकर गाव सोडताना मला सुचलेलं काही..
प्रिये नकोस गाऊ, बेसुर ऐसे गाणे
पाहीलेस का कधी तू, म्हशीस रेकताना?
शेजारणीसवे मजला, पाहीलेस हसताना
जखमी कपाळ केलेस, पोळ्या तू लाटताना
दि'सेल' ( THE SALE ) तितुक्या केल्या, साड्या तुला खरेदी
थकलो दुकानदारांस, पैसे मी वाटताना
चिक्कार मिठ टाकू की गोळी जुलाबाची?
ऐसा विचार केला, मी डाळ रांधताना
परवा जो बरमुडा, चोरीस होता गेला
दिसला तो शेजारच्या, गच्चीत वाळताना !
देतो सदा धडे जो, हिम्मत नि धाडसाचे
त्या मित्रास पाहीले, लाडू मी बांधताना !
* * *
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धम्मकलाडू मिळेल.
धम्मकलाडू मिळेल.
अगदी 'दर्द-भरी' गझलच रचलीत
अगदी 'दर्द-भरी' गझलच रचलीत राव तुम्ही. खत्तर्नाक.
बहोत खुब
बहोत खुब
(No subject)
लै भारीए राव....
लै भारीए राव....
आमट्या शेवटचे दोन शेर आहेत
आमट्या शेवटचे दोन शेर आहेत चांगले, पण इथे बसत नाहीत.
शेजारणीसवे मजला, पाहीलेस हसताना
जखमी कपाळ केलेस, पोळ्या तू लाटताना >> हा शेर जबरदस्त
खरीखुरी विडंबने लिहायची
खरीखुरी विडंबने लिहायची असतील, तर कृपया मीटरमधे लिहिणे शिकून घ्या. म्हणजे एकंदर लिखाण त्यातल्यात्यात कमी सॅड होईल.
ज्ञानेशजींशी पुर्ण सहमत. हे
ज्ञानेशजींशी पुर्ण सहमत. हे विडंबन मीटरमध्ये लिहलं असतं तर यातल्या नवर्याच्या दु:खाची तीव्रता निश्चितच कमी झाली असती. पण मीटरमध्ये लिहून मी भुतलावरील समस्त नवर्यांच्या प्रातिनिधिक दु:खाशी प्रतारणा करू इच्छित नाही. (हायला कसला प्राज्ञ मराठी बोलू लागलोय मी हल्ली..! )
प्रतिसादकांचे आभार
<<देतो सदा धडे जो, हिम्मत नि
<<देतो सदा धडे जो, हिम्मत नि धाडसाचे
त्या मित्रास पाहीले, लाडू मी बांधताना !<<
<प्रिये नकोस गाऊ, बेसुर ऐसे गाणे
पाहीलेस का कधी तू, म्हशीस रेकताना<<
आम्ट्या...तुझ्या लग्नात मी तुझ्या या सगळ्या कवितांच/ लेखांचे प्रिंट काढुन वर स्टेपल मारुन तुझ्या बायकोला भेट देणार आहे.
मग बघते रोज तुम्हा दोघांची खडांगजी!
अमित, तु कवितेला शिर्षक
अमित,
तु कवितेला शिर्षक काहीही दिलंस तरी मी ते 'लाटणं Back' 'लाटणं Returns', 'लाटणं once again', 'लाटणं part II' असंच वाचते. अरे मुलांच्या प्रत्यक्ष आयुष्यात बायको कशीही मिळो, पण ती भेटण्याआधी तरी त्यांच्या मनात रम्य कल्पना असतात. तु आतापासुनच इतकं टेरर कल्पनाचित्र निर्माण केलं आहेस. लगीन करायचं आहे का नाही?
ममा
ममा
खुपच छान....
खुपच छान....
दि'सेल' ( THE SALE ) हा
दि'सेल' ( THE SALE )
हा शब्द मस्त.