माकडा हाती कोलीत

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

असिम त्रिवेदीवर झालेला हल्ला आपल्या सर्वांवरच झाला आहे. त्याच्या व्यंग्यचित्रांच्या प्रती नेट वर आहेतच, पण त्याला समर्थन दर्शविण्याकरता इतरही अनेक व्यंग्यचित्रंकार पुढे येताहेत.

१९७६ मध्ये अशीच मुस्कटदाबी सुरु होती. सध्या India after Gandhi चा आणिबाणीचा भाग वाचतो आहे. कार्टुनिस्ट शंकर पिल्लईचं तेंव्हाचं वाक्य आहे: 'Dictatorships cannot afford laughter. In all the years of Hitler, there was never a good comedy, not a good cartoon, not a parody, or a spoof'.

अजुन बरंच लिहायला हवं, लिहायचं आहे, ... लवकरच.

प्रकार: 

@शेळीतै
>>पोटा रद्द झाला तरी त्यासाठी इतर कायदे आहेतच ना?<<

ते पुरेसे नाहीत म्हणून तर टीका केली ना इनामदारांनी?

<<<<<<<< कलाकाराचे नाव असिम त्रिवेदीऐवजी याकूब किंवा अफझल असते,तर इथे जमलेल्या मान्यवरानी आपली हीच मते मांडली असती का? >>>>>

का विसरलात ?

एम एफ हुसेन ने भारत माता विवस्त्र काढली होती.

त्या धाग्यावर मान्यवरांच्या प्रतीक्रिया अजुन बघता येतिल.

असिमची व्यंगचित्रे फार काही ग्रेट दर्जाची वाटत नाहीत..म्हणजे गाजलेल्या व्यंगचित्रकारांच्या तुलनेत ती फारच बालीश वाटतात...संसदेचे चित्र काढून त्यावर टॉयलेट लिहीणे हा हास्यास्पद प्रकार होता...
पण नेहमीप्रमाणे कॉँग्रेसने अतिशय चुकीच्या पद्धतीने हा प्रकार हाताळला...ज्याप्रकारे अण्णांना महत्व देऊन त्यांची प्रसिद्धी केली तोच प्रकार पुन्हा एकदा...जर या सगळ्याकडे दुर्लक्ष केले असते तर एक टक्का जनतेने देखील ही चित्रे पाहिली नसती...पण आता त्याला अटक करून, मग जामिन..मग सुटका असे सगळे करून आता सगळ्या जनतेला असिम त्रिवेदी नाव माहीती झाले....

@विवेक नाईक | 14 September, 2012 - 17:18 नवीन
<<<<<<<< कलाकाराचे नाव असिम त्रिवेदीऐवजी याकूब किंवा अफझल असते,तर इथे जमलेल्या मान्यवरानी आपली हीच मते मांडली असती का? >>>>>
का विसरलात ?
एम एफ हुसेन ने भारत माता विवस्त्र काढली होती.
<<
आजवर त्याच्यासारखा प्रतिभावान कलाकार झाला नाही असे स्युडोसेक्युलॅरिस्त मंडळींचा ठाम विश्वास असतो म्हणे!

@आशुचँप | 14 September, 2012 - 19:25 नवीन
असिमची व्यंगचित्रे फार काही ग्रेट दर्जाची वाटत नाहीत..म्हणजे गाजलेल्या व्यंगचित्रकारांच्या तुलनेत ती फारच बालीश वाटतात...संसदेचे चित्र काढून त्यावर टॉयलेट लिहीणे हा हास्यास्पद प्रकार होता...
<<
संसदेत बसलेले लोक, जुन्या गाजलेल्या संसदपटूंच्या तुलनेत जे कांही करतात, ते दाखविण्याकरता त्याने संसदेच्या चित्रावर काय लिहायला हवे होते म्हणजे ते योग्य झाले असते? संसदेत जे चालते ते अत्यंत घृणास्पद आहे हे त्याने अत्यंत परिणामकारक पद्धतीने दाखवले म्हणून तर त्यांचा पोटशूल उठला नाहि का?

