Submitted by बागेश्री on 23 August, 2012 - 03:38
गुंतलेले पाश सुटे होताना
श्वासांचही हलकं, हलकं होत जाणं..
गुंतणं नि सोडवणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
गुंतण्याची अधीरता
तर सुटतानाचे नि:श्वास
दोन्ही घडताना अपूर्णतेची धाप मात्र सारखीच...
आयुष्याच्या धावपट्टीवरचा हा टप्पा अन् सोबतीची ही धाप,
अपरिहार्यच!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
(No subject)
आयुष्याच्या धावपट्टीवरचा हा
आयुष्याच्या धावपट्टीवरचा हा टप्पा ...
पुढचा एकांडा मार्ग सुचवणारा ??
अपुर्णतेची धाप ??????
अपुर्णतेची धाप ??????
नाही समजली
नाही समजली
सुंदर!! मात्र, आयुष्याच्या
सुंदर!!
मात्र, आयुष्याच्या धावपट्टीवर हा एकच एक असा टप्पा नसतो ना? खरेतर आयुष्यातील प्रत्येक नात्यात कमी-अधिक तीव्रतेने अशी प्रक्रिया होतच असते.... आणि 'अपुर्णतेची धाप' लागण्याचा टप्पाही त्या त्या संदर्भानुसार बरेचदा येतो..........
धन्स ऑल ओवी, अगदी मनातलं!!
धन्स ऑल
ओवी, अगदी मनातलं!!
मलाही अपूर्णतेची धाप हा फंडा
मलाही अपूर्णतेची धाप हा फंडा कळला नाही.
प्लीज एक्सप्लेन......
मलाही अपूर्णतेची धाप हा फंडा
मलाही अपूर्णतेची धाप हा फंडा कळला नाही<<<
अपूर्णतेची धाप हा फंडा नसून गंडा असावा
गुंतलेले पाश सुटे
गुंतलेले पाश सुटे होताना
श्वासांचही जड, जड होत जाणं..
लग्न आणि घटस्फोट
दोन विरुद्ध प्रक्रिया,
लग्नाची अधीरता
तर घटस्फोटाचे नि:श्वास
आंतरजातीय लग्नात आणि घटस्फोट घडताना
अपूर्णतेची खाप मात्र सारखीच...
संसाराच्या चोथा होण्याचा हा टप्पा अन् सोबतीची ही खाप,
अपरिहार्यच!
इब्लिसीण खाप म्हणजे काय ते
इब्लिसीण
खाप म्हणजे काय ते कृपया सांगावेत
मला आवडली गुंतलेली नाती अशी
मला आवडली
गुंतलेली नाती अशी तुटताना
आसमंतात विलीन होत जाणं..
जगणं नि मरणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
जगण्याची ईच्छा
तर मरनाच्या यातना
दोन्ही घडताना सोबतीची 'थाप' मात्र सारखीच...
आयुष्याच्या धावपट्टीवरचा हा टप्पा अन् सोबतीची ही 'थाप',
आवश्यकच!
वर्षा,मस्त, मस्त्च! धन्यवाद
वर्षा,मस्त, मस्त्च!
धन्यवाद
सुंदर
सुंदर
बाग्ज, या कवितेला समजुन
बाग्ज, या कवितेला समजुन घेताना मलाही धाप लागली गं. सुट्या सुट्या ओळी आवडल्या, समजल्या. पण एकसंध कविता वाचताना आशय पोचला नाही.
गुंतणं नि सोडवणं दोन विरुद्ध
गुंतणं नि सोडवणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
गुंतण्याची अधीरता
तर सुटतानाचे नि:श्वास
दोन्ही घडताना अपूर्णतेची धाप मात्र सारखीच...
Equilibrium.. माणसाला हुलकावण्या देणारी एक संकल्पना.
नात्यामधलं संतुलन क्षणाचं, हेलकावे अनंतकाळचे.
त्या संतुलनाच्या शोधाला आपण सुखाचा शोध मानतो अन कायम धापावतो,खंतावतो .
जे अपूर्ण ते अपूर्ण म्हणून स्वीकारत नाही .
अचूक, बागेश्री.
मने, बोलूयात! अज्ञातजी, खूप
मने, बोलूयात!
अज्ञातजी, खूप दिवसांनतर तुमचा प्रतिसाद आला आणि माझ्याच जून्या कवितेचा फॉर्म (तुम्हाला आवडणारा) ह्यात राखल्या गेल्याचं जाणवलं! मनःपूर्वक आभारी आहे
भारती,
संतुलन क्षणाचं, हेलकावे अनंतकाळचे.>> त्या संतुलनाच्या शोधाला आपण सुखाचा शोध मानतो अन कायम धापावतो,खंतावतो >> वाह! समर्पक! धन्यवाद!
अपूर्णतेची धाप हा फंडा नसून
अपूर्णतेची धाप हा फंडा नसून गंडा असावा>> गंडा?
ए ए बागे मलापण झब्बू
ए ए बागे मलापण झब्बू द्यायचाय............हा घे!!
लिहिणं नि वाचणं
दोन विरुद्ध प्रक्रिया,
लिहिण्यार्याची बधीरता
तर वाचणार्याची अधीरता
दोन्ही घडताना दुर्बोधतेची उघडझाप मात्र सारखीच...!!
____________
कविता खूप मस्तय बागे
"अपूर्णतेची धाप" तर केवळ अप्रतीम गं !!
धन्यवाद!!
मला वाटते गंडा घालणे हे जसे
मला वाटते गंडा घालणे हे जसे शागीर्दगीबाबत असते तसेच एखाद्याला गंडवणे या अर्थीही असते, असे उल्लेख ऐकल्यासारखे आठवत आहेत
बेफीजी............यू नॉटी!!
बेफीजी............यू नॉटी!!:P
सरळ सरळ गंडवलंय म्हणा ना बेफी
सरळ सरळ गंडवलंय म्हणा ना बेफी
वैभव, मला झब्बू मनापासून आवडला
छान आशय. शेवटच्या ४ ओळी विशेष
छान आशय.
शेवटच्या ४ ओळी विशेष उल्लेखनीय.