कुठेही कधीही मराठीमधे लिहा - गुगल मराठी संगणक प्रणाली (google marathi transliteration IME)

Submitted by सावली on 19 May, 2010 - 23:25

काल google marathi transliteration IME download केले
http://www.google.com/ime/transliteration/

वापरावयास सोपे वाटते, आणी शब्द पण सुचवते (like word auto complete )

या प्रणाली ने कुठेही मराठी लिहिता येते. म्हणजे आउट्लुक, नोट्पॅड, वर्ड अस कुठेही. फक्त शिफ्ट अल्ट दाबुन इंग्रजी व मराठी भाषा बदलता येतात.

हे विविध भाषेत उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला दुसर्‍या कुठल्या भाषेसाठी सुद्धा वापरता येईल.

एक उदाहरण.
marathi.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबू... गुगलचे पॅकेज वापरून टाईप केलेले युनिकोड मध्येच आहे.. ते नोट पॅड मध्ये सेव्ह करताना युनिकोड मध्येच सेव्ह करावे लागते तरच परत उघडल्यावर दिसते..

ओक इब्लिस, थ्यान्क्स Happy पण जो डाटा करायचा तो "युनिकोड" मधे करायचा आहे, जेणेकरुन तो नेट वर पब्लिश करता येईल, व जुने बरहाचे फॉण्ट्स "युनिकोड" नाहीत. म्हणून युनिकोड चालविणारी सिस्टीम हवी आहे. श्री मकरंद गद्रे यांनी बनविलेली KWDESetup ही सिस्टिम मी आत्ता वापरतोय, पण त्यान्नी सेट केलेले रुल्स, अन येथिल टायपिन्गची पद्धत यात फरक पडून वेग मन्दावतोय.

समहाऊ, मायबोलीवरील हे टेक्स्ट माझे इथे वर्ड मधे चौकोन चौकोन दिसते Sad मध्यन्तरी माझा सी ड्राईव्ह फॉरमॅट केला होता, तेव्हापासून हे असे होतय. काय उपाय? पूर्वी मी स्तोत्रे धाग्यावरुन मजकुर कॉपीकरुन वर्ड मधे पेस्ट करू शकायचो.

लिंबू... मराठी फॉन्ट मिसिंग असावा.. तो जर असेल तर विन्डोस लँग्वेज पॅक मधे मराठी फॉन्ट दिसावा म्हणून बदल करावे लागतील.. वरती इब्लिस ने दिलेल्या लिंक मध्ये आहे ते..

बाजो.. shift + alt एकत्र दाबा.. त्यामुळे उजवीकडे खालच्या कोपर्‍यात वरच्या नोटपॅड मध्ये जसा दिसतोय तसा छोटा टूलबार दिसेल.. हिंदी, मराठी दोन्ही भाषा घेतल्या असतील तर मराठी साठी दोनदा दाबावे लागेल.. आणि परत इंग्रजीवर जाण्यासाठी पण तसेच करावे लागेल.

बाजो Lol Lol Lol अगदी अगदी, मला पण घरी गेल्यावर हाच प्रॉब्लेम येणारे, पण कन्ट्रोल प्यानेल मधुन रिजनल लॅन्ग्वेज सेटिन्ग केल्यावर लॅन्ग्वेज बार मधुन भाषा सिलेक्ट केल्यावर त्या त्या भाषेत (लिपीत) टायपिन्ग होऊ शकेल असे वाटते आहे. आज करतो प्रयत्न घरी.
हिम्या, पण असे होऊ शकते का? की एक डाटाएन्ट्री फॉर्म फिल करताना तिथे डायरेक्ट मराठीत (देवनागरीत) टाईप होईल जसे की इथे मायबोलीवर होते?
मायबोलीवर काय वापरतात? ते देखिल मला चालेल, चालेल काय पळेल! Happy

लिंबू... तो डाटाएन्ट्री फॉर्म जर सपोर्ट करत असेल तर नक्कीच डायरेक्ट टायपिंग करता येईल...

मायक्रोसॉफ्टच्या कुठल्याही अ‍ॅप्लिकेशनमध्ये डायरेक्ट टाईप करता येते..

बाळू जोशी.,

तुम्ही विंडोज एक्सपी वापरत आहात असं गृहीत धरतोय. तर तुम्हाला 'लँग्वेज बार' सुरू करावा लागेल. त्यासाठी असे जा:

१. start --> control panel --> regional and language options

२. मग एक डायलॉग उघडेल. त्यात language टॅबवर जा. प्रथम supplemental language support मध्ये जाऊन install files for complex scripts and right-to-left... या पर्यायावर टिक नसेल तर टिक करा.

३. मग details वर क्लिक करा.
reg_lang.JPG

४. मग text services and input language असा दुसरा डायलॉग उघडेल.
text_serv_ip_lang1.JPG

५. या ठिकाणी मराठी कीबोर्ड दिसतोय का? दिसत नसल्यास add चे बटण दाबा आणि मराठी कीबोर्ड चढवा.

६. या text services and input language डायलॉगाच्या advanced टॅबवर जाऊन Turn off advanced text services या पर्यायावर टिक नाही असं करा.

६. ok दाबून दोन्ही डायलॉग बंद करा.

७. हे सगळं झालं की तुम्हाला पीसी रीस्टार्ट करावा लागेल! हुश्श!

आ.न.,
-गा.पै.

गापै,तुम्ही देत असलेला पर्याय योग्यच आहे पण तो वापरणे खूपच कठीण आहे....
सद्या मी त्याचा सराव करतोय..त्यामुळे मला लक्षात येतंय की नेहमीच्या युनिकोड(बरहा,गमभन इत्यादि) टंकन प्रणालीपेक्षा ही प्रणाली बरीच क्लिष्ट आहे...पण एकदा जमली तर मग अतिशय उत्तम अशीच आहे....