संसदेत बसलेले लोक, जुन्या गाजलेल्या संसदपटूंच्या तुलनेत जे कांही करतात, ते दाखविण्याकरता त्याने संसदेच्या चित्रावर काय लिहायला हवे होते म्हणजे ते योग्य झाले असते?

नुसतेच चित्र काढून त्यावर काही लिहीले तर ते व्यंगचित्र होते का....
मला काय म्हणायचे होते ते तुम्हाला समजले नाहीये बहुदा...मी म्हणतोय की तो इतकाही प्रतिभाशाली व्यंगचित्रकार नाही....ही अशी चित्रे काढून त्यावर टॉयलेट असे लिहीणे हे फार प्राथमिक दर्जाचे व्यंगचित्रण आहे...एखादे शाळकरी मूल सुद्धा तसे करू शकते...त्यात त्याचे स्कील काय आहे...
हा आता अशोकस्तंभावर सिंहाऐवजी लांडणे चितारणे यात जरा तरी काही क्रिएटीव्हीटी होती...

>>मी म्हणतोय की तो इतकाही प्रतिभाशाली व्यंगचित्रकार नाही....ही अशी चित्रे काढून त्यावर टॉयलेट असे लिहीणे हे फार प्राथमिक दर्जाचे व्यंगचित्रण आहे...एखादे शाळकरी मूल सुद्धा तसे करू शकते...त्यात त्याचे स्कील काय आहे...<<

'तो इतकाही प्रतिभाशाली व्यंगचित्रकार नाही' हे कदाचित खरे असेलही. पण तरीही 'संसदेत जे चालते ते अत्यंत घृणास्पद आहे ' ही लोकभावना त्यात प्रकट झाली आणि म्हनुनच ते व्यंचि लोकप्रीय झाले.

हायकोर्टाने मुंबइ पोलिसांना फटकारले आहे " The Bombay High Court on Friday came down heavily on the Mumbai police for its action against cartoonist Aseem Trivedi, calling the sedition charges against him a suppression of the freedom of expression and speech. "

आता अमित कटरनवरे आणी मुंबइ पोलिस देशद्रोहि ठरले आहेत!

मी-भास्कर | 12 September, 2012 - 14:51
मागे तामीळनाडूतील एका व्यगचिंत्रकाराने तेथील सरकारावर काढलेल्या व्यंगचित्रामुळे त्याला जेलयात्रा घडली होती.
त्याच्या व्यंगचित्रात प्रेक्षकातिल एकजण शेजार्‍याला सांगत असतो, ' व्यासपिठावर तो भामट्यासारखा दिसतोय ना, तो आहे आमदार. आणि दरवडेखोरासारखा दिसतोय तो आहे मंत्री! '
व्यंचिचे नाव आठवत नाही. पूर्ण टक्कल पडलेला, गोल चेहर्‍याचा , लहान मुलासारखा निष्पाप चेहर्‍याचा गृहस्थ होता. देशभरातून टीका झाल्यावर सोडवे लागले त्याला. त्याचे नाव कोणाला आठवते का?
त्याचे नाव कोणाला आठवते का? असे मी विचारले होते. पण आज मला ते अचानक आठवले.
ते व्यंगचित्रकार आहेत 'चो रामस्वामी'. चेन्नई मधून तमीळ भाषेत प्रसिद्ध होणार्‍या 'तुघलक'चे संपादक. वर उल्लेखिलेले त्याम्चे व्यंगचित्र वादग्रस्त होईपर्यंत ते फारसे कोणाला माहीतही नव्हते, जसा असिम माहित नव्हता.
हे आहेत ते चो रामस्वामी :
cho ramsvami.jpg

राज्य सरकारने असिमच्या केस मधे तपास करायला सांगीतला आहे - सेडीशन सारखा गुन्हा कसा दाखल केला, कसा दाखल करुन घेतला वगैरे. पण त्याचबरोबर असेही म्हंटले आहे:

However, the sources said, both favoured (lesser) action against Trivedi as the cartoons were offensive and portrayed the Parliament and the national emblem in poor light.
http://www.hindustantimes.com/India-news/Mumbai/Maharashtra-Govt-orders-...

