(.....मी लग्नाळू झालो आहे !!)

Submitted by वैवकु on 1 October, 2012 - 03:58

आई-बाबा बोलत होते मी स्वप्नाळू झालो आहे
(हंगामच आहे लग्नांचा मी लग्नाळू झालो आहे !!)

बसल्याबसल्या काल तुझ्या मी आठवणी काढत बसलेलो
त्यांच्या मोरपिशी स्पर्शाने मी 'लाजाळू' झालो आहे

झिरपत जाती अश्रू त्यांची ओल दाटते मनात माझ्या
दुर्दैवाच्या कुंद हवेने मी साजाळू झालो आहे

दिली नोकरी सोडुन तेंव्हापासुन नुसता गझला करतो
रात्रंदिवसा बीझी असतो मी कष्टाळू झालो आहे

शेर कितीही केल्यावरही विठ्ठल उरतो उरात माझ्या
वाण लागला आहे त्याचा मी कनवाळू झालो आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्ण गझल छान आहे,
पण
रात्रंदिवसा बीझी असतो मी कष्टाळू झालो आहे >>> मधला बीझी खटकतो, तुमची शब्दसम्पदा इतकी चान्गली आहे, इन्ग्लीश ची गरज का पडावी?

चिखलू दादा
इब्लिस राव धन्यवाद
_________________________
बीझी बद्दलः
१)मला तोच शब्द सुचला
२) मराठी गझलेत उर्दू हिन्दी शब्द आले तर तो गुन्हा असतो पण ईन्ग्रजी शब्द आला तर मानाचे समजले जाते
इतकेच काय ग्राम्य मराठी शब्द आला की हझलेच शेर ठरवून गौण गणला जातो इन्ग्लिश वर्ड आला की स्वतःची प्रेस्टीज राखत गालातल्यागालात सभ्यपणे तिरकस/खोचक हसून वा वा म्हणायची पद्धत आहे (माझी वैयक्तिक निरीक्षणे .....स्वाभ्यास वगैरे!!)

वरील दोन रीजन्स मुळे तो शब्द तसाच राहू दिलाय !!

विचारल्याबद्दल धन्यवाद हो चिखलूभौ !!
अन् हो "तुमची शब्दसम्पदा इतकी चान्गली आहे"..असे म्हटल्याबदाल पुनश्च धन्स !!:)
__________________________

रिया जितू तुमचेही शतशः आभार

वैभव, मनापासून अभिनंदन,या गझलेतून तुम्ही एक वयोगट अन मनोवस्थाच कवितेत आणली आहे गझलचा फॉर्म सांभाळून अन शेवटचा विठ्ठ्लही अपरिहार्य! सदासर्वदा.. त्याच्यावतीने तुमचे आभार.

एक शंका विचारतो.

शेर कितीही केल्यावरही विठ्ठल उरतो उरात माझ्या
वाण लागला आहे त्याचा मी कनवाळू झालो आहे

वाण लागला आहे त्याचा.
म्हणजे काय?
वाण नाही पण गुण लागला असे म्हणतात. "वाण" हे जेनेटिक प्रकरण आहे, गुण हे अ‍ॅक्वायर्ड.. तुम्ही नवा अर्थ कुठे मिळविला आहात काय? असल्यास संदर्भ देणार का?

नमस्कार इब्लिसराव
आपण दिलेली म्हण मी माझ्या लहानपणापासून अशी म्हणत आलो आहे

............"गूण नाही पण वाण लागणे"

आता माझ्याकडे कोण्ताही शब्दसंग्रहच नसल्याने 'वाण'चे अनेक अर्थ मी आपल्याला खुलासेवार सांगू शकत नाही क्षमस्व(शिवाय या कलेत देवसरानी पेटन्ट मिळवले आहे अशी कुजबूजही कानी आली होती !!;))पण मला त्या म्हणीचा लागलेला अर्थ असा

"एखाद्याच्या सोबत राहून त्याचा गूण (सद्गुण)लागला नाहीच उलट त्याचा अवगुणच (वाण) लागला" असा अर्थ बहुधा होत असावा

वाण =अवगुण हेही मी आपल्याला पटवून देवू शकत नाही त्याबद्दलही क्षमस्व!!

