अंबाजोगाई

Submitted by Prasad Chikshe on 4 May, 2012 - 02:27

नमस्कार
“मत भेद होने पर भी, मन भेद हो न पाये” हे अनेक लोकांकडे पाहून लगेच लक्षात येते. अंबाजोगाईत अनेक विचार नांदतात. त्या विचार प्रवाहासाठी उभे आयुष्य देणाऱ्यांची मांदियाळी या गावात आपल्याला दिसते. अनेक मोठे सामाजिक, शैक्षणिक प्रकल्प या लोकांनी उभे केले. आपल्या विचारांचे समर्थन करताना त्यांच्यात होणारे संभाषण म्हणजे कुणालाही सहज पणे समृद्ध करणारी वैचारिक जुगलबंदीच असायची. सरते शेवटी एकमेकांची मजा घेत व सर्वांचे अंबाजोगाईच्या विकासातील आवश्यक स्थान ते मान्य करत. अंबाजोगाईचे कधी Mono culture होऊ दिले नाही या लोकांनी. मतभेद असणारच पण व्यक्तिगत पातळीवर, किंवा कश्याच्याही बाबतीत एकमेकांवर पातळी सोडून टीका कधी कुणी केली नाही. आधीच्या पिढीने पाडलेले चांगले आदर्श आपण नक्कीच पुढे जपले पाहिजेत हे या सहवासातून समजत होते.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज आमचा स्वातंत्र्यदिन !!!

आम्ही गोदाकाठची माणसे ...कणभर घेऊन मणभर देणारी ...आईची आभाळमाया जपणारी आणि मातीचे पांग न विसरणारी ...आम्ही मराठवाड्याच्या रांगड्या मातीतली रांगडी माणसे ...आम्ही दोनदा स्वातंत्र्यलढा दिला ...एकदा इंग्रजाविरुद्ध आणि एकदा पाशवी निजामाविरोधात ... मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता.... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला....आम्ही इंग्रजांना आणि निजामालाही लोळविले ....मराठवाडा 17 सष्टेंबर रोजी सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात निजामाच्या तावडीतून निसटला ...पूढे विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला ...आम्ही कधीच महाराष्ट्रातून वेगळे होण्याची भाषा केली नाही ....मराठवाड्याच्या मातीने देशाला हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी माणसे दिली... एवढेच नव्हे, तर मराठवाड्याच्या या कसदार भूमीने या राज्याचे, देशाचे वैचारिक नेतृत्वही केले....ज्यांनीरझाकारांचा बेछूट गोळीबार अनुभवला, अनन्वित छळ सोसला, निझाम नामक कसायाने सर्व तऱ्हेची दडपशाही केली होती ... मराठवाड्यातील आबालवृद्ध निर्भयपणे निजामविरोधी लढ्यात सामील झाले होते.... रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या; पण हुतात्म्यांची वाण पडली नाही. पोलिसांच्या लाठ्या मोडल्या; पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत. असा हा दिव्य लढा होता....हा माणसांचा देश आज दुष्काळाच्या छायेत आहे ...चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वयाच्या नव्हेत, तर सोसलेल्या उन्हाळ्यांच्या आहेत इथल्या माणसांच्या .... रंगणारे गावरान संवाद, त्यातले रांगडे विनोद आणि हास्याचा खळाळ अनुभवायचा असेल तर या मराठवाड्यात ...आज हाच कणखर, राकट मराठवाडा दुष्काळाचे दशावतार अनुभवतो आहे.....गावातलीसारीच माणसंकाणसं आपल्याच प्रांतात देशोधडीला लागली आहेत....देशाने,महाराष्ट्राने आता आमचा अंत पाहू नये ...कानाखाली वाजवायलाही मराठवाडा मागेपुढे पाहत नाही ....आज आमचा मुक्तीसंग्राम दिन आहे...मराठवाड्याच्या मातीने अंगाखांद्यावर खेळवून जगायला ..लढायला शिकविले ....या काळ्या मातीला कोटी कोटी प्रणाम ...
निधडी छाती नि:स्पृह बाणा
लववी ना मान
अशा आमच्या मराठवाड्याचा
आम्हास अभिमान’’
जयहिंद ...जय महाराष्ट्र ...जय मराठवाडा !!!

ganesh symbol11.jpg

गणेशाच्या स्वागताला, दारी सडा नी रांगोळी
मायबोलीच्या गणेशा, वाही चित्रावर चारोळी !

गणेशाच्या उत्सवाला, घरी आरास सजवा
मायबोली गणेशाचे, चित्र रंगवा..सजवा !

गणेशाच्या उत्सवाला, नाना उपक्रम नी स्पर्धा
मायबोलीच्या कंपूंनो, माझा महाराष्ट्र गर्जा !

bolaa

>>> सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा!! <<<<
>>> आज आमचा स्वातंत्र्यदिन !!! <<<
हो की! हा विषय कसा काय बरे विस्मृतीत गेलाय? की विस्मृतीतच जावा, कोणाला माहितच असू नये अशीच तर आमची सभोवतालची परिस्थिती नाहीये ना? या आठवणीला उजाळा द्यावा असे कोणत्याच मिडीयाला, माध्यमाला, शिक्षणक्षेत्राला कधीच कसे वाटले नाही? का वाटले नाही? की वाटले पण सत्ताधीशान्चा "सेक्युल्यारिझम" आडवा आला? असो.
आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद Happy (मी खूपच उशिरा हा धागा बघितला, म्हणून धन्यवादासही उशीर झाला, क्षमस्व)

जाहीर सूचना

आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्‍यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्‍यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्‍यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.

लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.

सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्‍या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.

लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.

१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.

२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.

३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.

वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.

वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.

नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार अंबेजोगाईकर.
तुमच्यापैकी कुणाला अंबेजोगाईच्या श्री काशीनाथ देवीदास पाठक यांच्या मुलांबद्दल काही माहिती आहे का? ते आमच्या घराण्याचे मुख्य उपाध्याय. त्यांच्याकडे आमच्या घराण्याची वंशावलि आहे. मध्यंतरी एकदोनदा पैसे पाठवून आमच्या तर्फे अभिषेक करून नैवेद्य पाठवावा असे लिहीले होते. उत्तर नाही. पैसे महत्वाचे नाहीत. संपर्क साधता आला तर बरे.

वरची सुन्याची पोस्ट कदाचीत वाहून जाईल म्हणून परत चिटकवतेय.

"आज आमचा स्वातंत्र्यदिन !!!

आम्ही गोदाकाठची माणसे ...कणभर घेऊन मणभर देणारी ...आईची आभाळमाया जपणारी आणि मातीचे पांग न विसरणारी ...आम्ही मराठवाड्याच्या रांगड्या मातीतली रांगडी माणसे ...आम्ही दोनदा स्वातंत्र्यलढा दिला ...एकदा इंग्रजाविरुद्ध आणि एकदा पाशवी निजामाविरोधात ... मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता.... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला....आम्ही इंग्रजांना आणि निजामालाही लोळविले ....मराठवाडा 17 सष्टेंबर रोजी सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात निजामाच्या तावडीतून निसटला ...पूढे विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला ...आम्ही कधीच महाराष्ट्रातून वेगळे होण्याची भाषा केली नाही ....मराठवाड्याच्या मातीने देशाला हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी माणसे दिली... एवढेच नव्हे, तर मराठवाड्याच्या या कसदार भूमीने या राज्याचे, देशाचे वैचारिक नेतृत्वही केले....ज्यांनीरझाकारांचा बेछूट गोळीबार अनुभवला, अनन्वित छळ सोसला, निझाम नामक कसायाने सर्व तऱ्हेची दडपशाही केली होती ... मराठवाड्यातील आबालवृद्ध निर्भयपणे निजामविरोधी लढ्यात सामील झाले होते.... रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या; पण हुतात्म्यांची वाण पडली नाही. पोलिसांच्या लाठ्या मोडल्या; पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत. असा हा दिव्य लढा होता....हा माणसांचा देश आज दुष्काळाच्या छायेत आहे ...चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वयाच्या नव्हेत, तर सोसलेल्या उन्हाळ्यांच्या आहेत इथल्या माणसांच्या .... रंगणारे गावरान संवाद, त्यातले रांगडे विनोद आणि हास्याचा खळाळ अनुभवायचा असेल तर या मराठवाड्यात ...आज हाच कणखर, राकट मराठवाडा दुष्काळाचे दशावतार अनुभवतो आहे.....गावातलीसारीच माणसंकाणसं आपल्याच प्रांतात देशोधडीला लागली आहेत....देशाने,महाराष्ट्राने आता आमचा अंत पाहू नये ...कानाखाली वाजवायलाही मराठवाडा मागेपुढे पाहत नाही ....आज आमचा मुक्तीसंग्राम दिन आहे...मराठवाड्याच्या मातीने अंगाखांद्यावर खेळवून जगायला ..लढायला शिकविले ....या काळ्या मातीला कोटी कोटी प्रणाम ...
निधडी छाती नि:स्पृह बाणा
लववी ना मान
अशा आमच्या मराठवाड्याचा
आम्हास अभिमान’’
जयहिंद ...जय महाराष्ट्र ...जय मराठवाडा !!!"

"शिरीन, झालीस का तयार?"

"आलेच मी प्रीतम, जस्ट वन मिनीट"

"चला आटपा लवकर. सगळे जमले असतील"
.
.
.

आठवतोय का दुनियादारी? आठवतच असेल म्हणा. मैत्रीचा उत्सव म्हणजे दुनियादारी.

आणि उत्सव साजरा करण्याचं ठिकाण म्हणजे एसपीचा कट्टा

ह्यावर्षी आपल्या मायबोलीकरांच्या मैत्रीच्या उत्सवालाही लाभलाय असाच एक एसपीचा कट्टा

मग येताय ना आपल्या मैत्रीचा उत्सव साजरा करायला? आम्ही वाट बघतोय.

कसं यायचं म्हणताय?

मग वाचा की इथे पूर्ण आणि आत्तापासूनच लागा यायच्या तयारीला.

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg