मिसळम पाकम गट्टम गट्टम्!-किरमीजी गुलाबजाम -गोड प्रसाद-मायबोली आय डी-सुलेखा..

Submitted by सुलेखा on 24 September, 2012 - 07:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कलकत्ता [बंगाल]व गोहाती [आसाम] च्या सुदूर भागात मावा/खवा ताजा ,विश्वसनीय तसेच नेहमी किंवा आपल्याला हवा तेव्हा मिळणे अशक्यप्राय पण छेना व त्यापासुन केलेले रसगुल्ले-संदेश-राजभोग -छेना परवल अशा असंख्य मिठाया मिळ्तील ..आपणही बाजारातुन तयार खवा आणण्याआधी शुद्धतेचा,ताजेपणाचा विचार करतोच्.अशा वेळी "किरमीजी गुलाबजाम" चा प्रसाद मनाला सुखावुन जातो.
त्यासाठी लागणारे प्रमाण साहित्य असे आहे.
goad apup-1.JPG
आतील सारण तयार करण्यासाठी--
१ लहान आकाराचे सफरचंद,
१ टेबल्स्पून साखर,
१ टीस्पुन दालचिनी पुड,

बाह्य-आवरण तयार करण्यासाठी-२ टेबल्स्पून तांदुळाचे पिठ ,
१ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा,
१ टेबल्स्पुन डेसिकेटेड कोकोनट,
२ टेबलस्पून मिल्क पावडर,
१ टेबलस्पून पिठीसाखर,
१ टीस्पुन वेलची-जायफळ पुड,
१ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर,
२ टेबल्स्पून काजुचे लहान-लहान तुकडे,
चिमुटभर बेकिंग पावडर,
तळण्यासाठी पाउण वाटी साजुक तूप,
सारण व मिश्रण तयार आहे ..
god apup-2.JPG

क्रमवार पाककृती: 

१]सफरचंद सालासकट किसणीवर किसुन घ्या.
२]एका लहान पॅन /कढईत १ टेबलस्पून साखरेचे कॅरेमल करा.
त्यासाठी कढई गॅसवर ठेवुन त्यात साखर घालुन पाणी न घालता मंद गॅसवर सतत चमच्याने ढवळत पाक करायचा आहे.साखर पूर्ण विरघळली कि किरमीजी रंग येईल.
३]या कॅरेमल मधे सफरचंदाचा किस घालुन परता.दालचिनी पूड व अर्धा टेबलस्पून काजु तुकडे घालुन त्यातील पाण्याचा अंश जाईपर्यंत परता.मिश्रण घट्ट्सर झाले कि सारण तयार झाले. आता हे सारण एका वाटीत काढुन ठेवा..
४]बटाट्याचे साल काढुन , बटाटा किसा.
५]त्यात तांदुळाची पिठी,डेसिकेटेड कोकोनट,मिल्क पावडर ,पिठीसाखर ,वेलची-जायफळ पुड व चिमुटभर बेकिंग पावडर घालुन एकत्र मळुन घ्या.
६]या मिश्र गोळ्याचे लहान लहान समान गोळे करा.
तितकेच गोळे वर केलेल्या सारणाचे ही करा् हे गोळे करताना तळ हाताला थोडेसे तूप /मिश्रण सैलसर वाटत असेल तर कॉर्न फ्लोर लावुन घ्या. म्हणजे हाताला चिकटणार नाही.
७] कढईत मंद आचेवर तूप तापायला ठेवा.
८] मिश्र गोळ्याला वाटीचा आकार देवुन त्यात काजु तुकडे पसरवुन नंतर त्यात सफरचंदाच्या सारणाचा लहान गोळा ठेवुन पुन्हा गोलाकार करा.वरुन ४-५ काजुतुकडे लावा आणि हा गोळा बाहेरुन कॉर्न फ्लोर मधे घोळवुन पुन्हा छान गोलाकार आकार द्या .असे सर्व गोळे करुन घ्या.
९] कढईतील तूपात मंद आचेवर किरमीजी रंगावर तळा.झार्‍याने सतत बाजु पलटवत रहावे.अगदी मंद आचेवरच तळायचे आहेत..तरच ते आतपर्यंत तळले जातील..तसेच वरील पारी जास्त जाड करु नये.
१०]"किरमीजी गुलाबजाम" बाप्पाच्या प्रसादासाठी तयार आहेंत.
god apup -3.JPG
.............................................." गणपती बाप्पा मोरया" "मंगलमुर्ती मोरया"..............................................

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात ७ ते ८ गुलाबजाम तयार होतात.
अधिक टिपा: 

पिठीसाखरेचे प्रमाण जास्त गोड हवे असल्यास वाढवता येईल..वरील प्रमाणात पुरेसा गोडवा जाणवतो.
सफरचंदाची दालचिनीयुक्त कॅर्रेमलाइज चव तसेच वरच्या आवरणातील वेलची-जायफळ चव खुपच छान लागते.त्यातील खोबरे व मिल्कपावडरची ही चव जाणवते.
कढईत घातल्यावर फुटत नाहीत त्यामुळे बिघडण्याचे चान्सेस अजिबात नाहीत.
तळताना तूप फार लागत नाही .त्यामुळे तूपकट लागत नाही.

माहितीचा स्रोत: 
स्व-प्रयोग..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसताहेत गुलाबजाम Happy
भोवतालची सजावटही मस्त दिसतेय.

शीर्षकात ३०३२० ऐवजी 'सुलेखा'च लिहा Happy

भरत्, सावली -
साखरेचे कॅरेमल करुन त्यात सफरचंदाक्चा किस घातला आहे.
पाकृ.संपादित केल्यावर ,फोटो अपलोड करायला मला थोडा अवधी लागतो ..

ओक्के............शेवटी सुलेखाची "पाकृ"च आली का पैल्यांदा! गुड!
मस्त आहे......करून बघीन.

मंजुडी,महिरपीसाठी "गुंजा"वापरल्या आहेंत. हल्ली गुंज पहायला मिळत नाही .

४]बटाट्याचे साल काढुन किसा. >> की साल काढलेला बटाटा किसा. (मी उगीच कीस पाडतीये... Happy असो.)

- एक टेबलस्पून डेसिकेट कोकोनट ऐकायला छान शब्द आहे पण त्याचे करायचे काय? कृतीत त्याचा काही उल्लेख नाही आणि साहित्य आणि टीपा मध्ये आहे. वाचकाला गृहीत धरले जाते आहे की त्यांना समजेलच काय करायचे. पाककृती कल्पक आहे, सजावट फोटोही छान पण लेखन छान नाही.

गुलाबजाम इतके भारी झालेत तर गणपतीपुढे शंख कशाला ठेवलाय? घंटा ठेवा फूबाईफू सारखी.
>>> Lol

सोबत पाक नसला तरी चालतो का?