मूर्ख म्हणावे कुणाकुणाला

Submitted by रसप on 4 September, 2012 - 06:20

माफ करावे कुणाकुणाला
समजुन घ्यावे कुणाकुणाला

मंदिरातही खोगिरभरती
देव म्हणावे कुणाकुणाला

नव्या युगाचा धर्मराज मी
स्वत्त्व हरावे कुणाकुणाला

अवतीभवती असंख्य कविता
सांग लिहावे कुणाकुणाला

उरले सुरले श्वास नकोसे
उधार द्यावे कुणाकुणाला

"मीच शहाणा" सारे म्हणती
मूर्ख म्हणावे कुणाकुणाला

....रसप....
३ मार्च २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/03/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रणजीत! गझल भिडली नाही. भावली नाही. अभिव्यक्ती दुर्बल वाटली.
-हस्वदीर्घाच्या चुका बोचल्या...........
समजुन...........समजून हवे.
खोगिरभरती..........खोगीरभरती हवे. खोगीरभरती म्हणजे निरुपयोगी, अवजड वस्तू, क्षुद्र व निरुपयोगी पशू, माणसे इत्यादिंचा जमाव!

शेर नंबर १......
गद्य statement वाटले.

शेर नंबर २...............
दोन ओळीतले नाते संदिग्ध वाटले.

शेर नंबर ३................
शेर अस्पष्ट वाटला.

शेर नंबर ४..................
सुमार खयाल.......शेर फारच गद्य वाटला.

शेर नंबर ५...........आपल्याला नकोसे झालेले श्वास दुस-यांना उधारीवर कशाला द्यायचे/खपवायचे?

शेर नंबर ६.........त्यातल्या त्यात ठीकठाक!

वर दिलेल्या शेरनिहाय, मला झालेल्या जाणीवांनुसार, तुझी ही गझल त्यातल्यात्यात मला अशी वाचावी वाटली.....................

माफ करावे कुणाकुणाला?
पदरी घ्यावे कुणाकुणाला?

शेंदूराचे किती चेहरे?
देव म्हणावे कुणाकुणाला?

धर्मांधांच्या दुनियेमध्ये;
संत म्हणावे कुणाकुणाला?

जो तो उठतो, गझला लिहितो!
काय लिहावे कुणाकुणाला?

प्रत्येकाची असे उधारी;
उधार द्यावे कुणाकुणाला?

दीशहाणे एकजात ते!
मूर्ख म्हणावे कुणाकुणाला?
..........प्रा.सतीश देवपूरकर

क्षमा करा देवपूरकर सर...
आपले पर्यायी शेर सरसकट दुर्लक्षित करतो आहे.

मी माझ्या विचारांशी माझ्या शेरांतून न्याय केला आहे असं मला वाटतं. त्यात अनुभूतीनिष्ठा, लेखनगर्भनिष्ठा (जी काही माझ्या ठायी आहे) वगैरे काय-काय म्हणतात, ते सांभाळले आहे, असं मला वाटतं.

'उधार'वाल्या आपल्या शेरात आपण काफिया दुस-याच कुठल्या गझलेचा 'उधार' घेतल्यागत झाला आहे... (अर्थात चुकला आहे...!) बहुधा आपणांस तिथे 'द्यावे' असं म्हणावयाचे असावे..

असो!

सर्वांचे आभार..!

म्हणे नव्या युगाचा धर्मराज मी. द्यूत खेळतोस? अटक होईल तुला. हा एका सात्विक स्त्रीचा शाप आहे. देवपूरकर तुम्ही काय लिहिता ते तुम्हाला तरी समजते का? हे वाक्य बघा तुमचे.

खोगीरभरती म्हणजे निरुपयोगी, अवजड वस्तू, क्षुद्र व निरुपयोगी पशू, माणसे इत्यादिंचा जमाव!

तुमच्या कवितांमध्ये हे पशूपक्षी वहिवाटीचा हक्क असल्याप्रमाणे बागडतात. मोर, कावळे, कोकीळ, वानर, मांजर, उंदीर आणि ससे. मोर तर बिनपावसाचेच नाचले एका कवितेत. मग ही खोगीरभरती नाही का?

