अरे, फुलांचा सुगन्ध मी का दुरून घेतो ? (विडंबन)

Submitted by अ. अ. जोशी on 10 September, 2012 - 12:02

प्रा. सतीश (सर) यांच्या गझलेवर आधारीत विडंबन....

अरे, फुलांचा सुगन्ध मी का दुरून घेतो ?
वयापरत्वे जमेल ते ते बसून घेतो

करून इस्लाह छापले जे कधी गुरूने
कळूनही शिष्य केवढा मोहरून घेतो

असे नव्हे की, गझल भटांनीच फक्त केल्या
जमेल तेथे 'अम्ही''सुधा' पाजळून घेतो

इथे करावेच लागते वज्र काळजाचे
फुकट मिळाल्यावरी कुणीही दळून घेतो

पलीकडे जो गुरू कुणाचा कधी न झाला
अलीकडे शिष्य तो स्वतःला म्हणून घेतो

उगीच, सोन्या! करू नको तू प्रयत्न भलते
लिही तुला जे जमेल, मी चालवून घेतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

अरे....
मी लिहून मोकळा झालो आणि पाहिलेच नाही... क्षमस्व..!

सुधाकर, वैभव..कु.., सुप्रिया, कैलास... सर्वांना धन्यवाद..!