मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - "सफर-रिंग" - तिखट - भरत मयेकर

Submitted by भरत. on 29 September, 2012 - 01:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य जिन्नस : मध्यम आकाराचे ३ बटाटे उकडून, ३/४ (पाऊण) वाटी तांदळाचे पीठ, २ सफरचंदे
पूरक पदार्थ : कोथिंबीर मूठभर, प्रोसेस्ड चीज २-३, कॉर्नफ्लोर १ टेस्पून,
मसाल्याचे पदार्थ : हिरव्या मिरच्या ३, जिरे १ चमचा, मिरी १ चमचा

तेल, मीठ

क्रमवार पाककृती: 

१) कोथिंबीर, मिरच्या, जिरे, मिरी एकत्र वाटावे.
२) बटाटे सोलून कुस्करावेत. त्यात कोथिंबीर इ.चे वाटण, तांदळाचे पीठ घालावे, चीज किसून घालावे. मीठ , दोन चमचे तेल घालून सगळे नीट एकत्र करावे.
३) सफरचंदांच्या १ सेमी उंचीच्या आडव्या चकत्या कापाव्यात. त्यांची साले तासून घ्यावीत. मधला देठा/बियांचा भाग कोरून काढून रिंगचा आकार द्यावा.
४) या रिंगला तयार मिश्रण नीट लावावे.
५) थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोर मिसळावे.
६) तयार रिंग्ज कॉर्नफ्लोरच्या द्रावात बुडवून काढून, कढईत मध्यम आचेवर (वरचे आवरण शिजेल पण सफरचंदाच्या रिंग्ज फार शिजणार नाहीत अशा बेताने) तळाव्यात.
Picture 58.jpg

वाढणी/प्रमाण: 
८ सफर-रिंग्ज
अधिक टिपा: 

सफरचंदाच्या साली काढल्या नाहीत तर मिश्रण नीट चिकटत नाही.

माहितीचा स्रोत: 
मिपागग + पाइनॅपल जिलबी यांचा अस्मादिकांच्या डोक्यात झालेला संकर
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, तुमच्या प्रतिसाद संपादित करून लिंक कट करा, पाककृती संपादित करा, आणि हवी तिथे ती लिंक पेस्ट करा.
पाककृती लिहिताना insert image हा पर्याय उपलब्ध नाही. Sad

फोटो एकदम मस्त दिसतोय. हा तिखट गोड 'भोकाचा वडा' चविष्ट असेल असं वाटतंय. मी प्रयोग करून बघणार नक्की.

ही सफर रींग बघताना खुपच सफरींग झाले... खायला फक्त बघायलाच का मिळते, खायला का नाही मिळत इथे??? Happy

एकदम चविष्ठ. सुंदर.

सफरचंदाच्या बिया काढण्याचे एक साधे उपकरण मिळते. त्याने मधला दंडगोलाकार निघून येतो.

प्रोसेस्ड चीज २-३ >> क्यूब, चमचे की आवडीनुसार कुठलेही प्रमाण.

चीज बनविताना गाईच्या आतड्याचे तुकडे वापरले जातात. त्यामुळे बरेच शाकाहारी लोक ते वर्ज्य करतात. काही पर्याय सुचवा. पनीर?

साधी सफरचंदाची जिलेबी (ह्याचा गोड भाऊबंद) केला जातो. सविस्तर कृती मंजुळा'ज किचन मध्ये आहे.

कृती द्यायच्या चौकटीखाली "मजकुरात image किंवा link द्या" हा मजकूरच मजलाच का बरे दिसेना? >> मला पण हाच प्रश्न काल पडला होता.

बाकी पाककृती मस्तच.

साक्षी.

<<<<चीज बनविताना गाईच्या आतड्याचे तुकडे वापरले जातात. त्यामुळे बरेच शाकाहारी लोक ते वर्ज्य करतात

सिमन्तिनी, ह्याचा काही रेफरन्स देऊ शकाल का? हे मी कधीच ऐकले नाहीये, म्हणून कुतूहलापोटी विचारतेय.

भरत, नाविन्यपूर्ण रेसिपी . करून बघितली जाईल Happy

http://en.wikipedia.org/wiki/Rennet. संपदा, चीज रेनेट हा विषय उगाळावा तेव्हढा थोडा. सामान्यपणे जर पाक वर स्पष्ट लिहिले नसेल की 'मिक्रोबिअल रेनेट' किंवा व्हेजीटेरीयन किंवा कोशर तर ते चीज गायीच्या रेनेट चे आहे हे गृहीत धरावे.

सॉफ्ट चीजस् अ‍ॅसीड वापरून बनवतात, उदा: मोत्झरेला ... आणि हार्ड चीजस् रेनेट वापरून, उदा: पार्मेजान ई. ..
पण आज काल मास प्रॉडक्शन साठी लॅबमध्ये तयार केलेले वापरतात (मिक्रोबिअल रेनेट), कारण ते स्वस्त पडतं.
तेंव्हा फार काळाजी नसावी.

वडे खूप मस्त झाले आहेत Happy

http://economictimes.indiatimes.com/features/et-sunday-magazine/the-upco... >>> बरोबर, काळजी नसावी; पण शाकाहारी असाल तर काळजी घ्यावी Happy काळजी हा असण्या-नसण्या चा विषय नसून घेण्याचा विषय आहे.

http://www.artisanalcheese.com/Vegetarian-Organic-Cheese/products/1046/2/0 >>> मय्क्रोबिअल असले तरी ते शाकाहारी असेल असे नाही . थोडक्यात जसे जिलेटीन बद्दल मत प्रवाह आहेत तसेच चीज बद्दल ही आहेत. आपली शाकाहाराची व्याप्ती ज्याने त्याने ठरवावी.