म्हणे जो तो उठतो, गझला लिहितो काय लिहावे कुणाकुणाला? स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळ दिसते.

लिटल जिमी, तू घाबरू नको, हे सगळे पाळीवच पशू आहेत. लांडगे आणि बिबटे आणायची या स्वातंत्रोत्तर कवींची हिम्मत नाही

मोहिनीजी तुमचा लिटिल जिमी देवसरान्पासून जरा चार हात लाम्बच ठेवा ......देवपूरकर त्यालाही पळवतील अन एखाद्या शेरात लपवतील नै तर ....जपा.त्याला .......तो आमचा सर्वान्चा अत्यन्त लाडका आहे !!!

रणजीत!
माझे पर्यायी शेर जरूर सरसकट दुर्लक्षित कर, मर्जी तुझी! त्या शेरांकडे कुणी डोळे फाडून बघावे, वा कटाक्ष तरी टाकावा, तुलना करावी, हा त्यातील हेतू नाहीच मुळी!

पण, शेरनिहाय जे मी एक रसिक, वाचक, गझलकार व आस्वादक म्हणून लिहिले आहे, शंका विचारल्या आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
तू ज्याला न्याय केला आहे असे म्हणतोस, ते जरा आम्हा पामरांना समजेल असे उलगडून सांग ना. असे त्रोटक व एकांगी व फतव्यासारखे लिहिणे याला पलायनवाद म्हणतात. निष्ठा वगैरे खूप दूरचे आहे. ते सर्व चाणाक्ष रसिक शेर वाचल्या वाचल्या ओळखतात. शेराला निष्ठेचे लेबल लावावे लागत नाही.

इतर चर्चेत हक्काने,हिरिरीने काही तरी विचारतोस, मग स्वत:च्या गझलेवर शेरनिहाय विचारलेल्या रास्त शंकांच्या बाबतीत काही तर्कशुद्ध बोलायची वेळ आली की, सटकू पहातोस! याला काय म्हणायचे?

आम्ही उपस्थित केलेल्या शंका बालिश आहेत, की त्या कुशंका आहेत? तसे असल्यास तसे जाहीर लिही. पण, मुख्य मुद्याला बगल देणे आम्हास तरी प्रशस्त वाटत नाही.

उधारवाल्या शेरात द्यावे ऎवजी चुकून देवू झाले होते.........ती टायपिंग मिस्टेक होती. आताच सुधाकरच्या प्रतिसादातून समजले. दुरुस्ती केली आहे. अशा टायपिंग मिस्टेक तुला लगेच कळतात, मग गझलेच्या/शेरांच्या अंतरंगातल्या मोठमोठ्या त्रुटी जर एखाद्याला जाणवल्या व त्याने ते विचारले तर त्याची अशी बोळवण करायची, ही चांगली त-हा आहे तुझ्या प्रतिसादाची!

निखळ चर्चा म्हणून अशा मुद्यांवर लिहायला मला तरी काही वावगे दिसत नाही. अर्थात मुळात निकोप चर्चेची तयारी असेल, तरचे आहे हे सारे म्हणा! अन्यथा काय बाबा तुझी मर्जी!
...........प्रा.सतीश देवपूरकर

लिट्टिल जिमी!
मोहिनीचे काही ऐकू नकोस रे! आपण सर्व प्राणी आहोत की नाही, फक्त मोहिनीसारख्यांच्या सोबतीत राहिल्याने आपण माणसाळलो आहोत, पाळीव झालो आहोत, होय की नाही रे जिमी बेटा?
जिमी बेटा, जरा थांब, मोहिनीला सांग बघू की, लवकरच देव(मामा) लांडग्या, बिबट्यांची फौजच घेवून येतील, म्हणाव. मग नको घाबरून पळून जावूस म्हणाव. त्यांना देखिल पाळून दाखव म्हणाव!
जिमी बेटा, आपल्यासारख्या बुटक्यांच्या हिम्मतीला ती आव्हाहन देते आहे.
चल बघू, तू पण माझ्याबरोबरीने कंबर कस!
मोहिनीला म्हणाव, थांब लवकरच येतील आमचे देव(मामा)!
..........प्रा.सतीश देवपूरकर

सुधाकर!
द्यावे ऎवजी चुकून देवू असे झाले होते......दुरुस्त केले आहे. पहाशील का?
..........प्रा.सतीश देवपूरकर

@देवपूरकर्सर-

अवतीभवती असंख्य कविता
सांग लिहावे कुणाकुणाला

या (तुमच्यामते) 'सुमार' शेराचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहाल का, प्लीज?

