मूर्ख म्हणावे कुणाकुणाला

Submitted by रसप on 4 September, 2012 - 06:20

माफ करावे कुणाकुणाला
समजुन घ्यावे कुणाकुणाला

मंदिरातही खोगिरभरती
देव म्हणावे कुणाकुणाला

नव्या युगाचा धर्मराज मी
स्वत्त्व हरावे कुणाकुणाला

अवतीभवती असंख्य कविता
सांग लिहावे कुणाकुणाला

उरले सुरले श्वास नकोसे
उधार द्यावे कुणाकुणाला

"मीच शहाणा" सारे म्हणती
मूर्ख म्हणावे कुणाकुणाला

....रसप....
३ मार्च २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/03/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवतीभवती असंख्य मच्छर
ठार करावे कुणाकुणाला?
वैवकु झालेत मच्छर आजकाल. वैवकु म्हणजे वैरी व कुटील झालेत. गुडनाईटला दाद न देता डसतात. आणि मच्छरांच्या या रसप प्रकाराला तर मी वैतागून गेलोय. रसप म्हणजे रक्त सर्रास पळवणे!

वैवकु म्हणजे वैरी व कुटील झालेत>>>>>>>>
आधीपासूनच आहेत ते तसे ;त्यात नवीन ते काय गुरुजी ?हाहाहा !!
हाहाहाहाहाहा !!!

माझ्या आईने मला लहानपणी सांगीतलेली एक गोष्ट आठवली. एकदा राणीसाहेबांना कोणी एक द्व्यर्थी श्लोक ऐकवला. वर वर पहाता तो साधा सरळ वाटला तरी त्यात एक चावट अर्थ दडलेला आहे असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी विदूषकाला खासगीत बोलावून त्याचा अर्थ विचारला. त्यांचं बोलणं चाललेलं असताना महाराज तिथे आले आणि त्यांचं बोलणं ऐकू लागले. तशी विदूषक म्हणाला, "मूर्ख". महाराजांच्या मनाला ते फार लागलं पण ते काही न बोलता निघून गेले. नंतर त्यांनी विदूषकाला विचारलं, " मला तू चक्क मूर्ख म्हणालास. तुझी जीभ फारच सुटायला लागली आहे." विदूषक नम्रपणे म्हणाला, " जगात चार प्रकारचे मूर्ख असतात. एक म्हणजे, रस्त्याने खात खात चालतात. दुसरे, अनाहूत सल्ले द्यायला जातात. तिसरे, दोन माणसे काही बोलत असताना मधेच नाक खुपसतात आणि चौथे, कवीला त्याच्या कवितेत दुरुस्त्या सुचवतात."

- प्रभाकर [बापू] करंदीकर.

प्रभाकर करंदीकर,
तुम्ही सांगितलेल्या गोष्टीतला श्लोक असा आहे. मी ऐकलेली कथा थोडी वेगळी आहे, पण तुमची कथाही मस्त आहे Happy
खादन्न गच्छामि हसन्न जल्पे, गतं न शोचामि कृतं न मन्ये
द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन्, किं कारणं भोज भवामि मूर्ख?

रसप,
मंदिरातही खोगिरभरती.... हा शेर आवडला.

नव्या युगाचा धर्मराज मी
स्वत्त्व हरावे कुणाकुणाला >>
ह्यात मात्र 'स्वत्त्व हरावे' च्या पुढे 'कुणाकुणाला' हे अर्थ्/व्याकरणदृष्ट्या नीट बसत नाही असे वाटते.
कुणाकुणापुढे स्वत्व हरावे असा अर्थ आहे असे वाटत असल्याने, तिथे 'कुणाकुणाला' हे बरोबर बसत नाही.
चू.भू.दे.घे.

""मी माझ्या विचारांशी माझ्या शेरांतून न्याय केला आहे असं मला वाटतं. त्यात अनुभूतीनिष्ठा, लेखनगर्भनिष्ठा (जी काही माझ्या ठायी आहे) वगैरे काय-काय म्हणतात, ते सांभाळले आहे, असं मला वाटतं.""
रणजीत मला हीच प्रामाणिकता आवडली .. आणि गझल तर खूप आवडली ..

Pages