गणराजा साठी सजावट - वर्षु + शोभा १२३ श्टाईल....

Submitted by मोहन की मीरा on 17 September, 2012 - 00:40

गणपती आले... हो......

या वेळेला काहीतरी वेगळं पण एकदम सोबर करायचं ठरवलं होत. मुलीला खुप हौस होती. म्हणुन मग माय्बोली धुंडाळली... आणि मग आयडिया गवसल्या. मुलगी एकटी करु शकेल असे हवे होते . तशी लहान आहे (वय ११) मग लागलो दोघी कामाला. आणि वर्षु ताई च्या रांगोळी आयडिया, शोभा१२३ च्या लोकरीच्या फुलांची आयडिया वापरुन खालील सजावट तयार झाली.
deco1.jpgdeco2.jpgdeco3.jpgdeco4.jpg

सगळे फोटो मोबाईल वर काढले आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोकिमी............. सुंदर दिसतायेत सगळ्या रांगोळ्या..
अश्याच पद्धतीने पातळ कार्डबोर्ड वापरून पण करता येतील..
पातळ कार्डबोर्ड (जो कापताना बोटं दुखणार नाहीत) पेजली,गोल अश्या कुठले ही शेप करून घे. .. त्यावर कोणताही गुळगुळीत टेक्श्चर चा चार्ट पेपर चिकटवून घे.
या रांगोळीत मधोमध मी गणपती ची मूर्ती ठेवली होती. तुझ्याजवळच्या मूर्ती च्या बेस नीट मावेल इतका गोल , मधोमध कापून घे. कटर ने मधला गोल छान कापला जातो. कार्डबोर्ड वर मोठी थाळी ठेऊन पेन्सिलीने गोल आखून घे. मग त्या गोलाच्या मध्यावर त्यापेक्षा लहान वाटी, बाऊल उपडे ठेवून पुन्हा एक सर्कल आखून घे. हे इनर सर्कल कटर ने कापून टाक.

या रांगोळीत वापरलेल्या टी लाईट्स ना डबल टेप लावून पील ऑफ कर. मग हलकेच रंगीत चकमक पावडरीत, चारीबाजूंनी घोळून घे . म्हंजे टी लाईट्स च्या अ‍ॅल्युमिनियम बेसला ,रांगोळीचा मॅचिंग कलर मिळेल.

धन्स वर्षु ताई...

ह्यांचीच लिंक मी त्या दिवशी विपु मध्ये मागितली होती. आता आजच्या संध्याकाळी अजुन अ‍ॅडिशन बघते....

होय गा.. स्वारी उशीर झाला .. प्लॅस्टिक वाल्या रांगोळीचे फोटू शोध शोध शोधले.. सर्व फाईल्स गायबल्यात काँम्प वरून.. Uhoh
कशाबशा एव्हढे दोन सापडले फोटो..

मोकिमी.. तूच आता डीटेल मधे लिहून टाक ,वापरलेल्या साहित्यासकट..
कोणत्या प्रकारचा ग्लू आणी प्लास्टिक वापरलायेस??

मोकीमी,

एक बदल सुचवू का?

तो मागचा पडदा काळा न घेता नारंगी, गडस गुलाबी अथवा नीळा आणखी रांगोळी उठवून दिसेल असे वाटते.

बाकी आयडिया छान आहेत.

ग्लु = फेविकॉल

प्लास्टिक मात्र जरा जाड शीट घेतली.

बाकी मटेरीयल म्हणजे चपटे मोती, मणी, कुंदन.... जे दिसलं ते.

हे सगळं शनिवार रात्र आणि रविवार सकाळ मिळुन तयार केले. ( शनिवारी लेकीची परिक्षा होती त्यामुळे जास्त वेळच मिळाला नाही.)

जिप्सी, मनिष, स्रुश्टी धन्स....

धन्स झंपी...

तो काळा पडदा नाहिये. आम्ही शोकेस मधेच गणपती ला जागा करुन घेतली आहे. त्या मुळे ते लाकुड आहे. तिकडे अजुन काही लावले तर ..... पहाते काय करता येइल ते.....

छान.

आपल्या मा बो वर एकसे बढकर एक कलाकार लोक आहेत अगदी......
कोण कोण काय काय कला पेश करतील कल्पनाही येत नाही....

सॉल्लिड मस्त सजावट.... अप्रतिम वगैरे सर्व.......

वर्षूतै कडे तर न संपणार्‍या (अक्षय्य भात्यासारख्या) आयडियाज दिस्ताहेत......

लोक्स... धन्स...

खरच मायबोली वर आल्या पासुन खुप सम्रुध्ध झाल्या सारखं वाटतं आहे.

वर्षूतै कडे तर न संपणार्‍या (अक्षय्य भात्यासारख्या) आयडियाज दिस्ताहेत......>>>>+१

मोकीमी
मस्त्च दिस्तेय सजावट! पेशन्सने काम केललं जाणवतंय! पण लेकरांना बरोबर घेऊन साजरे केलेले सण कायमचे मनात कोरले जातात.( एस्पेश्यली लेकरांच्या!)

धन्स लोक्स....

काल लेकीला ह्या प्रतिक्रिया दाखवल्या... एक दोन मुठ मास गालावर वाढलेलं वाटलं...

मोकिमी, खूप सुंदर झालेय सजावट. Happy
वर्षूतै कडे तर न संपणार्‍या (अक्षय्य भात्यासारख्या) आयडियाज दिस्ताहेत......>>>>+१००००००००००००००००१ मोदक. Lol

वर्षू, तुला _______________________/\_______________________. Happy

मोकिमी, मस्त झालं आहे डेकोरेशन. नेहमीच्या रंगीबेरंगी आणि चकचकीत डेकोरेशनपेक्षा छान वेगळंच.
( एक आगावुपणा - ते आर्टवर्क उठुन दिसण्यासाठी बॅकड्रॉप दुसर्‍या रंगाचा हवा होता. समथिंग ब्राइट. आताचं ही छान आहेच, पण ब्राइट कलरमुळे ते वर्क अजुन छान दिसलं असतं. )

( एक आगावुपणा - ते आर्टवर्क उठुन दिसण्यासाठी बॅकड्रॉप दुसर्‍या रंगाचा हवा होता. समथिंग ब्राइट. आताचं ही छान आहेच, पण ब्राइट कलरमुळे ते वर्क अजुन छान दिसलं असतं. )>>>>

हो ग !!! पण नवर्‍याने अजुन नाटकं करायला मना केलं... माझी शोकेस खराब कराल म्हणाला तो !!!! ( रडकी बाहुली)

आधीच आमच्या ( माझ्या आणि लेकीच्या) क्राफ्ट प्रकाराने कावलाय तो!!!! लेकीला तर त्याने किताबत दिली आहे 'क्राफ्ट महर्षी"

Pages