समस्त मा.बो.करांची आधीच क्षमा मागतो. मला उद्देशून आव्हानात्मक भाषा आल्याने मला राहवले नाही. म्हणून लिहितो आहे.

.

.

>> माझे पर्यायी शेर जरूर सरसकट दुर्लक्षित कर, मर्जी तुझी! त्या शेरांकडे कुणी डोळे फाडून बघावे, वा कटाक्ष तरी टाकावा, तुलना करावी, हा त्यातील हेतू नाहीच मुळी! >>

मग दिले कशासाठी ? तुमच्या गझलेच्या वहीतच ठेवायचे ना 'दिनांक' टाकून !

>>पण, शेरनिहाय जे मी एक रसिक, वाचक, गझलकार व आस्वादक म्हणून लिहिले आहे, शंका विचारल्या आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?<<

मला एकही 'शंका' दिसली नाही. प्रत्येक शेरावर तुम्ही तुमचं मत मांडून मोकळे झाला आहात. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे शंका प्रश्नार्थक असतात. विधानं नसतात.

>>तू ज्याला न्याय केला आहे असे म्हणतोस, ते जरा आम्हा पामरांना समजेल असे उलगडून सांग ना. <<

'आम्हा' ? म्हणजे कोण ? हे आदरार्थी एकवचन आहे का ? कारण इतर कुणाला तर काही 'जाणवलेलं' दिसत नाही.

>> असे त्रोटक व एकांगी व फतव्यासारखे लिहिणे याला पलायनवाद म्हणतात. निष्ठा वगैरे खूप दूरचे आहे. ते सर्व चाणाक्ष रसिक शेर वाचल्या वाचल्या ओळखतात. शेराला निष्ठेचे लेबल लावावे लागत नाही. <<

हाहाहाहा! त्रोटक लिहायचं असतं तर आमच्या मुंबईच्या भाषेत 'चावू नका हो!/ डोक्याचं दही करू नका !' इतकंच म्हणून मोकळा झालो असतो. किंबहुना तुम्ही शेरनिहाय दिलेले शेरेच त्रोटक आहेत. त्या मानाने मी बरंच सविस्तर उत्तर दिले आहे. 'निष्ठा' ज्याची त्याला ठाऊक असते, जशी तुमची तुम्हाला ठाऊक आहे तशी माझी मला. पुढील वाक्य तुम्हालाही लागू होते ना ? मग कशाला पानपानभर निबंध लिहून आपली निष्ठा सिद्ध करायचे प्रयत्न करता ?

>>इतर चर्चेत हक्काने,हिरिरीने काही तरी विचारतोस, मग स्वत:च्या गझलेवर शेरनिहाय विचारलेल्या रास्त शंकांच्या बाबतीत काही तर्कशुद्ध बोलायची वेळ आली की, सटकू पहातोस! याला काय म्हणायचे?<<

गृहपाठ कमी पडला, सर! मी कधीच चर्चेत नसतो. गेल्या ३ दिवसांत मी दृष्टीत आलो आहे. कुठल्याही मा.बो.कराने तुमच्या "इतर चर्चेत हक्काने,हिरिरीने काही तरी विचारतोस" ह्या फुटकळ विधानास अनुमोदन द्यावे मी मानीन. असो. आता इथून पुढे नक्कीच भाग घेईन.
रास्त शंका? वर लिहिलं आहेच.
मी सटकू ? का ? तुम्हाला टाळायला ? कसले भारी विनोदी! मी इतके महत्त्व देत नाही तुम्हाला.

