दोसा स्पेशल होटेल साठी नाव सुचवा...

Submitted by नाना फडणवीस on 6 September, 2012 - 07:45

माझ्या माबोकरान्नो...
मी एक कानडी माणूस्...अर्थात्...मराठी मायबोली....जन्मलो..वाढलो पुण्यात्...घड्लो...आणि बिघडलो......आता एक प्रयत्न करुन पहायचा आहे....मी आणि माझा एक कानडी मित्र मिळून् एक eatery उघडायचा प्रयत्न करतोय...the speciality will be usual Idli Dosa...but i want to introduce typical Kannadiga dishes with real kannadiga flavours like मांडगे, बिशि ब्याळी हुळी अनन्ना etc., मला दोन गोश्टी हव्या आहेत तुम्च्याकडुन्.....एक सुरेख नाव....and any more suggestions for menu etc., are most welcome. नाव मराठीच हवं.... Happy

I am sure you wont let me down..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dossier-A dossier is a collection of papers or other sources, containing detailed information about a particular person or subject, together with a synopsis of their content.
ह्याच धर्तीवर्.."डोसायर्"...(कलेक्शन ऑफ डोसाज...ह्या अर्थाने)

मालगुडी डोसा !!! >>> आवडलं Happy
मालगुडी व्हेज सुद्धा चालेल का ते पाहा, मालगुडी डेज च्या चालीवर.. !!
सांबार आणि चटणी अनलिमिटेड ठेवा, चव उत्तम असेल तर वडे, डोसे अजून खपतात आणि फायदाच होतो !
अर्थात, तुम्ही याचा साग्रसंगीत विचार करतच असाल Happy
वाडिया कॉलेजच्या शेजारी एक अण्णा आहे. त्याचे सांबार ब्येष्ट असते. गेला नसाल तर जरूर जाऊन पाहा.

अरे व्वा नानासाहेब? ही कल्पनाच भारी आहे राव. मस्त! खूप खूप अभिनंदन तुमचे Happy

आपण येणार त्या हाटिलात नक्की Happy

नाव पण मस्त सुचवलंय प्रत्येकाने

अभिनंदन पुन्हा एकदा

मालगुडी डोसा +१००० मस्त आहे!!!!

आणि डिश इडली नक्की... मी नक्की येईल तिथ Happy

आणि नाव म्हणाल तर.... इडली-डोसा ० (झिरो) कि.मी.... कस आहे ?

बाकी शुभेच्छा Happy

सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे कुंदा, करदंट, धारवाडी पेढे, बेळगावी किंवा धारवाडी मांडे मस्ट.
कर्नाट़की भाथ - दहीभाथ/ पुलीओरे /टोमॅटो भाथ/ बिशीबेळे.
सांबारा.
चटण्या/ लोणची.
न्याहारीचे पदार्थ - डाळवडा मस्ट.

अजून आठवेल तसे लिहीते.

शुभेच्छा. Happy

तुम्हाला शुभेच्छा.
चमनची मालगुडी वाली आयडीया मस्तच आहे. तसेच इंटेरिअर असले तर खरच वेगळेच रेस्टॉ. होईल.

हॉटेलात आलं की संपूर्ण दाक्षिणात्य जेवण मिळाल्याचे समाधान लाभेल असं बघा. एरवीच्या बाकी हॉटेलांमध्ये इडली-मेदूवडा-डोसा-उत्तप्पा मिळतोच. त्यांच्याकडे जे मिळत नाही, आणि जे अस्सल दाक्षिणात्य आहे, ते स्पेशालिटी म्हणून ठेवाच. सो, अ‍ॅपेटायझर, मेन, भात, गोड असे पूर्ण जेवण शक्य असेल तर द्या. दाक्षिणात्य गोड पदार्थ इथे कोणत्याच हॉटेलात मिळत नाहीत- पायसम वगैरे. ते अवश्य ठेवा. शिवाय कस्टमर घरी घेऊन जाईल असे कुंदा, मांडे हे पदार्थही.

