माहिती हवि (बायपास सर्जरी)

Submitted by सीमि on 25 September, 2012 - 01:50

माझ्या सासर्यान्चि बायपास सर्जरि करायचि आहे त्याना शुगर आणि बीपी आहे मुम्बई किवा बान्गलोर मध्ये. कुनाला चान्गले होस्पिटल , ऑपरेशनमधली रिस्क, गरज अनि येनर्या खर्चाचि माहिति असल्यस शेअर करा. त्यान्ला ७०% ब्लॉक ३ वेइन्स मध्ये अहे. अनि वय ६८ आहे. मुम्बैतिल के ई म , जे जे, फोर्टीस, कुपर, बेन्गलोर मधिल नारयनि (देवि शेट्टी) हॉस्पिटल कसे आहे. आजुन दुसरे होस्पिटल माहित असल्यास प्लीज हेल्प करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो हि ऑप्शन आहे पण ३ वेळा अँजिओप्लास्टी करावि लागेल. आत्तच डॉक्तरानि कीमान १ तरि ब्लॉक काढायला सान्गितला आहे, तरी प्रश्न तेच आहेत (चान्गले होस्पिटल , ऑपरेशनमधली रिस्क, गरज अनि येनर्या खर्च). बायपास आनि अँजिओप्लास्टी मध्ये फरक आनि विश्वासआर्हता काय आहे? बादवे विपु कसा चेक करतात?

़केईम +१. खर्चपण जास्त नाहि.पण सरकारी अस्ल्याने स्वच्छतेची अपेक्षा नको. तिथले डॉक्टर मात्र डोळे बंद करून विश्वास ठेवावे असे आहेत.

कमी इन्व्हेजिव म्हणून अँजिओप्लास्टी चांगली वाटत असली तरी करोनरी आर्टरीमध्ये (हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहीनी) आयुष्यभर एक धातूची वस्तू (स्टेंट) रहाणार आहे, सबब नंतर गोळ्या लाईफ लाँग. बायपासनंतर गोळ्या बंद होऊ शकतात. (बायपासमधे तुमच्याच शरीरातील रक्तवाहीनी उदा. पायातील, काढून हृदयाच्या रक्तवाहीनीला पर्याय म्हणून जोडली जाते.) पण या वैद्यकीय बाबी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा केल्यास उत्तम. पेशंट न पहाता, सगळे रिपोर्ट्स समोर नसताना याबद्दल सांगणे कठीण व चुकीचेही आहे.

सो ऑपरेशन सोडून इतर सेमी-मेडीकल बाबी सांगतो :
१. ज्या हॉस्पिटलचे सी.सी.यू. (करोनरी केअर युनिट) चांगले आहे, नर्सिंग केअरचा दर्जा उत्तम आहे असेच हॉस्पिटल निवडावे.
२. आपल्या इन्शुरन्स पॅकेजनुसारच बेड घ्यावा. जनरल कॅटेगरीला लाजू नका. त्याने सगळाच खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. ऑपरेशन नंतर आपल्याला सीसीयू मधेच रहायचे आहे. तिथे ५ स्टार सर्व्हिस आहे. आदल्या दिवशीच्या अ‍ॅडमिशन साठी फक्त जनरल वॉर्डात झोपल्याने काहीही होत नाही.
३. इन्शुरन्स असल्यास त्याअनुषंगाने लागणारे सगळे कागद आधीच मिळण्याची व्यवस्था करा. कॅशलेस असेल तर ते नीट पाहून घ्या.
४. २-३ सेकंड ओपिनियन्स घ्या. नक्की ब्लॉक किती? काय व किती ऑपरेशन करावे लागेल याची नीट चर्चा करा.
५. प्लास्टी करणार असलात तर स्टेंट कोणता? किती किंमत? त्यात घासाघीस करा. परत इन्शुरन्स प्याकेजचे बघा.

तुमचा विपु .. http://www.maayboli.com/user/28843/guestbook

एशियन हार्ट चांगले आहे.

पेशंटचा इन्शुरन्स ( हेल्थ पॉलिसी) आहे का? असल्यास टी पी ए कोण आहे? तुमच्या कंपनीच्या इन्शुरन्सात कवर होत असतील तर टी पी ए कोणता आहे?

अरे हो! सांगायचे राहिलेच.
सेकंड ओपिनियन घेताना कंपनीचा इन्शुरन्स नाही असे सांगून एक तरी मत घ्या. पुण्या/मुंबईत तरी बर्‍याच ठिकाणी डायरेक्ट ट्रीटमेंट बदल होइल.. नाही केली बायपास तरी चालेल असाही सल्ला येऊ शकतो Wink

सेकंड ओपिनियन घेताना कंपनीचा इन्शुरन्स नाही असे सांगून एक तरी मत घ्या. पुण्या/मुंबईत तरी बर्‍याच ठिकाणी डायरेक्ट ट्रीटमेंट बदल होइल.. नाही केली बायपास तरी चालेल असाही सल्ला येऊ शकतो >>>>

+१......

इब्लिसनी बरेचसे सांगितलेच आहे. इथं विचारण्यापेक्षा योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बेळगावचे KLE हॉस्पिटलपण चांगले आहे. शिवाय पुण्यात इनलॅक्स पण चांगलंय असं ऐकलंय.