आंबा | 8 October, 2012 - 19:14 नवीन
ते ऑटो कंप्लीट चं भिक्कारडं ऑप्शन बंद करता येईल का?

DesiSmileys.com

लिंबाजीराव,
अहो बराहा आय एम ई आहे वेगळं. बराहा डायरेक्ट असे नांव आहे.
ते चालवून वाट्टेल तिथे युनिकोडच लिहिता येतं..

पैलवान मी विन्डोज ७ अल्टिमेट वापरतोय...
छ्या: विन्डोज ८ आल्यावर तर आनखी मगजमारी. त्यात यूनिकोड बाय डिफॉल्त असेल काय?

बाळू जोशी,

विंडोज ७ शी माझा काहीच संबंध आला नाही! त्यामुळे मला तुमच्या संबंधी ठामपणे काही सांगता येत नाही! Sad

आ.न.,
-गा.पै.

limbutimbu, हो! Happy
आ.न.,
-गा.पै.

सर्वांना धन्यवाद.
प्रमोद आणि इब्लिस, बरहा जेव्हा नविन आले तेव्हापासुनची सर्व व्हर्जन्स माझ्याकडे आहेत. घरचे सर्व काम मी बरहामधेच करतो. प्रश्न तेव्हा आला, जेव्हा आधीच्या सर्व बरहा व्हर्जन्स मधिल फॉण्ट "युनिकोड" नाही, व युनिकोड वापरणारे बरहा१० ३० डॉलर मोजुन विकत घ्यावे लागतेच, शिवाय ते एकाच एका पीसीवर इन्स्टॉल होते, ते करण्याकरता देखिल नेट कनेक्शन वगैरे बाबी आहेत. सबब मला तो विचार सोडून द्यावा लागला.
काल गमभन बघितले, काहिच कळले नाही. Wink खरे तर पूर्वी मी ते वापरले होते, पण आता आठवतच नाही. शिवाय मूळ गरज, एखाद्या अ‍ॅप्लिकेशन मधे देवनागरीत लिहीणे हे ते पूर्ण करित नाहि.
Itrans चे संस्कृत लटेस्ट व्हर्जन बघितले, ते कामास येऊ शकेल, पण त्यान्चा कीबोर्ड बघता, सध्याचा जो गद्रेंचा वापरतोय, तोच चान्गला आहे असे वाटले.
माझी गरज आहे ती, मी ज्या पद्धतीने इथे मायबोलीवर टाईप करतो, त्याच सिक्वेन्सचा कीस्ट्रोक्स्चे अ‍ॅप्लिकेशन हवे आहे, जुने बरहा जवळपास तसेच आहे.
काल गुगलचा देखिल प्रयत्न केला, पण नेट कनेक्शन नसल्यामुले जमले नाही.
असो.

लिंबूशेठ, अहो विपूत मी जो बरहाचा दुवा दिलाय ते बरहा आयएमई ३ युनिकोडच आहे आणि ते उत्तम काम करते आणि फुकटही आहे..तुमच्याकडे फुकटातल्या बरहाच्या कोणत्या आवृत्त्या आहेत मला माहित नाही...पण मी तुम्हाला सांगतोय ती आवृत्ती तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल ह्याची खात्री आहे.

>>बरहा आयएमई ३ युनिकोडच आहे आणि ते उत्तम काम करते

अनुमोदन.
बरहा युनिकोड ३.०.
मी हेच वापरते आहे. कुठेही वापरता येतं. ईमेल, चॅट,एमएस ऑफिस कुठेही.

प्रमोदजी, धन्यवाद. बरहा ७ वापरून, युनिकोड फॉण्ट मधे त्या प्याकेजमधे लिखाण करता येते आहे, वेग अर्थातच वाढला आहे.
मात्र पुढील प्रॉब्लेम येतो आहे.
बरहामधे "~" या किचे बटन दाबले अस्ता भलताच हा "¬" असा आकार उमटतो (Alt+0172), व या कीशी सम्बम्धित कोणतेच अक्षर, जसे की कॅ, कॉ, ज्ञ, वगैरे टाईप करता येत नाही. असे का होत असावे?

तसेच घरी वा इथे ऑफिसमधे मंगल चा कॅरेक्टर म्याप बघितला अस्ता त्यात ज्ञ हे अक्षर दिसतच नाही.
इतकेच नव्हे तर पूर्वी टाईप केलेल्या वर्ड फाईल मधे ASCII सिलेक्ट करुनही ही अक्षरे येत नाहीत.
पण मी आधीच्या टाईप केलेल्या वर्ड मजकुरास बरहा मधे युनिकोड मधे कन्व्हर्ट करुन, मग तेथुन ते कॉपी करुन कुलवृत्तान्ताच्या पॅकेजमधे उमटवुन काम तर साधले, पण हा फारच द्राविडी प्राणायाम होतोय.

वर्डमध्ये बरहाने टंकण्याआधी तिथे ’मंगल फॉंट’ निवडून पाहा.

देवकाका, केले. पण प्रॉब्लेम तसाच आहे.

बरहात टाइप केले ... vadya.jpg

आता ते वर्डात कॉपी केले की .... वाद्य ... असे उमटते.

थेट वर्डमध्ये टंकून पाहा आंबा!
आणि मला सांग तुला कोणता शब्द अभिप्रेत आहे?

लिंबूशेठ, मला फोन करू शकाल का? म्हणजे तुमची समस्या नेमकी काय आहे ते कळू शकेल मला.
माझा नंबर आहे.... ०२२ २८०७८२७५ आणि ९०२९१२९८३८

Pages