शुभेच्छा. लोकेशन नक्की कळवा. तुम्ही लवकर हाकलणार नसाल तर माबो गटगही होऊ शकतील तिथे पुढे Happy

मस्त !! लोकेशन नक्की कळवा !! आणि नाव काय ठेवले हे ही कळवा.
Dosa Hut :- फक्त डोसा ठेवणार असाल तर (पिझ्झा ह्ट च्या धर्तीवर)
Dosa Hub :- आयटी पार्क भागात हॉटेल असेल तर
नाहीतर दक्षिणरंग, दक्षिणायन मस्त आहेत. मी अमि चे गोपुरम ही छान आहे
Kannadiga's kitchen कसे वाटेल?

कानडी आप्प्पाचा डोसा.
काप्पा डोसा!
दाक्षिणात्य रेस्टॉरंट खूप आहेत हे खास कानडी असेल तर ते कानडीपण काहितरी असायला हवं ना नावात. सुपर्स्पेशालिटी रेस्टॉरंट.:)

नाना,

वृंदावन डोसा कसं वाटतं? किंवा नानाचा डंका.

यष्टुमंदिगे (मराठीत : किती पाहिजेत).

डोसाभक्षणम्, क्षुधायज्ञम्

ईड्डलीकांडम्

हुबळी हापसा

डोसाहपापा, डोसागपापा, डोसा बकासुरी!

थोडा संज्ञाप्रवाह चालवलाय. गोड मानून घेणे! Happy

आ.न.,
-गा.पै.

फिनिक्स मॉल मध्ये, ग्राउंड फ्लोअरला एक साउथ इंडिअन जॉइंट आहे. नाव आत्ता आठवत नाहीये, पण त्यांच्याकडे थाळी प्रकरण मिळतं, म्हणजे रु.१५०/- मध्ये डोसा, एक उडीद वडा+ साउथ इंडिअन भात + कॉफी, असं काहीतरी. वेगवेगळी काँबिनेशन्स आहेत. तुम्ही, कन्नड पदार्थ घेउन तसे करु शकतात. ही थाळी सिस्टीम बरीच पॉप्युलर आहे तिथे. पोर्शन पण लहान असतात. म्हणजे, वेगवेगळ्या चवींचा आनंद. तसच, तिथे वर झांबर म्हणून साउथ इंडिअन रेस्टराँट आहे. त्याचे इंटिरीअर भारी आहे. साउथ इंडिअन थिमला साजेसे. ते पाहून काही कल्पना सुचू शकतील.

तुम्हाला शुभेच्छा!!. Happy

combination थाळी नक्की ठेवा, माझ्या सारख्या बर्याच लोकांना एक डिश मागवून वेगवेगळे पदार्थ चाखायला नक्की आवडते.
ती एक ज्वारी ची कांदा घालून काहीतरी भाकरी करतात न कर्नाटकात मला खूप आवडते, ती आणि नाचणी चे कर्नाटकी पदार्थ
तिकडच्या फेमस चटण्या, आल्याची चटणी, टोमाटो चटणी नक्की ठेवा....बाकी सगळ्यांनीच मस्त सूचना दिल्यात

नावासाठी मालगुडी आणि कर्नाटकू ला +१

टिपिकल कानडी म्हणजे म्हणजे ‘दर्शनी’ पण होऊ शकेल. अर्थात दर्शनी ही कन्सेप्ट फास्ट फूडच्या जास्त जवळ जाणारी आहे.

स्वाती....तु म्हणतियेस तो फिनिक्स मॉल पुण्यात आहे का? माफ कर पण पुण्यातल्या नवीन गोश्टींची फारशी माहिती नाही म्हणून ......गीतु..नक्की प्रयत्न केला जाईल....