>>आम्ही उपस्थित केलेल्या शंका बालिश आहेत, की त्या कुशंका आहेत? तसे असल्यास तसे जाहीर लिही. पण, मुख्य मुद्याला बगल देणे आम्हास तरी प्रशस्त वाटत नाही.<<

आता जरासं प्रगल्भ बोललात. इथे सुद्धा 'आम्ही' हे मी आदरार्थी एकवचन मानतो आहे.

>>उधारवाल्या शेरात द्यावे ऎवजी चुकून देवू झाले होते.........ती टायपिंग मिस्टेक होती. आताच सुधाकरच्या प्रतिसादातून समजले. दुरुस्ती केली आहे. <<

ओके !!

>>अशा टायपिंग मिस्टेक तुला लगेच कळतात, मग गझलेच्या/शेरांच्या अंतरंगातल्या मोठमोठ्या त्रुटी जर एखाद्याला जाणवल्या व त्याने ते विचारले तर त्याची अशी बोळवण करायची, ही चांगली त-हा आहे तुझ्या प्रतिसादाची!<<

तेच तेच लिहिता तुम्ही.

>>निखळ चर्चा म्हणून अशा मुद्यांवर लिहायला मला तरी काही वावगे दिसत नाही. अर्थात मुळात निकोप चर्चेची तयारी असेल, तरचे आहे हे सारे म्हणा! अन्यथा काय बाबा तुझी मर्जी!<<

तुम्हाला चर्चा करायची असती तर 'शंका' काढल्या असत्या. निखळ, निकोप हे शब्द किमान इथे तरी वापरूच नका!

ज्ञानेश ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, 'कविता'वाल्या शेराचा अर्थ तुम्हाला कळला आहे असे वाटत नाही. आणि कळूनही जर तुम्हाला तो सुमार वाटत असला तर तुमच्या स्वकथित (Self Proclaimed) सौंदर्यबोधावर संशय घेण्यास जागा आहे !

अवतीभवती असंख्य कविता
सांग लिहावे कुणाकुणाला>>>>>>>>>>>

हा शेर सुमार कसा हे सान्गायचा प्रयत्न :केवळ हा शेर देवपूरकराना कसा लागू होतो हे लक्षात घ्रेवून केला आहे

अवती भवती असंख्य गझला .......असा अर्थ काढावा व चिन्तन सुरू करावे
मी ते असे केले ........

१) स्वतःच्या सोडून इतरान्च्या गझलाना गझल न म्हणणे हा शिष्टाचार प्रत्येक महान गझलकाराला पाळावाच लागतो असा एखादा गझलेचा नियम असावा बहुधा म्हणून देवपूरकरानीच जणू ही ओळ लिहिली आहे अशी कल्पना करून मग रणजीतने ही ओळ बदलून अशी केली असावी <<<<<< अवतीभवती असंख्य कविता

२)सांग लिहावे कुणाकुणाला ....................म्हणजे प्रतिसाद कुणाकुणाला लिहावे(त) असे देवपूरकराना म्हणायचे आहे असे कल्पून .....हे लिहिले असावे (कुणाकुणाचे शेर चोरून मग ते स्वताचे म्हणून लिहावेत असा अर्थ काढाल तर याद राखा............. माझ्या विठ्ठलाची शपथ आहे तुम्हाला Wink !!)..
............मागे एका प्रतिसादात ते म्हणाले होते की हे सर्व करताना त्याना कसा व किती त्रास सहन कराव लागतो वगैरे व तरीही गझलेच्या प्रेमापोटी ते हे काम किती आनन्दाने करतात वगैरे
व असेही म्हणाले होते की या कामी त्याना दिवसातले २५ तास कसे खर्च करावे लागतात वगैरे व इतके करूनही सर्वानाच आपले ज्ञान प्रकट करून दाखवणे कसे शक्य होत नाही वगैरे कारन लिहिणारेच इतके झालेत की बस वगैरे
म्हणून ते असे म्हणत असावेत की <<<<<<<सांग लिहावे कुणाकुणाला........ वगैरे !!

इतके सगळे बोलूनही मला या शेराचा अर्थ समजला आहे असे मला वाट्त नाहीये !!!

