वैतरणा नदी, तांदुळवाडी, पालघर

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

केळवा बिचला जर मुंबै - अह्म्दाबाद हायवे (NH 8) via सफाळे गेलात तर ही नदी लागेल.
Picture 1513.jpg

विषय: 
प्रकार: 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरई फाट्यावरून सफाळे-केळवेकडे जाणारया रस्त्याला लागले की एका मागून एक दहीसर,नावझे,गिराळे,साखरे,पारगाव,तांदूळ्वाडी,लालठाणे ही गावं आपल्याला लागतात.बहुसंख्य कुणबी लोकांची वस्ती असलेल्या या गावांत झालेला बदल आणि श्रीमंती पटकन जाणवते.एकेकाळी फक्त शेतीच्या व्यवसायावर अवलंबून असलेली येथील जनता रेती आणि विटांच्या व्यवसायामूळे गब्बर झालेली दिसते..१५-२० वर्षापूर्वी बोइसर-तारापूर एम.आय. डीसीच्या निर्मितीसाठी,तसेच मुंबई-ठाणे,वसई-विरार मधिल बांधकामाच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात या भागातील नदीची रेती,विटा आणि ड्बरची मागणी सुरू झाली. हा सर्व पुरवठा करण्यासाठी शहरातील बांधकाम व्यवसायिकांनी स्थानिक तरूणांना हाताशी धरून सुर्या-वैतरणे मध्ये बेसूमार असे उत्खनन करून नदी पात्राची वाट लावून टाकली आहे..नदीच्या दोन्ही बाजूंचे काठांची धूप होवून ते रूंदावत चालले आहेत. वर्षभरापूर्वी खडकोली गावांजवळ सुर्या नदीवर बांधलेला छोटा बंधाराच वाहून गेला होता. ट्रक-डंपरच्या अव्याहत वाह्तुकीमूळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत..उन्हाळाच्या दिवसात या भागात फेरफटका मारल्यास सपूर्ण रखरखीतपणा जाणवतो.

माझ्या गावालगत असणारया सुर्या नदीच्या पात्रात काही वर्षापूर्वी एक सुंदर असे हिरवेगार बेट होत.आम्ही लहानपणी तिकडे गुरं चारायला घेवून जायचो..पण रेतीच्या बेसुमार अशा उत्खननामूळे ते संपूर्ण बेटच उध्वस्त झालं..पाटीलदा, तांदूळ्वाडी गाव आणि वैतरणा नदीचे तुमचे चित्र अप्रतिम असेच आहे. पण चित्रातील परीश्तिती आणि दिवसही आता इतिहासजमा झाले आहेत.. आताचे वास्तव मन एकदम सुन्न करणारे आहे.

Pages