बडबड गीत

Submitted by पुरंदरे शशांक on 4 September, 2012 - 00:58

चिमणा चिमणी राजा राणी
बाळ त्यांचं मोठ्ठं गुणी

तोतो (आंबो) करते खुळखुळ पाणी
दूदू पिते शाण्यावाणी

कित्ती बाई ते चळवळी
भुर्रर म्हण्ता हस्ते खळी

आ आ गाते गोगोड गाणी
गागू करते पाखरावाणी ....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गागु म्हंजे काय >>> गाई गाई, झोपणे.....

तोतो / भुडुश / आंबो - आंघोळ

प्रत्येक मुलाची त्याची म्हणून एक डिक्शनरी असते - ती आई, बाबा, ताई, दादा, आजी, आजोबा यांनाच कळते....... मग हळुहळु ती मुलं सरावतात आपल्या नेहेमीच्या वापरातल्या शब्दांना, वाक्यांना......

एकंदरीत मजा असते मुलांच्या भावविश्वाची......