१/२ कि. चिकन, १/२ कि. कांदा, मोहरीचे तेल, ५-६लसणाच्या कुड्या, १ इंच आले, हळद, मीठ,
हिरव्या मिर्च्या २-३, चिकन मसाला, गरम मसाला, २ लसूण सोलून
प्रथन चिकन स्वच्छ धुवून घ्या व त्याला १ चमचा हळद आणि थोडे मोहरीचे तेल चोळून घ्या. सर्व कांदा उभा चिरून घ्या. मिरचीचे लहान-लहान तुकडे करून घ्या आणि आले-लसूणाची पेस्ट करून घ्या.
आता कढईत तेल गरम करून घ्या व त्या तेलात आख्खे लसूण तळून घ्या. (हे काम फार काळजीने करावे. लसूण टाकल्यानंतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. अस्मादिकांचा एकदा हात भाजल्यापासून मोठया ताटाचा उपयोग ढालीसारखा करतो. )
लसूण काढल्यानंतर तेलात मिरचीचे तुकडे आणि कांदा टाका. ८-१० मिनिटे कांदा परता व त्यातच
चिकन व तळलेले आख्खे लसूण टाका. कढईला खाली न लागेल अशा बेताने हे मिश्रण परतत राहा.
१० मिनिटांनंतर चवीनुसार मीठ घाला. त्यामध्ये आता आले-लसुणाची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला व अर्धा ग्लास पाणी टाका.
नंतर जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणात पाणी टाकून १५-२० मिनिटांपर्यंत शिजवत राहा.
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते. हा आख्खा लसूण चोखून खायचा.
१.चिकनचे पीस मध्यम आकाराचेच घ्यावेत अगदी लहान असू नयेत.
२. फार ग्रेव्ही ठेऊ नये. (अंगापुरता रस्सा ठेवा. )
धन्यवाद आबासाहेब - करून
धन्यवाद आबासाहेब - करून बघीतली - फार-फार आवडली पाकक्रुती
करून बघीतली - फार-फार आवडली
करून बघीतली - फार-फार आवडली पाकक्रुती
>>>> पिन्टु
एकदम फक्कड बेत जमला
एकदम फक्कड बेत जमला आबासाहेब!!
हे तरी खरे आहे का? नाहीतर ते
हे तरी खरे आहे का? नाहीतर ते चिखल, मेण, थर्मोकोलचे असायचे. आजकाल असलेच खाद्यपदार्थ बोकाळलेत.
मस्त रेसिपि दिसत आहे ...खायला
मस्त रेसिपि दिसत आहे ...खायला भेटले कि आनखी मजा येइल..
चिकन सोबत लसणाच्या पाकळ्या
चिकन सोबत लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या? की, साली काढुन?>>>>>>>>>>>>> हो अक्खेच खायचे लसुण...शिजल्यनन्तर त्याचा गर अगदी नरम होतो....मी ग्रेव्ही मधे असाच कच्चाच टाकुन देते लसुण....तळल्यावर कसा लागतो ते माहित नाही....हे माझासाठी नवीन आहे....:)
मि खुपदा ही रेसीपी केलेली
मि खुपदा ही रेसीपी केलेली आहे. मस्त लागते आबासाहेब अजुन येऊद्यात
ह्या रेसिपीच्या शेफने
ह्या रेसिपीच्या शेफने नॉनव्हेज खायचे सोडलय.
शनिवारी या रेसिपीने केलं
शनिवारी या रेसिपीने केलं चिकन. इथल्या लसूण पाकळ्या एकदमच जाडजूड असतात म्हणून मी त्या जराशा ठेचून घेतल्या. लसूण तळायला घेतल्यापासून मुलगी सारखी स्वैपाक घरात घोटाळत होती
जेवताना पण माझ्या अन नवर्याच्या पानातून लसूण कुड्या वेचून खाल्ल्या तिने.
सुटसुटीत रेसिपी पण तरिहि चवीला एकदम मस्त . फोटो काढायच्या आधीच फस्त झालं ना राव !
एक नंबर अन ऑथेंटिक!! आम्ही
एक नंबर अन ऑथेंटिक!! आम्ही बिहारात असताना सरासरी दर 2 दिवसाआड एकदा हे फससक्लास प्रकरण एकदा होतच असे, असेच मटण सुद्धा उत्तम होते त्यात खास मजा वेगळी अजून पहिले तेल गरम करून कांदे अन खडे मसाले घालून परतायचे मग त्यात मटण घालून परतायचे वरतून पूड मसाले अन मीठ पसरायचे म्हणजे निव्वळ पसरायचे त्याच्या मधोमध एक लसणीचा कांदा ठेवायचा अन थोडे पाणी घालून बेलाशक झाकून सोडून द्यायचे 40 मिनिटे ते 50 मिनिटे जबऱ्या प्रकार होतो अन हा प्रकार मोकळ्या फडफडीत भाताबरोबरच उत्तम लागतो (बिहारी आरवा तांदूळ असला तर आनंदच आनंद)
आमचा एक हवालदार त्यात सगळे झाले की 'मांस शुद्ध करायला' म्हणून त्यात पावशेर साजूक तूप सोडी वरतून आधी मला कसेसेच होत असे ते पाहून पण चव खरंच अप्रतिम येते
मस्तच आहे रेसिपी. करुन बघेन
मस्तच आहे रेसिपी. करुन बघेन नक्की.
लसणाची सालं तोंडात येत नाहीत का पण खाताना ? किंवा ग्रेव्हीत सुटी होत नाहीत का परतताना ?
लसणाची सालं तोंडात येत नाहीत
लसणाची सालं तोंडात येत नाहीत का पण खाताना ? किंवा ग्रेव्हीत सुटी होत नाहीत का परतताना ? >> ग्रेव्हीत सुटून आली नाहीत, एकेक पाकळी सुटी करुन ठेचून घातली होती मी. मस्त मउ शिजल्या होत्या ग्रेव्हीमधे. जरासं बोटाने स्क्वीझ करुन सालं सुटून येत होती पानात घेतल्यावर.
सोन्याबापू, आता एकदा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मटण करुन पहाणार. वाटण - घाटण, धीमी आंच पे भुनो , तेल सुटे पर्यंत परता वगैरे भानगडी नसलेल्या रेस्प्या एकदम आवडत्या
मेधा, ओके
मेधा, ओके
Pages