दोसा स्पेशल होटेल साठी नाव सुचवा...

Submitted by नाना फडणवीस on 6 September, 2012 - 07:45

माझ्या माबोकरान्नो...
मी एक कानडी माणूस्...अर्थात्...मराठी मायबोली....जन्मलो..वाढलो पुण्यात्...घड्लो...आणि बिघडलो......आता एक प्रयत्न करुन पहायचा आहे....मी आणि माझा एक कानडी मित्र मिळून् एक eatery उघडायचा प्रयत्न करतोय...the speciality will be usual Idli Dosa...but i want to introduce typical Kannadiga dishes with real kannadiga flavours like मांडगे, बिशि ब्याळी हुळी अनन्ना etc., मला दोन गोश्टी हव्या आहेत तुम्च्याकडुन्.....एक सुरेख नाव....and any more suggestions for menu etc., are most welcome. नाव मराठीच हवं.... Happy

I am sure you wont let me down..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वोंट आणि लेट मध्ये बी काय करतोय?

नांव मराठी हवे , कानडी की इंग्रजी?

एन टी आर कसे आहे? नानाज टिफीन रूम ! Wink

मुंबइ मध्ये एक हॉटेल आहे त्याच नाव 'दक्षीणायन' आहे. छान वाटत नाव.
डोसा आणि कंपनी
डोसाघर
व्यंजनम
भोजनम

मुंबइ मध्ये एक हॉटेल आहे त्याच नाव 'दक्षीणायन' आहे.>> पुण्यात पण चालु झाले आहे डेक्कन ला डोसा+ इड्ली= डोसाइ:)

१. या ढोसा
२. सीमाप्रश्न मसाला डोसा
३. महाराष्ट्र एकीकरण डोसा
४. जय महाराष्ट्र बेळगाव डोसा
५.अव्वा अप्पा डोसा सेंटर

Kiran......या ढोसा......नक्की...पण जर नाव डोसा 'बार' असेल तर.... Happy

डोसा अशा नावाचे एक हॉटेल ( बहुतेक सुश्मिता सेनच्या तात्कालिन मित्राचे ) चेंबूरला होते, तिचा हक्क असेल, अजून.

सिंगापूर एअरपोर्टवर कावेरी नावाचे हॉटेल होते. हि नदी म्हणजे, कर्नाटकाच्या जिव्हाळ्याचा विषय.

बेळगावी खासियत : नाना डोसेवाले (तुमचं नावही आलं आणि डोश्याचे विविध प्रकार मिळतील असंही सुचित होईल).

मला सातीनं सुचवलेलं नावही खूप आवडलं. टिफीन हा एकदम टिपिकल दाक्षिणात्य शब्द आहे.

अरे वा.. पुण्यात डोसा स्पेशल हॉटेल.. बहार येईल... या कल्पनेबद्दलच १०० मार्क्स तुम्हाला !! हार्दिक शुभेच्छा !!

हॉटेलमधे रस्सम हवंच. शिवाय बोंडा-सूप, इडीयाप्पम (हे आपल्या मराठी लोकांना कितपत आवडेल कोण जाणे, पण तुम्हीच सवय लावा. :)) हे पण ठेवा... अनलिमिटेड चटण्या (पुदीना-कोथिंबीरची हिरवी, खोबर्‍याची पांढरी, टोमॅटोची लाल या तीन तर मस्ट आहेत अगदीच.) . पोंगल पण मस्ट. खारा पोंगल आणि स्वीट पोंगल दोन्ही. .. दाक्षिणात्य पद्धतीचा उपमा आणि शिरा (चाऊ चाऊ भात) आणि डाळींबाचे दाणे घातलेली दही बुत्ती, दाक्षिणात्य लोणचे हे पण हवेच.

डोसा, मैसूर डोसा, सेट डोसा, पेपर डोसा, ओनियन डोसा, हे सर्व असणारच असे गृहीत धरते. इडली डोसाचे खूपच प्रकार हवेत. वडे तर ठेवणारच असाल. आणि हो, हे सांबार , चटण्या इ. प्रकार दक्षिणेत असतात तसे बादल्यांमधे (वाटल्यास छोट्याश्या, छान आकाराच्या आणि लूक च्या) ठेवून बघा.