धन्यवाद !!

इब्लिस राव आमच्या मनातला अर्थ बरोबरय
आताच आन्तरजलावर शोध घेतला ...ही पहा लिन्क !!

http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php

_________________________

वाण...
Noun(2)

(R)(H)(E) वाण, वायन - व्रताच्या सांगतेसाठी दिलेली काही वस्तू "ह्या वर्षी संक्रांतीला मी वाण म्हणून कंगवे दिले. "
(R)(H)(E) कमतरता, चणचण, कमतणूक, वाण, कमी, कमीपणा, तुटवडा - कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती "बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते."
___________________________

माझे निरीक्षण : इथे म्हणीत वापरलेला वाण हा शब्द "उणीव " चा ग्राम्य अवतार असावा असे मलातरी वाटते आहे

शब्दशः अवगुण आसा अर्थ होत नसला तरी ध्वन्यार्थ क कय तो बरोबरचय म्हणायचा !!! हो कि नै इब्लिसराव??

वाण (p. 746) [ vāṇa ] m n (वर्ण S) Color. Pr. ढवळ्याच्या शेजारीं बांधला पोंवळा वाण नाहीं पण गुण लागला. 2 A specimen or sample, an instance of the color or kind of. वाण पालटणें -फिरणें -बदलणें g. of s. To have one's or its complexion, color, or hue reversed or altered;--used of living beings and of gold, silver, pearls, diamonds &c. वाण मारणें To lose or change color or the general appearance betokening the condition or health (of man or beast); to look wan. Ex. आज घोडा वाण मारल्यासारखा दिसतो.
<<
मोल्सवर्थ.

वाण शब्दाचे इतर अर्थ, त्या म्हणीत संबंधीत नाहीत. यंदाचे बियाणे कोणत्या 'वाणा'चे आहे? वाण हे तुमचे जेनेटिक गुण दाखवितात.
मोल्सवर्थ, दाते/कर्वे हे जालावर अधिकृत आहेत. मराठी विश्वकोश ऑनलाईन आहे, पण अद्याप पूर्ण नाही.

काय झालं वैभवराव?
वाण मिळालं का संक्रांतीचं?? चुकीची म्हण ऐकू आली तर म्हणून टाकावं चुकीची ऐकली होती ब्वा! हो कि नै? की मराठी म्हणींच्या संग्रहाचीच लिंक देऊ आता? Wink

वैभवा!
झिरपत जाती अश्रू त्यांची ओल दाटते मनात माझ्या
दुर्दैवाच्या कुंद हवेने मी साजाळू झालो आहे
<<<<<<<<<<<<<<अर्थ समजला नाही.
साज शब्द माहिती आहे. पण साजाळू म्हणजे?.............
मनात झिरपणा-या अश्रूंची ओल व दुर्दैवाची कुंद हवा, त्यामुळे माझे साजळू(?) होणे..............नाते व अर्थ पोचला नाही.
कुंदचा काय अर्थ तुझ्या मनात होता?

लग्न......लाग्नाळू
लाज...........लाजाळू
साज..........साजाळू
कष्ट..........कष्टाळू
स्वप्न........स्वप्नाळू
कनव/कणव/कनवाळ...........कनवाळू/कन्हवाळू.......ममताळू/प्रेमळ
कनवाळु शब्द आहे, कनवाळू नाही.
कन्हवाळू या शब्दात ‘ळू’ बरोबर. कनवाळु मधे ‘ळु’ बरोबर, ‘ळू’ चूक.

वरील काफियांमधे लाजाळू, कष्टाळू, कन्हवाळू/कनवाळु (कनवाळू नव्हे) हेच शब्द प्रचलित, प्रस्थापित/वापरातील आहेत, ज्यांचा अर्थबोध होतो.

