तों.पा.सु. - खमण ढोकळा - चहाबाज

Submitted by चहाबाज on 28 September, 2012 - 11:28

खमण ढोकळा

साहित्यः पिवळा बाथ स्पंज, पांढरा दोरा, हिरवा क्रेप कागद, काळे मणी
sahitya.jpgdhokala.jpg

कृती: पिवळ्या रंगाचा जाळीदार बाथ स्पंज घ्यावा. (आंघोळीसाठी न वापरलेला!!). एका धारदार सुरीने त्याचे चौकोनी तुकडे करावे. त्यावर काळे मणी, कातरलेला पांढरा दोरा (ओले खोबरे) आणि क्रेप कागदाचे तुकडे (कोथिंबीर) पसरावे. झाला ढोकळा तयार!

वि.सू.: पटकन एक तुकडा तोंडात टाकण्याचा मोह मात्र आवरावा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईगं देवा!!! खरंच खरा नाही हा ढोकळा???????????\अनबिलिवेबल!!!
माबो संयोजक.. खूप धन्स!! या स्पर्धेमुळे कित्ती छुप्पे कलाकार समोर येतायेत..

या स्पर्धेतल्या प्रवेशिका बघून एक वाईट गोष्ट मात्र घडणार आहे... खरेखुरे हे पदार्थ समोर आले, तर ते खरेच आहेत का, अशी शंका येत राहणार !
>> +१

जबरदस्त Happy

Pages