आईग्गं, मी नॉस्टॅल्जिक व्हायला लागले. असो, तुम्ही हे वरचे सगळे प्रकार आणि चाम्गली क्वालिटी ठेवली तर मी आजन्म कस्टमर बनेन. Wink

नाव म्हणाल तर इथे पुण्यात फारसे रुचेल की नाही माहीत नाही पण बंगळूरुत टिपिकल नावे म्हणजे शांती-सागर, सुख-सागर, मेघ-सागर. अश्या धर्तीवर त्यात थोडे पुणेरी संस्करण करुन करा काहीतरी. Happy

मालगुडी डोसा !!!
तुमच्या गिर्‍हाकांच्या मनात आधीच असलेल्या कर्नाटकी कनेक्शन 'मालगुडी डेज' बद्दलच्या आठवणी कॅश करा.
तुमच्या ईटरीचा अ‍ॅम्बिअन्सही 'मालगुडी डेज' मधल्या एखाद्या कथेतल्यासारखा ठेऊ शकता.

'कर्नाटकी कशिदा' ही आठवला पण पुढे 'हात नका लाऊ माझ्या डोश्याला' असं तुम्ही म्हणताय, असं काहीतरी गिर्‍हाईकांना वाटलं तर पंचाईत व्हायची. Proud

नाना फडणवीस, कन्नडीगा फेम तट्टे ईडली, चित्रन्ना, रागी मुददे, आलू / मेसूर बोंडा, पुरी सागु, अक्की रोटी, होलीगे / ओबाटु (पुरण पोळी), केसरी भात, मेसूर पाक, चिरोटी नक्की ठेवा तुमच्या टिफिन सेंटरमध्ये.
निन्ना (तुमच) टिफिन सेंटर.
पदार्थ केळीच्या पानात सर्व्ह करा. Happy

Saam-Baar

मवा...अगं धन्य आहेस्....मस्स्त सुचना....I will take this as a challenge ki मी तुम्हाला या eatery cha आजन्मं सदस्य १००% बनवून दाखवीन.....चमन्...खरच चांगली कल्पना आहे..नक्कीच प्रयत्न केला जाईल्....तुम्ही माबोकरांचा उत्साह बघून आमचा उत्साह दुणावतोय.....शतशः धन्यवाद माबोकरान्नो......पण अजून सूचनांची वाट पहातोय.......तुम्हाला कल्पना नाही आमच्या साठी हे किती अमुल्य आहे....परत एकदा धन्यवाद...

दक्षिणा
दक्षिणरुची
डोसोबा (पोटोबाच्या चालीवर ;))

आणि ती स्टीलच्या वाटी अन भांड्यातुन कडक साउथ "कापी" नक्की ठेवा Happy

मी सध्या अमेरीकेत आहे, पण पुण्यात येईन तोवर तुमचे हॉटेल चाम्गले चालायला लागले असेल अशी आशा करते.

अजून - चना सुंदल, दहीवडे, अप्पम, डाळी असलेली किसलेलं गाजर-काकडी इ. ची कोशिंबीर

http://www.thedosarepublic.com/restaurant.html

पारसी, चाइनिज, चेट्टिनाड, सिंहला, मेक्सिकन ई च्या प्रभावातुन डोसा व ईडलिशी केलेला खेळ... कहितरी वेगळ ... नुस्त ट्रॅडिशनल नाही...तुमच्या विचाराला डोसा (खाद्य) म्हणुन हे उदाहरण .. तुम्हाला शुभेच्छा !

भाऊ नमसकर आणि नंद्याने सुचवलेली नावे आवडली. सातीने सुचवलेलेही छान आहे पण मायबोलीबाहेरच्या लोकांना त्या नावातली गंमत कळणार नाही.

नाना, तुम्हाला आणि मित्राला शुभेच्छा!
कधी आणि कुठे उघडताय इटरी? करदंट, कुंदा हव्वाच Happy

चमन ची आयडिया आवडली Happy

काही नांव -

डोसान्ना (डोसा + अन्ना) किंवा डोसाण्णा (डोसा + अण्णा)

डोसा D (डायनर मधला D)

कन्नडा कनेक्षन / जंक्षन

कर्नाडोना (कर्नाटक + डोसा + नाना) - मॅरॅडोना सारखं Happy

---

मवा<<< तोंपासु पोस्ट Happy

दिनेशदा, कावेरी आहे अजुन सिंगापुर एअरपोर्टवर... Happy

कावेरी, डोसे बनवत्येय आणि रांधत्येय Proud
हल्ली आंतरप्रांतिय झालिये आणि त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थांबरोबर पंजाबी पण खिलवते Happy

वर बर्‍याच जणानी चांगल्या सुचना दिल्या आहेतच. त्याला अनुमोदन.
कुंदा पाहिजेच राव. इकडे कुंदा मिळत नाही. कलाकंद देवु का विचारल होत एकाने.
बायकोला "तुमच्यासाठी काय पण" बोल्लो प्रेमाने Proud
तर ती बोल्ली जा कुंदा घेवुन ये. Proud

मालगुडी डोसा नाव खुप आवडलं. Happy

Pages