लग्नाळू, साजाळू, स्वप्नाळू ..........हे शब्द माझ्या तरी वाचनात आले नाहीत.

लग्न, स्वप्न शब्द नित्य वापरातील असल्याने त्यांचे अर्थ कयासाने समजून घेतले जावू शकतात. पण, साजाळूचा अर्थ समजत नाही.

टीप: गझलेमधे नित्य वापरातील, बोली, प्रचलीत शब्द वापरावेत, नवीन, मनचे शब्द तयार करून वापरू नयेत, असे जाणकार म्हणतात. कवितेत ते चालते. कदाचित काहींना त्याचे अप्रूप व कौतूक देखिल असते, असे मी पाहिले आहे, पण गझलेत अशा गोष्टी दोष मानले जातात...........इति जाणकार!

अवांतर....वैभवा, तू लग्नाचेच स्वप्न सारखे पहात आहेस, असे तुझ्या आईबाबांना वाटते आहे, असे तुला म्हणावयाचे आहे काय? लग्नाचा हंगाम आहे, म्हणून तू लग्नाळू झाला आहेस काय? लग्नाचे स्वप्न सारखे पहातो आहेस म्हणून नाही का?

लग्नाळू.........म्हणजे लग्नास उत्सुक, लग्नास आसुसलेला, लग्नासाठी हुरळलेला/उतावीळ झालेला, गुडघ्यास बाशिंग बांधून तयार असलेला, उपवर असलेला, नेहमीच लग्नाचे कर्तव्य असलेला..............असे अर्थ काढायचे का?
सोडुन, पाहुन......टाळावे. सोडून, टाळून असे करावे. गीतात, कवितेत ते चालते.
गझलेत ते खटकते. वृत्तशरणेतेचा आरोप अशाने येवू शकतो. तू निवडलेले मात्रावृत्त हे काही इतके अवघड नाही की, हे दोष काढता येवू नयेत.

त्यातल्या त्यात, तुझी ही गझल मला अशी अभिव्यक्त कराविशी वाटली.
हे शेर पर्यायी नाहीत. तुझ्या मूळ शेरांचा मला आदर आहे.
फक्त एक भिन्न अभिव्यक्ती म्हणून तू या शेरांकडे पहावेस!

आई-बाबा बोलत होते...मी स्वप्नाळू झालो आहे!
त्यांची पक्की खात्री झाली.....मी लग्नाळू झालो आहे!!

आठवणींचे तुझ्या मुलायम मोरपीस फिरते हृदयावर!
मोहरून नखशिखांत त्याने, मी लाजाळू झालो आहे!!

डोळ्यांमधल्या अश्रूंची ती ओल पसरते उरात माझ्या!
नशिबामधल्या कुंद हवेने मी साजाळू झालो आहे!!

जशी नोकरी सुटली तैशी नुसत्या गझला लिहितो आहे!
अहोरात्र गझलेत बुडाल्याने कष्टाळू झालो आहे!!

विठ्ठल! विठ्ठल! अखंड असतो जप माझ्या या ओठंवरती!
जपामुळे त्या विठ्ठलापरी मी कन्हवाळू झालो आहे!!

.............प्रा.सतीश देवपूरकर

कन्हवाळू = कनवाळू यात काही फरक आहे का सर अर्थाच्या बाबतीत ?
असो
माझ्या शेरातले अर्थ सान्गतो ..........

१) आई बाबा ; मी आजकाल स्वप्नाळू झालो आहे असे बोलत होते..... आपापसात........... मी म्हणतोय (कन्सातला मिसरा ) की मी स्वप्नाळू होणे बरोबरचय कारण हन्गामच लग्नाचाय ना !!(वीणीचा असतो तसा )
मी स्वप्नाळू नाहीये मला माझ्या परीस्थितीची पूर्ण कल्पना आहे!.......... पण स्वप्न पहायला काय हरकत आहे ?लग्नाळू व्हायला काय हरकत आहे ?असा माझा सवाल आहे हा शेर उपहासात्मक आहे स्वतः ला "चिमटा काढत" हा शेर लिहिलाय