ही प्रतीकं शेवटी प्रतीकंच असतात - प्रतीकांना प्रत्यक्षापेक्षा जास्त सन्मान दिला की समजावे काहीतरी खोल गोची आहे.

प्रतीकांना प्रत्यक्षापेक्षा जास्त सन्मान दिला की समजावे काहीतरी खोल गोची आहे.

सरस्वतीच्या चित्रानाही हा नियम लागू होतो का?

The Prevention of Insults to National Honour Act, 1971

http://www.vakilno1.com/bareacts/laws/The-Prevention-Of-Insults-To-Natio...

त्यानुसार :

2. Insult Indian National Flag and Constitution of India .

Whoever in any public place or in any other place within public view burns, mutilates, defaces, defiles, disfigures, destroys, tramples upon or 1["otherwise shows disrespect to or brings"] into contempt (whether by words, either spoken or written, or by acts) the Indian National Flag or the Constitution of India or any part thereof, shall be punished with imprisonment for a term which may extend to three years, or with fine, or with both.

Explanation 1. Comments expressing disapprobation or criticism of the Constitution or of the Indian National Flag or of any measures of the Government with a view to obtain an amendment of the Constitution of India or an alteration of the Indian National Flag by lawful means do not constitute an offence under this section.

Explanation 2. The expression "Indian National Flag" includes any picture, painting, drawing or photograph, or other visible representation of the Indian National Flag, or of any part or parts thereof, made of any substance or represented on any substance.

Explanation 3.The expression "public place" means any place in tended for use by, or accessible to, the public and includes any public conveyance.

2["Explanation 4:-The disrespect to the Indian National Flag means and includes:-

(a) a gross affront or indignity offered to the Indian National Flag; or

(b) dipping the Indian National Flag in statue to any person or thing; or

(c) flying the Indian National Flag at half-mast except on occasions on which the Indian National Flag as flown at half-mast on public building s in accordance with the instructions issued by the Government; or

(d) using the Indian National Flag as a drapery in any form whatsoever except in State funerals or armed forces or other para-military forces funerals; or

3[(e) using the Indian National Flag -

(i) as a portion of costume uniform or accessory of any description which is worn below the waist of any person; or

(ii) by embroidering or printing it on cushions handkerchiefs napkins undergarments or any dress material or.]

(f) putting any kind of inscription upon the Indian National Flag; or

(g) using the Indian National Flag as a receptacle for receiving, delivering or carrying anything except flower petals before the Indian National Flag is unfurled as part of celebrations on special occasions including the Republic Day or the Independence day; or

(h) using the Indian National Flag as covering for a statue or a monument or a speaker's desk or a speaker's platform; or

(i) allowing the Indian National Flag to touch the ground or the floor or trail in water intentionally; or

(j) draping the Indian National Flag over the hood, top and sides or back or on a vehicle, train, boat or an aircraft or any other similar object; or

(k) using the Indian National Flag as a covering for a building; or

(l) intentionally displaying the Indian National Flag with the "saffron" down."

व्यंचिचे नाव आठवत नाही. पूर्ण टक्कल पडलेला, गोल चेहर्‍याचा , लहान मुलासारखा निष्पाप चेहर्‍याचा गृहस्थ होता.

पापी की निष्पाप हेही चेहर्‍यावरुन ठरवायचे का?