(किती ही व्यामिश्रता म्हणावी एखाद्याच्या लेखनात ...बाप रे बाप!!!)

असो

आता यात जे सान्गायचा प्रयत्न केला आहे ते देपपूरकराना पक्के कळ्ले आसणार पण कळतय पण वळत नाही हा वक्प्रचार की काय, तो सिद्ध करण्यासाठी या शेरास देवपूरकर "सुमार" म्हणाले असण्याची जास्त शक्यता मला तरी जाणवते !!.....बाकी काही नाही !!
_________________________________________________________________

तुमच्या स्वकथित (Self Proclaimed) सौंदर्यबोधावर संशय घेण्यास जागा आहे>>>>>

अरे रणजित तुला म्हणून सान्गतो ; हे जे देवपूरकर नामक प्रा. महोदय आहेत ना त्याना साधी सौन्दर्यदृष्टीसुद्धा नाही आहे रे..............सौन्दयबोध काय कप्पाळ होणारय??? (कपाळ ऐवजी घण्टा हा शब्द वापरणार होतो पण जिभेवर ताबा ठेवला !)

असो तू त्रास करून नको घेवूस मित्रा..............

अवतीभवती असंख्य कविता - यात काहीसा अर्थाचा पदर वगैरे आहे, पण बाकीची रचना वाचून त्यात काही दम नाही वाटत. म्हणजे, बाकीची रचना वाचल्यानंतर अगदी या एकाच शेरात शायराने फार काही दाखवायचे ठरवले असेल असे म्हणण्यात राम नाही.

दुनियामें पागलोंकी कमी नहीं गालिब;
एक ढूंडो तो हजार मिलते हैं!
<<<

गालिबच्या नावावर काहीही खपवू नका प्रोफेसर साहेब. बाकी वरील व्हर्जन (त्या शेराचे) बरे सुचले तुम्हाला.

दुनियामें पागलोंकी कमी नहीं गालिब;
एक ढूंडो तो हजार मिलते हैं!

असं स्वत: गालिब म्हणाले असतील तर एकच 'वाह!'. कारण गालिबच्या मानाने अगदीच पिचकवणी शेर आहे. तुम्ही रचला असेल तर Hat's off !!

"पण आम्हाला न शोधताच एक मिळाला आहे...." हा विचार गालिबने कसा मांडला असता बरे..? जाऊ दे गालिब... गेलाबाजार तुम्ही तरी कसा मांडाल हा विचार ?

>>अवतीभवती असंख्य कविता - यात काहीसा अर्थाचा पदर वगैरे आहे, पण बाकीची रचना वाचून त्यात काही दम नाही वाटत.<<

Accepted.

प्रामाणिकपणे सांगतो, आजवर जितक्या गझला लिहिल्या त्यातील एखाद-दुसरीच मला स्वतःला 'भिडली'. अनेक कवितांनी मला एक 'लिहिल्याचं' समाधान दिलं, पण तसं समाधान देणारी गझल क्वचितच जमून आली.

तसे म्हणत नाही रणजीत Happy

मला असे म्हणायचे होते की ही गझल ही एक प्रतिक्रिया आहे. यात आपण मन लावलेले नव्हतेत, नसावेत.

आपल्या अनेक गझला मला आवडलेल्या आहेत, पण ही गझल तितकीशी नाही आवडली. क्षमस्व

क्षमस्व..??
हक़ बनता हैं, सरजी!!

खरं सांगायचं तर ही गझल मी प्रतिक्रिया म्हणून नाही लिहिली. ही मार्च २०१२ मध्ये लिहिलेली आहे. (मी माझ्या गझला पोस्ट करताना नेहमीच खाली दिनांक देत असतो. नंतर कुणाशी तरी मिळतं-जुळतं वाटल्यावर दिनांक सांगून सारवासारव करायला लागू नये म्हणून नाही.... तर सवयच आहे म्हणून!!)

माझ्या प्रतिक्रियेतून जर नाराजीचा सूर जाणवला असेल, तर मी क्षमा मागतो. मला तसं अजिबात म्हणायचं नव्हतं.

Pages