२)दुसरा शेर रूमानी करण्याचा प्रयत्न केलाय मी............ प्रेयसीच्या आठवणींचा मोरपिशी स्पर्श अन त्याने मी लाजाळू होणे ही कल्पना केली आहे यात (लाजाळू= श्लेष , लाजाळू नावाची एक वनस्पतीही आहे तिचे नाव तसे का पडले हे आपल्याला माहीत असेलच )

३)तिसरा शेर साजाळू =भाववाचक नाम की काय आहे बहुधा ....क्रियापद साजाळणे....सादाळणे असेही म्हणतात
आमच्या गावाकडे साजाळणे म्हणतात
चुरमुरे पोहे लाह्या अशा प्रासादिक (प्रसादात वापरल्या जाणार्‍या) वस्तू पंढरपुरात खूप मिळतात त्या हल्ली आहे तशा कुंद हवेने मऊ पडतात त्याला साजाळ्णे म्हणतात
इथे , मी साजाळू झालोय असे म्हटले आहे ...........बाकी का व कसे ते शेरात आलेच आहे

४+५)चौथा शेर समजायला सोपाय!!पाचवाही सोपाचय !!
__________________________________________________________________

  • सर तुमचे शेर चांगले आहेत पण माझे जास्त प्रवाही आहेत बोलके आहेत !!
  • नवे शब्द ह्या गझलेत आलेले नाहीयेत . कोणास जर ठावूक नसतील तर शायराचा काय दोष नै का ??बाकी नवे शब्द जर गझलेला चालत नसतील तर ती मराठी भाषेला काय देणार अन मग तिचा मराठीपणा आम्हीतरी का मिरवायचा ?????असा माझा एक प्रांजळ प्रश्न आहे !!
  • लघू गुरूबद्दल आपले मत जुने आहे (पारंपारिक म्हणूया हवे तर) आजकालचे नवे मत भिन्न आहे
    शेर चांगला होत असेल तर हरकत नसते म्हणे ..........आता शेर चांगला की कसे हे शायर स्वत: ठरवू शकतोच पण त्यातही तज्ञ /मातब्बर /प्रस्थापित शायर लोक असतातच न्यायनिवाडा करायला!!......... ते देतील तो न्याय मान्य करावा लागतो म्हणे !!.
    .
    • मी ऐकीव माहिती सांगितली मला खरे पाहता अशा बाबींशी फारसे देणेघेणे नसते !!.

____________________________________________
असो आपले काही "समखयाली-समजमीनी" शेर (पर्यायीला पर्यायी शब्द!!;))बर्‍यापैकी आवडले आहेत हे आवर्जून नमूद करतो आहे

धन्यवाद
लोभ असावा

आपला नम्र
-वैभवा

Happy

सर मी पुन्हा यावेळी पुण्यात आलो की (४-८ दिवसात येणारय)........यावेळी तरी प्रत्यक्ष दर्शन द्यावे ही प्रार्थना !!
Wink

वैवकु इब्लिसदादा इज म्हणिंग करेक्ट
वाण म्हणजे रंग, रुप ईटीसी ईटीसी
म्हणुन तर ढवळ्या पवळ्या अस आहे
ढवळ्याचा पांढरा रंग काही घेतला नाही
पण गुण मात्र घेतले
अस Happy

वैभवा!
शेर नंबर १..........
लग्नाचा हंगाम, लग्नाचे स्वप्न बघणे, लग्नाळू होणे, लग्नविषयक स्वप्नाळू होणे...........
असाच अर्थ आहे ना तुझ्या मनात वैभवा?
मग अरे तो अर्थ मी दिलेल्या शेरात प्रतीत होत नाही काय?

शेर नंबर २......
मी दिलेला दुसरा शेर रुमानी नाही काय?
मला वाटते नादमयता, लाघवी शब्दकळा, प्रामाणिक ओथंबती अभिव्यक्ती, व्याकरणीय दृष्ट्या निर्दोषता इत्यादी गुण तुला मी दिलेल्या शेरात दिसले नाहीत का?