शेळीताई, हो सरस्वतीच्या चित्रालाही तोच नियम (प्रतिकांपेक्षा प्रत्यक्ष महत्वाचं) लागु व्हायला हवा. सरस्वती इथे का आली ते कळले नाही. सरस्वतीला पाचारण करुन विचारले तर ती ही बहुदा तेच सांगेल. ती तिच्या चित्रापेक्षा जास्त प्रगल्भ आहे, चित्राला चिकटुन राहु नये.

चेहर्‍यावरुन चांगले-वाईट ठरवु नये. शिंग फुटेपर्यंत सगळीच मुलं गोड दिसतात (खास करुन त्यांच्या पालकांना)

अरुंधती, ते मानव निर्मीत नियम आहेत, वेगवेगळ्या देशांमधे वेगवेगळे. ते निसर्गनियम नाहीत. नागरीक म्हणुन आपणच विचार करायला हवे की आपल्याला काय हवे (काय बरोबर आहे) आणि काय नाही. त्याप्रमाणे नियम बदलताही येतात. आणिबाणी मधे कितीतरी भयानक नियम घटनेत आरोपले गेले होते. एखादी गोष्ट केवळ घटनेत आहे म्हणुन शिरसावंद्य मानु नये.

एखादी गोष्ट केवळ घटनेत आहे म्हणुन शिरसावंद्य मानु नये.

आम जनतेने शिरसावंद्यच मानावी. त्याला किती महत्व द्यावे हे कोर्ट ठरवू शकते. आपण नाही.

पोलिसानी कायद्यानुसार पकडले हे योग्यच केले. न्यायालयाने सर्व अभ्यास करुन यात देशद्रोहाइतके गंभीर काही नाही, असे सांगून गुन्ह्याची तीव्रता कमी केली .. ( की शून्य केली?? केस डिस्मिस केलेली नाही ना? ) .. न्यायालयाचेही योग्य. आपण आम जनतेने आपली प्रतिके जपावीत हेच योग्य.

( मायबोलीवरचे लोक काय काहीही लिहितच असतात . पोलिसानी त्रिवेदीला पकडले आणि कोर्टाने सोडले तर पोलिसाना शिव्या घालायच्या . पोलिसानी अतिरेक्याला पकडले आणि कोर्टाने लवकर फाशी दिली नाही की कोर्टाला शिव्या द्यायच्या. पोलिसानी आणि कोर्टाने कुणाला फाशी दिली आणि राष्ट्रपतीनी सोडले की राष्ट्रपतीना शिव्या घालायच्या . Proud हा नाही तो, तो नाही हा ... प्रत्येक प्रकरणात कुणीतरी असतोच. Proud )

ते मानव निर्मीत नियम आहेत, वेगवेगळ्या देशांमधे वेगवेगळे. ते निसर्गनियम नाहीत.

मानवाने मानवनिर्मित नियम पाळणेच अपेक्षित आहे. निसर्गनियम पाळणे अपेक्षित नाही... भूक लागली म्हणून समोरच्याचा हात खाणे, संडासला लागली म्हणून कुत्र्यासारखे भर रस्त्यात बसणे , ...... हे माणसाला अलाउड आहे का? हेही निसर्गनियमात बसतातच ना?

शिरसावंद्य मानणं, शिव्या देणं, आणि जाळपोळ किंवा इतर अत्याचार करणं यात फरक करता यायला हवा.
प्रतिकं शिरसावंद्य मानायची असल्यास मानावी, ती इतरांनी मानली नाहीत तर ते त्यांचे स्वातंत्र्य आहे हे सुद्धा समजायला हवे.

राष्ट्र-ध्वजा चि "बिकिनी" घालणे म्हणजे देश-प्रेम? वावावा .....मज्जाच !

खरोखर डबक्यातले कोण आणि डबक्याबाहेरचे कोण ते ठरवायची वेळ आली आहे आता ..................

खरोखर डबक्यातले कोण आणि डबक्याबाहेरचे कोण ते ठरवायची वेळ आली आहे आता ..................

