नातवाची आजीसाठी शबनम

Submitted by अवल on 14 September, 2012 - 03:48

माझ्या लेकाने आजीसाठी ही शबनम भरली होती, तो सहावीत असताना. आईने आवर्जून त्याचा फोटो इथे टाकायला सांगितलाय Happy
तिला पत्ते खेळायला आवडतात म्हणून

DSC_0351.jpg

आणि तिला विणायला आवडते म्हणून दुस-या बाजूला सुया आणि लोकरीचा गुंडा

DSC_0352.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, तुझ्या लेकाचे खूप म्हणजे खूपच कौतुक वाटले. कलाकारी तर आवडलीच पण आजीसाठी असे काहीतरी करावेसे वाटले तेही फार आवडले. दोन्ही डिझाईन्स मस्त झाली आहेत Happy

धन्यवाद सर्वांना Happy
लहानपणी होता बाई गुणी. आता कुठे गेलं ते गुणी पोर कोण जाणे Wink
अगो, आजी अन त्याची लई दोस्ती. गणित, पत्ते, कोडी सगळ्या समान आवडी Happy

अगो, आजी अन त्याची लई दोस्ती. गणित, पत्ते, कोडी सगळ्या समान आवडी
>>> अरे वा, मस्त Happy आमच्याकडे पण आजी आणि नातवाची फारच गट्टी आहे.

मस्त ग ... लेक पण तुमच्या पावलावर पाउल आहे...

आधी आपल्या आवडत्या व्यक्ती साठी काही करावेसे वाटणे हेच किती सुंदर आहे....

खुप मस्त.... मला पत्ते खुप आवडले...

छान

सह्ही...
हे विणकाम, भरतकाम तुमच्या सगळ्यांच्या जीन्स (Genes- Genetic material) मधेच दिसते आहे - आजी काय - आई काय अन आता नातूही.. ग्रेट.... सिंपली ग्रेट....

आयशप्पथ! कसला ग्रेट आहे तुझा पोरगा. चक्क ६वीत असतांना त्याने आज्जीसाठी भरतकाम केलं! Happy

अवले तुझ्या पोराला माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवायला सांग ना! Proud

खूपच छान.
सहावीच्या मानाने विणकामाची सफाई कौतुकास्पद आहे तुमच्या मुलाची.
आणि आज्जीची आवड लक्षात ठेवून तिला हे विणून दिलं. किती मस्त !

अज्जिनी इतकी वर्ष शबनम छान जपुन ठेवलीय.तिनी ती किती मिरवली असेल सगळ्याना कौतुकानी दाखवली असेल.तुम्ही लेकीनी तिची चेष्टा केली असेल.माझ्या डोळ्यासमोर सर्व चित्र उभी राहिल.