शेर नंबर ३.......
‘सादळ’असा शब्द आहे, जे विशेषण आहे. स+आर्द्र...संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ होतो ओलसर.

‘सादळणे’ असे क्रियापद आहे, ज्याचा अर्थ होतो, ओलसर होणे, सदरणे.

‘सादाळणे’ किंवा ‘साजाळणे’ असा लिखित/मुद्रित शब्द माझ्या वाचनात नाही.

साजाळणे असा शब्दच अस्तित्वात नसल्याने ‘साजाळू’ शब्द अप्रस्तुत व निरर्थक वाटतो.
हा शेर माझ्याच्याने दुरुस्त करता येणार नाही,तद्वत काफिया वापरून. क्षमस्व!

टीप:
मी नमूद केलेले शब्द लिखित/मुद्रित स्वरुपात कुठे मिळतील?

गझलेने मराठीला काही देणे अपेक्षित नसते.

सशक्त , प्रचलित व निर्दोष मराठीत, गझलेने अभिव्यक्त व्हायचे असते.

कोणतीही भाषा ही समृद्ध, गोड व समर्थच असते.

ती भाषा वळवणारा व वापरणारा पाहिजे.

निर्दोष मराठी वापरून अभिव्यक्त होण्यात जर शायर थिटा पडत असेल, तर तो दोष मराठी भाषेचा नाही तर, त्या शायराचा असतो. त्याने स्वत:ची शब्दसमृद्धी वाढवायला हवी, चिंतन करायला हवे.
तेव्हा इथे मराठीचा मराठीपणा मिरवायचा प्रश्न येतच नाही.

चांगली, कलदार, प्रामाणिक व निर्दोष असेल, तर ती कलाकृती आपोआप प्रथितयश होते. तिची झांजीबार करून मिरवणूक काढावी लागत नाही.

मराठी शुद्धलेखनाचे नियम हे कालपरत्वे बदलतात.

आधुनिक शुद्धलेखनाच्या लिखित/मुद्रित नियमांनुसार जे आहे, तेच मी माझ्या प्रतिसादात लिहिले आहे. References हवे असतील, तर तेही मी देवू शकतो. पण, आता मी घाईत आहे, कारण उद्या मला भूशास्त्रीय दौ-यावर जायचे आहे.

गझल लिहिताना शक्यतोवर कोणतीही सूट घेवू नये, असे बाळकडू आम्ही तरी जाणकारांकडून व गुरुवर्यांकडून प्यालो.
मी जे आचरतो, ते सांगितले. बाकी शेवटी लिहिणा-याची मर्जी!

आजकालचेच मत मी दिले आहे. ते भिन्न असण्याचे कारणच नाही.
जर सहजी, निर्दोष शब्द, वृत्तात बसत असतील, तर असली सूट घेण्यात काय अर्थ आहे?

चांगल्या शेराला त्याचे चांगलेपण सिद्ध करावे लागत नाही. जनताजनार्धन शेर ऎकल्यावर त्याचा फैसला करतेच!

कितीही गाजावाजा करून प्रसिद्ध झालेली सुमार कलाकृती ही काळाच्या ओघात कधी विरून जाते याचा पत्ता देखिल लागत नाही.

जे सत्य, शुद्ध, निर्मळ व निर्दोष असते ते काळाच्या ओघात कायम राहते, नव्हे ते कालातीत असते. प्राचीन, अर्वाचीन काळाचे असे काहीच रहात नाही!

शायराने जरी परवा केली नाही तरी, काळ प्रत्येकाची परवा करतोच व ज्याला त्याला ज्याचे त्याचे श्रेय हे देतच असतो.

म्हणूनच म्हणतात ना की, कालाय तस्मै नम:!

मी दिलेले शेर आवडून घेण्याच्या कनवाळूपणाबद्दल धन्यवाद!
..................प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................................