अगदी हेच मत तेंव्हाही मांडायचे होते, पण बाकीचे आपल्याला अडाणी म्हणतात की काय म्हणून लिहिले नव्हते.

-- अडाणी शेळीताई

अब्दुल कादिरवर (अमर जवान स्मारक प्रकरण) देखील देशद्रोहाची केस दाखल केली आहे का मुंबइ पोलिसांनी ?
शक्यता कमी वाटते. "त्यांच्या" भावना दुखावल्या जातील, उद्या काश्मीरमध्ये मोर्चे निघतील!

शिरसावंद्य मानणं, शिव्या देणं, आणि जाळपोळ किंवा इतर अत्याचार करणं यात फरक करता यायला हवा.
प्रतिकं शिरसावंद्य मानायची असल्यास मानावी, ती इतरांनी मानली नाहीत तर ते त्यांचे स्वातंत्र्य आहे हे सुद्धा समजायला हवे. + १

@अरुंधती कुलकर्णी
नियम सांगू नका वाचायला.
कायद्याचा हिसका पोलिसाम्नि दाखवला आहेच. ते अयोग्य वाटले म्हनून तर लेख. तुम्ही तुमचे मत कधी देनार?.

@शेळीतै
>>पापी की निष्पाप हेही चेहर्‍यावरुन ठरवायचे का?<<
व्यंगचित्रकाराचे नाव आठवावे यासाठी दिलेले वर्णन होते ते. अर्थात माझे नाव दिसले रे दिसले कि तुझी 'ताई'गिरि सुरू. काय लिहिलेले आहे हे तु कधि वाचणार? ताई असलीस तरी इतके विपर्यस्त लिहिणे तुला शोभत नाही. तुझे वर्णन करतांना 'शेळी' सारखी दिसणारी असेच करावे लागेल नाही का? भले तू शेळी नसलीस तरीही.

@aschig | 15 September, 2012 - 21:39 नवीन
>>चेहर्‍यावरुन चांगले-वाईट ठरवु नये. शिंग फुटेपर्यंत सगळीच मुलं गोड दिसतात (खास करुन त्यांच्या पालकांना)<<
सहमत. पण मी व्यंगचित्रकाराचे नाव आठवावे यासाठी दिलेले चेहर्‍याचे वर्णन होते ते. हे तुम्हालाहि पटावे.

व्यंगचित्रकाराचे नाव आठवावे यासाठी दिलेले वर्णन होते ते.

हायला, नुसत्या निष्पाप या शब्दाने नाव कसे आठवणार? टक्कल पडलेला, पन्नाशीचा, उंच, गोरा ... असे सात आठ शब्द लिहितात ना? का चांगला, निष्पाप, पापभिरू ... असे शब्द वापरले तर नाव आठवते?

---- निष्पाप, पापभिरू, आस्तिक शेळी ( आता शोधा मला या वर्णनावरून .. )

मला काही प्रश्न पडलेत.

१) वसंत ढोबळेंनी कारवाई केल्यावर मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत उच्चभ्रूंची मुलं सापडली. तेव्हाही हे कायदे कालबाह्य झालेत बदला अशी मागणी झालेली. सामान्य माणसाला आत टाकल्यावर अशी मागणी का होत नाही ?
२) देशद्रोहाचा कायदा जुना आहे म्हणजे काय ? माझ्यासारख्याला आत टाकले असते तर असा कंठशोष झाला असता का ? आजमितीला हा कायदा आहेच ना ?
३) पकडले गेले कि कायदे बदला ही फॅसिलिटी काही लोकांना घटनेचे कोणते कलम देते ?
४) राज्यघटनेबद्दल हीन अभिरुची असणारा एक वर्ग आहे ना ? केजरीवालांच्या मागे याच लोकांचे पाठबळ आहे ना ?
५) असीम त्रिवेदीने भ्रष्ट लोकांचे चित्र काढलेले नसून लोकांनी स्विकारलेल्या प्रतिकांची टवाळी केली आहे हे विधान चुकीचे आहे का ? नसल्यास
६) मंदिरात पुजा-याने बलात्कार करण्याच्या घटना आपल्याला माहीत असतात. पुन्हा अशी घटना घडल्यास पुजा-याला सोडून मंदीर, देव, धर्मग्रंथ यांची अशाच पद्ध्तीची व्यंचि असीम त्रिवेदी किंवा अन्य कुणी काढली तर प्रतिक्रिया अशाच असतील का ?
७) इथल्याच काही विद्वानांच मकबूल फिदा हुसेन यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची मतं इथल्या धाग्याशी जुळणारी नाहीत. असं का ?