दक्षिणायन नावाचे हॉटेल आहे पुण्यात जेएम रोड वुड्लँड शोरुमच्या इथे.. क्वालिटी पण आहे चांगली.. हवं तर जाउन आयडीया घेता येइल....
मालगुडी डोसा >> मस्त आहे नाव!!
नाना, प्लीज कळ्वा हॉटेल कुठे असेल ..नक्कीच येवु Happy

अमदावादला एक दक्षिणी पदाथांचे हॉटेल निघालय नुकतच. - नाव "मद्रास एक्स्प्रेस" अन बाहेरून आतून लुक आगगाडीच्या डब्याचा.. १ल्या दिवशीपासूनच दण्ण चालू लागलय..

नाना फडणवीस तुम्हाला अनेक शुभेच्छा. आजच्या लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत खाणे पिणे या सदरात कर्नाटकी संस्कृतीबद्दल आणी तेथील खाद्यपदार्थांबद्दल आले आहे ते वाचा. मला तर ते नवीन आहेच, कारण कानडी लोक आम्हाला कमीच भेटले, त्यामुळे विशेष माहीती नाही. पण आता तुमच्या हॉटेलच्या निमित्ताने ती होईल.

अगदि, अगदि हॉटेलचे नाव वर सुचविल्याप्रमाणे काहीही ठेवा,
मात्र मग एक "मायबोली गटग" तुमच्याच हॉटेलमध्ये करायचे ठरवू. म्हणजे काय है, तुमच्या हॉटेलला सुंदर-सुंदर नावे सुचविल्याबद्दल मायबोलीकरांचे आभारही तिथेच तुम्हाला मानता येतील.

-विजय आंग्रे

नाना फडणविस

नाव कुठलेही ठेवा. पण बेंगलोर मध्ये चकचकीत किचन्स दिसतात तसे किचन असले तर वेगळेपण राहील. फक्त इथल्या पब्लिकला उभे राहून खायला आवडत नाही म्हणून तिथला तो पॅटर्न इथे चालणार नाही. साऊथची सांबरात विरघळणारी इडली पुण्यात कुठेच मिळत नाही. रस्सम बाथ (भात) वगैरे प्रकार ठेवून बघा. हॉटेल चालू झाल्यावर इथे कळवा मात्र. नक्की येऊन जाईन. बसायला भरपूर जागा असेल तर आमच्या कामातली गटगं इथेच ठेवता येतील . चालू करा लवकर.

शुभेच्छा !

बाणेर रस्ता, पुणे येथील ' डु से इडलिशियस' ( Do-say idalicious ) ला गेले आहात का?(ही पुर्वीच्या औंधच्या 'इडलिशियस' ची, जे आता काहि कारणाने बंद आहे, त्याची शाखा आहे.)
नसेल तर नक्की जा .. तुम्ही ज्या कल्पनेवर रेस्टोरंट काढत आहात साधारण तसेच आहे.

'इडलिशियस' बंद पडल्याने ते नाव उपलब्ध आहे का बघा ...

नाना,
नुसती नावे काय मागवतात? एखादी स्पर्धा काढा. जो बेस्ट नाव सुचवेल, त्याला एक डोसा डिनर फ्री असे काही बक्षिस ठेवा.

'डशिंग डोसा' हे नाव कसे वाटले?

बहुतेक अमराठी लोक पुण्याचा उल्ले़ख पुना असेच करतात आणि करावली म्हणजे 'Coastal Area of Karnataka'
नावा मध्ये पुणे पण आले आणि कानडी संस्क्रुती पण आली. तसेच जेवण बहुदा केळीच्या पानावर घेतात म्हणुन लोगो मधे केळीचे पान दाखविले आहे.
होटेल च्या गेट ला शनिवार व रविवारी केळीचे खांब नाहीतर नारळाच्या झावळ्या लावायच्या.
Karnataka State Bus मुंबई हुन निघाली की पुणे कोल्हापुर मार्गे जाते.
तेव्हा कंडक्टर 'पुना' मार्गेच आवाज देतात.

Pages