ट्रॅजेडी किंग..

Submitted by Kiran.. on 29 August, 2012 - 05:42

गाईडने सांगितलं म्हणून अंधारातच भुयाराचं ते दार उघडलं. जुन्या बिजाग-यांचं ते प्रचंड दार कर्रर्र कर्कश्श आवाज करीत किलकिलं झालं थंडाईचा झोत शरीराला स्पर्श करून गेला.

गाइडने झटकन मला बाजूला ओढून घेत थांबायला सांगितलं...
"काळाच्या दरवाजातून चाललोय. सांभाळून... कित्येक वर्षांची साचलेली धूळ, हवा होती ती " मी काहीच न कळाल्यासारखं त्याच्याकडे पाहीलं.

सगळीकडे अंधारच भरून राहीला होता. म्हटलं तर दिसतंय म्हटलं तर नाही अशी विलक्षण अवस्था होती. कदाचित आम्ही बराच काळ चाललो असू (काळ या शब्दाला आता अर्थ राहीला होता का ?).
एका प्रचंड मोकळ्या जागेत आल्याची जाणीव झाली. अनेक नद्या एका ठिकानी समुद्राला येऊन मिळावीत तशी इथे अनेक भुयारं येऊन मिळत होती. हा बहुधा चौक असावा. चौकात अनेक खांब होते. प्रचंड आकाराचे खांब आणि त्यावर मिणमिणणारे पलिते.

मी प्रश्नार्थक नजरेने गाईडकडे पाहीलं. याचं नाव गाईड शिवाय दुसरं काहीच असू शकत नाही याची एव्हाना खात्रीच पटली होती. असंख्य खांबांमुळे चकव्याचा भास होत होता. आता कुठून आलो हे समजायला मार्ग नव्हता. मी गांगरून गेलो आणि गाइडचा हात सोडून एका अंधा-या भुयारात शिरलो.
भुयारात शिरताना मागून गाईडच्या हाका ऐकू येत होत्या. आता मागेही वळून पाहता येईना..

कुणीतरी खेचत असल्याचा भास झाला.

भास नव्हे, मी प्रचंड वेगाने ओढला जात होतो आणि अंधारातच अधांतरी फेकला गेलो. घाबरून माझी शुद्ध हरपत गेली.

किती वेळ झाला माहीत नाही. अंग ठणकत होतं. मी कुठेय हे कळत नव्हतं. आजूबाजूला जुनी घरं होती. तुरळक वाहतुकीचे रस्ते आणि जुनाट वेशभूषेतले लोक दिसत होते. आता अंधार नव्हता. पण कुठेच रंग दिसत नव्हते.

सगळंच कृष्णधवल !!

मला नवल वाटलं. रंगाशिवाय असलेल्या या दुनियेची कल्पनाही करू शकत नसताना मीच अशा ठिकाणी अडकलो होतो. मॉल्स, मल्टिप्लेक्स, गाड्या, रंगीत संगीत तरुणाई दिसत नव्हती. दूर अंतरावर रोषणाई दिसली म्हणून तिकडे गेलो.

मेहबूब स्टुडीओजचा फलक दिव्यांच्या रोषणाईत झळाळून उठला होता. बाहेर प्रचंड गर्दी होती. कुणालातरी पहायला लोक काम सोडून उभे होते. गार्ड्स त्यांना बाहेर काढत होते. माझ्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं हे बरंच होतं. मी सहजच मेहबूब स्टुडीओत शिरलो आणि ...

गारा राग कानावर पडला.

ओळखीचं गीत वाजत होतं म्हणून तिकडे वळालो आणि थक्क झालो.

"मोहे पनघटपे नंदलाला छेड गयो रे "

हे गाणं आणि

समोरून चालत येणारं एक संगमरवरी शिल्प !!!

तीच ती.

नक्कीच ..

मधुबाला !!!

रंभा म्हणू कि उर्वशी
कि म्हणू मेनका हिला
नकोच काही नकोच काही
ती एक मधूबाला..

स्वर्गातलं सगळं सौंदर्य संपलं असावं हिला बनवल्यावर. तिच्या टपो-या डोळ्यांत हरवतानाच तिच्या चेह-यावर तिचं ते जगप्रसिद्ध हास्य पसरलं मात्र

आणि मी कदाचित पुन्हा बेशुद्ध होणार असं वाटत असतानाच गाइडने सावरलं. त्याला पाहताच जिवात जीव आला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. काळाच्या नदीतून आम्ही मुघल ए आझम च्या सेटवर पोहोचलो होतो.

बाहेरची गर्दी आता लक्षात आली.

बाहेरचे आवाज ऐकू येत होते.

आया आया
देखो वो आ रहा है

बाजू..
साइड प्लीज !!

आणी संगमरवरी पुतळ्याने दरवाजाकडे पाहीलं. अतिशय उत्कटतेने..

तो येत होता.
लाखो तरुणी ज्याच्या एका कटाक्षावर कुर्बान व्हायला तयार होत्या.
ज्याच्या आवाजातला दर्द कानावर पडताच हाय असा उस्फूर्त उद्ग्रार हिंदुस्थानभर उमटत होता.

तो

ट्रॅजेडी किंग..

दिलीपकुमार यायची वेळ झाली होती.

क्रमश :

( ट्रॅजेडी किंग या माझ्या लेखनमधे रेंगाळलेल्या कथेचा पहिला भाग कधीही येऊ शकेल. ही प्रस्तावना कदाचित आपल्याला आवडावी ही आशा Proud )

_ Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमशः?
ओक्के वेटिंग!

तिकडे मधू झुरत असताना, हा येतोय...!! तिच्याबद्दलचे, "दिलीपसाब" की जुबानी ऐकायलाही आवडेल!

वाचतेय......

अरे घाणेरड्या, क्रमशः काय? Sad लिही ना लवकर पुढचं. मधुबालाबद्दलची क्युरियॉसिटी बागेश्रीने बरीचशी भागवली. तिच्या मृत्युचं, तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल असलेलं गुढ बरचसं भागवलं गेलं. आता ट्रॅजिडी किंगबद्दल तु लिहिणार म्हणजे आम्हाला ट्रीटच. २-४ लोकांनी वाट पाहिली आपल्या लिखाणाची तरी आपण लिहुन मोकळं व्हावं. चल हो चालु. Happy

मने Lol

अरे घाणेरड्या, क्रमशः काय? Uhoh Proud

माऊ
Dilip saab padale vatata हे मोबाईलवरून लिहीलेलं गं. , मला पडले असं म्हणायचं होतं Wink Lol

गिरीश
प्रस्तावना क्रमशं नाही रे. हे प्रोमोज आहेत. सलमान खान नाही का इंडीयन आयडॉल मधे टायगरची रिक्षा फिरवतो तसंच Proud कथा सेटवर जायचीय अजून. चकणा, किंगफिशर सोडा, बॅगपायपर स्प्रिंग वॉटर वगैरे व्यवस्था झाली कि कंप्लीटच करतो Happy