काही विद्वान मंडळी त्रिवेंदींसाठी अगदीच हळवी झाली होती. त्या नादात आक्रस्ताळेपणाबद्दल प्रसिद्ध असणा-या वाहिन्यांवर व्यंगचित्रकाराने थॅचरबाईंसमवेत सर्व मंत्रिमंडळ निर्वस्त्र आहे असे दाखले दिले होते.

त्यांना काही प्रश्न विचारावेसे वाटतात. भारत आणि ब्रिटन यांच्या नग्नतेच्या कल्पना एकच आहेत का ? भारतीय सिनेमात देखील अद्याप नग्नता खपवून घेत्ली जात नाही. रामलीलाच्या मैदानावर ओढणीनृत्य करणा-या एक कर्कश्श महिलेचे थॅचरबाईंप्रमाणे व्यंचि प्रसिद्ध झाले तर या वाहिन्या, त्या बाई आणि आपले हे विद्वान यांची भूमिका काय असेल ?

भारतीय राज्यघटनेमुळे काही लोकांचे परंपरागत हक्क हिरावले गेलेत हे खरे तर मू़ळचे दुखणे आहे. संसदेत तेल्या तांबोळ्यांनी जाऊन काय नांगर चालवायचा आहे काय ? या विचाराला फाटा देऊन देशातल्या प्रत्येकाला मतस्वातंत्र्य देणा-या राज्यघटनेबद्दल काहींना आकस असणे स्वाभाविक आहे. म्हणूनच चोर सोडून राज्यघटनेला लक्ष केले गेले असावे. हा काही उद्रेक नाही तर बालपणापासून पाजलं गेलेलं हे कडू औषध चित्रातून सांडलेलं आहे.

स्पष्ट आणि रोखठोक शब्दात इतकं पुरेसं आहे.

देशद्रोहाचा कायदा जुना आहे म्हणजे काय

तो कायदा ब्रिटिशानी केला होता. ब्रिटिश मानचिन्हांचा अपमान हा देशद्रोह, राणीद्रोह मानला जाईल, असे ते कलम होते. हे कलम ( अखंड) भारत आणि ब्रिटिश बर्मा ( ब्रह्मदेश, म्यानमार) याना लागू केलेले होते.

स्वातंत्र्यानंतर त्यातईल राणी, ब्रह्मदेश वगैरे शब्द काढून तोच कायदा (खंडित) भारताला (म्हणजे आपल्याला) लागू केला गेला.. म्हणून तो कायदा ब्रिटिशांचा आहे, वगैरे आक्रोश सुरु आहे.

समजा कायदा ब्रिटिशानी नसता केला, आज पहिल्यांदाच लिहिला असता तरी तो असाच लिहिला गेला असता ना? का, मानचिन्हांचा अपमान केला तर त्याला भारतरत्न द्यावे असा कायदा केला असता?

राज्यघटनेबद्दल हीन अभिरुची असणारा एक वर्ग आहे ना ? केजरीवालांच्या मागे याच लोकांचे पाठबळ आहे ना ?

अगदी सहमत. हे हीन अभिरुची असलेले लोक काहीही चांगले दिसले की त्याला एक तर आपल्या कंपूत ओढतात किंवा विरोधक राहिला तर त्याला बदनाम करतात.

Pages