चिकन लहसूण (बिहारी पद्धतीने)

Submitted by आबा. on 25 December, 2011 - 04:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ कि. चिकन, १/२ कि. कांदा, मोहरीचे तेल, ५-६लसणाच्या कुड्या, १ इंच आले, हळद, मीठ,

हिरव्या मिर्च्या २-३, चिकन मसाला, गरम मसाला, २ लसूण सोलून

क्रमवार पाककृती: 

प्रथन चिकन स्वच्छ धुवून घ्या व त्याला १ चमचा हळद आणि थोडे मोहरीचे तेल चोळून घ्या. सर्व कांदा उभा चिरून घ्या. मिरचीचे लहान-लहान तुकडे करून घ्या आणि आले-लसूणाची पेस्ट करून घ्या.

DSCN6274.JPG

आता कढईत तेल गरम करून घ्या व त्या तेलात आख्खे लसूण तळून घ्या. (हे काम फार काळजीने करावे. लसूण टाकल्यानंतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. अस्मादिकांचा एकदा हात भाजल्यापासून मोठया ताटाचा उपयोग ढालीसारखा करतो. Happy )

DSCN6280.JPG

लसूण काढल्यानंतर तेलात मिरचीचे तुकडे आणि कांदा टाका. ८-१० मिनिटे कांदा परता व त्यातच
चिकन व तळलेले आख्खे लसूण टाका. कढईला खाली न लागेल अशा बेताने हे मिश्रण परतत राहा.

DSCN6282.JPG

१० मिनिटांनंतर चवीनुसार मीठ घाला. त्यामध्ये आता आले-लसुणाची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला व अर्धा ग्लास पाणी टाका.
नंतर जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्याप्रमाणात पाणी टाकून १५-२० मिनिटांपर्यंत शिजवत राहा.

DSCN6292.JPGDSCN6293.JPG

ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते. हा आख्खा लसूण चोखून खायचा.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१.चिकनचे पीस मध्यम आकाराचेच घ्यावेत अगदी लहान असू नयेत.
२. फार ग्रेव्ही ठेऊ नये. (अंगापुरता रस्सा ठेवा. Proud )

माहितीचा स्रोत: 
कंपनीमधील बिहारी मित्र
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी इन्टरेस्टिंग वाटतीय. पण काही गोष्टी समजल्या नाहीत. लसूण आख्खा तळायचा का? तळलेल्या लसणाचे पुढे काय करायचेय ? की त्याचीच पेस्ट करायचीय ? तसेच चिकन मसाला म्हणजे नक्की कोणता मसाला ते पण सांगू शकलात तर नीट समजेल Happy

लसुण अख्खेच टाकले आहे.....तेही साली सकट्......

चिकन सोबत लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या? की, साली काढुन? ते खाण्यार्‍यावर अवलंबुन असेल बहुदा...

कोलेस्ट्रॉल कमी करणार्‍यांसाठी छान आहे हे. पण, चिकन बाजुला करुन फक्त लसुण खात रहावी लागेल.

लसूण आख्खा तळायचा का? लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या का? तळलेल्या लसणाचे काय करायचे?
ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते - अरे पण लसुण तर बाहेर ठेवले आहेत ना? Happy

ह्याच्यात न कळण्यासारखे काय आहे? Wink

तेलाला लसणाचा भरपूर वास येतो लसूण काढली तरी. आणि कोंबडीला पुन्हा आले लसूणाची पेस्ट लावलीच आहे ना... छान लागत असेल.

चिकन मसाला >>>>>>>> एव्हरेस्ट चा चिकन मसाला वापरला तरी चालेल.

लसूण आख्खा तळायचा का? तळलेल्या लसणाचे पुढे काय करायचेय ? की त्याचीच पेस्ट करायचीय ?
>>>>>>>>>>>>> हो लसूण आख्खा तळायचा.

तळलेल्या लसणाचे पुढे काय करायचेय ? >>>>>>> कांदा व चिकन बरोबर परतत राहायचे.

की त्याचीच पेस्ट करायचीय >>>> नाही. त्यासाठी वर २ लसूण सोलून सांगितले आहेत.

चिकन सोबत लसणाच्या पाकळ्या अख्ख्याच खायच्या? की, साली काढुन? >>>>>>>>
ह्या रेसीपीमधील हाच सर्वात टेस्टी घटक आहे. तो आख्खा लसूण चोखून खायचा.

फोटूत दिसतेय कि...>>>>> दिसली हो, पर ये दिल है की मानता नही Happy घरी जर मी कढईत अख्खी कुडी तळायला घातली तर आईची रिअ‍ॅक्शन काय असेल याचा विचारच करवत नाहिये Happy कदाचीत तिला तो माझाच आळशीपणा वाटेल

कदाचीत तिला तो माझाच आळशीपणा वाटेल >>>>>>> Lol

माझ्या भाऊजींची सुद्धा अशीच प्रतिक्रिया होती. ते म्हणाले लसूण सोलायला वेळ नव्हता काय?

फोटो??

ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते>>> आणि चिकनला??
<<<<<<< अर्थात चिकनलासुद्धा Happy

बेफ़िकीर | 27 February, 2012 - 10:28 नवीन
लय भारी

जेवायला बोलवाच आता <<<<<< बेफीजी, नेकी और पुछ-पुछ.
कधीही-कधीही या आणि याच Happy

ह्या रेसीपीमधील हाच सर्वात टेस्टी घटक आहे>>>
छ्ये, मग ते चिकन कशाला घातलय आबासाहेब??? Proud
उगी एका कोम्बडीचा जीव वाचेल की.
रेसिपी भारी आहे. शाकाहारी असल्याने खाणार नाही.

छ्ये, मग ते चिकन कशाला घातलय आबासाहेब???
उगी एका कोम्बडीचा जीव वाचेल की.
रेसिपी भारी आहे. शाकाहारी असल्याने खाणार नाही.
<<<<<<<< झकास मग ती रेसीपी कोम्बडीशिवाय कर आणि खा. हाकानाका Proud

वॉव्..फारच वेगळी आणी टेस्टी रेसिपी...
वाचताना काही शंका होत्या त्या सर्व प्रतिसाद वाचल्यावर दूर झाल्यात तेंव्हा काही शंकाकुशंका मनात न आणता लौकरात लौकर करण्यात येईल..
Happy

Pages